maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

गणेश भक्तांना करता येणार डिजिटल दान

मुंबई, २३ सप्टेंबर २०२३: भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी ब्रॅण्‍ड पेटीएमची मालक असलेल्‍या वन९७ कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेड (ओसीएल) ने मुंबईतील १४ गणेश मंडळांसोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत गणेशभक्‍तांना गणेशोत्‍सवादरम्‍यान पेटीएम क्‍यूआर कोड स्‍कॅन करत मंदिर ट्रस्‍टला दान करण्‍यास प्रेरित करण्‍यात आले आहे.

ही १४ गणेश मंडळ आहेत प्रभादेवी येथील सिध्‍दीविनायक मंदिर, गिरगाव येथील गिरगावचा महाराजा, लालबाग येथील तेजुकाया मंडळ, अंधेरी पश्चिम येथील अंधेरीचा राजा, मरोळ अंधेरी पूर्व येथील मरोळचा राजा, खेतवाडीमधील खेतवाडीचा राजा, परेल येथील परेलचा इच्‍छापूर्ती लाल मैदान, लोअर परेल येथील फ्रेण्‍ड सर्कल मंडळ, लालबाग येथील बालयुवक मित्र मंडळ, लोअर परेल जंक्‍शन येथील बालसाथी मंडळ, चेंबूर येथील सह्याद्री गणपती, पवई येथील पवईचा राजा, कांदिवली येथील महावीर नगर आणि ठाणे येथील ठाण्‍याचा महाराजा.

गणेश चतुर्थीच्‍या शुभप्रसंगी कंपनीने आकर्षक सूट देण्‍यासाठी पेटीएम डील्‍सवर मिठाईची दुकाने व रेस्‍टॉरंट्सना देखील ऑनबोर्ड केले आहे. वापरकर्त्‍यांना ब्रिजवासी, सातू (Satu’s) यांसारख्‍या प्रसिद्ध मिठाईच्‍या दुकानांमधून मिठाईची आणि रेस्‍टॉरंट्समधून खाद्यपदार्थांची ऑर्डर करताना पेटीए रेस्‍टॉरंट डील्‍समधून जवळपास ३० टक्‍के सूट मिळू शकते. ते त्‍वरित सूट मिळवण्‍यसाठी बँक ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकतात. तसेच, वापरकर्त्‍यांना पेटीएम पोस्‍टपेडच्‍या माध्‍यमातून पेमेंट केल्‍यास १००० रूपयाच्‍या बिलवर ५० रूपये कॅशबॅक आणि पेटीएम वॉलेटच्‍या माध्‍यमातून पेमेंट केल्‍यास ५ टक्‍के म्‍हणजेच जवळपास १०० रूपयांची कॅशबॅक मिळू शकते.

दुकानांमध्‍ये पेटीएमच्‍या कार्ड मशिन्‍स देखील आहेत, जेथे वापरकर्ते पेटीएम क्‍यूआर कोड स्‍कॅन करत पेमेंट्स करू शकतात. पेटीएम कार्ड मशिनसह व्‍यापारी ग्राहकांकडून सर्व प्रकारचे पेमेंट्स स्‍वीकारू शकतात, जसे डेबिट व क्रेडिट कार्ड्स, पेटीएम वॉलेट, नेट बँकिंग व सर्व यूपीआय अॅप्‍स. याव्‍यतिरिक्‍त, पेटीएम मुंबईमधील विविध सोसायटींमध्‍ये स्‍टॉल्‍स उभारतील, जेथे वापरकर्त्‍यांसह कुटुंबातील सदस्‍य मोदक बनवण्‍यास शिकू शकतील.

तसेच, यंदा गणेशोत्‍सवानिमित्त पेटीएम इंडिगो, एअरएशिया, आकासा, स्‍पाइसजेट, विस्‍तारा व एअर इंडिया अशा सर्व देशांतर्गत फ्लाइट्सवर १२ टक्‍क्‍यांची, म्‍हणजेच जवळपास १,००० रूपयांची सूट प्रदान करत आहे. या ऑफरचा लाभ घेण्‍यासाठी वापरकर्त्‍यांनी पेमेंट्सदरम्‍यान प्रोमो कोड ‘FLYUTSAV’चा वापर करणे आवश्‍यक आहे. बसने प्रवास करणाऱ्या वापरकर्त्‍यांसाठी प्रोमो कोड ‘PAYTMBUS’च्‍या वापरावर ४०० रूपयांची सूट मिळू शकते. रेल्‍वे तिकिटे बुकिंगसंदर्भात वापरकर्ते झीरो सर्विस व पेमेंट गेटवे शुल्‍कांच्‍या लाभासह तिकिटे बुक करू शकतात. प्रवास करण्‍याच्‍या तारखेमध्‍ये बदल करण्‍यासंदर्भात वापरकर्त्‍यांना फ्री कॅन्‍सलेशनच्‍या माध्‍यमातून फ्लाइट, बस व रेल्‍वे तिकिटांवर १०० टक्‍के रिफंड मिळू शकते.

पेटीएम प्रवक्‍ता म्‍हणाले, ”भारतातील क्‍यूआर कोड व मोबाइल पेमेंट्समध्‍ये अग्रणी असलेल्या आम्‍ही गणेशोत्‍सवानिमित्त मुंबईतील गणेश मंडळांमध्‍ये डिजिटल दान सक्षम केले आहे. गणेशभक्‍त पेटीएम क्‍यूआर स्‍कॅन करू शकतात आणि पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट अशा सुविधांच्‍या माध्‍यमातून पेमेंट करू शकतात. आम्‍ही देशाच्‍या कानाकोपऱ्यापर्यंत आमच्‍या नाविन्‍यपूर्ण मोबाइल पेमेंट सोल्‍यूशन्‍सचा विस्‍तार करत आर्थिक समावेशनाला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

फिनटेक अग्रणी पेटीएमने डिजिटल दान सुलभ व सोईस्‍कर करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतभरातील गणेशभक्‍त त्‍यांच्‍या घरांमधून सोयीने पेटीएम सुपर अॅपवरील ‘Devotion‘ विभागावरून देखील दान करू शकतात.   

 

Related posts

MobilTM प्रथमच साजरा करत आहे MotoGP™️ भारत पॉवरिंगद्वारे रेड बुल केटीएम फॅक्टरी रेसिंग टीम

Shivani Shetty

वर्ल्ड प्रोटिन डे’ निमित्त मुंबईकरांसाठी जेवणाच्या डब्यासोबत फॉर्च्युन सोया चंक्सतर्फे खास सरप्राइज फॉर्च्युन सोयाची मुंबई डबेवाल्यांसोबत भागिदारी

Shivani Shetty

एल्‍गीचा मियामी, फ्लोरिडामधील एअरलॅब फिटनेसच्‍या सिम्‍युलेटेड हाय-अॅल्टिट्यूड फिटनेस प्रशिक्षण सुविधेला पाठिंबा

Shivani Shetty

Leave a Comment