मुंबई, ११ जून २०२४ – कल्याण ज्वेलर्स या भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडने मेगा बोनान्झा ऑफर लाँच केली आहे. फादर्स डे आणि बकरी ईद तसेच जमाई सोश्टी, वट सावित्री आणि गंगा दसरा या सणांसाठी ही ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या मेगा- बोनान्झा ऑफरमध्ये कल्याण ज्वेलर्सकडून सोने खरेदी केल्यास असामान्य डील्सचा लाभ मिळणार असून सणासुदीचे हे दिवस आणखी खास ठरतील.
कल्याणने भारतातील सर्व दालनांमधील दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्याशिवाय ‘कल्याण स्पेशल गोल्ड रेट’ जाहीर करण्यात आला आहे, जो बाजारपेठेत सर्वात कमी आणि कंपनीच्या सर्व दालनांमध्ये समान आहे. लक्षणीय सवलतीसह उपलब्ध करण्यात आलेल्या दागिन्यांच्या विस्तृत श्रेणीमध्ये रोज घालण्याच्या दागिन्यांपासून आकर्षक, ठसठशीत दागिन्यांच समावेश करण्यात आला असून कल्याण ज्वेलर्सने प्रत्येक सणाचं सेलिब्रेशन आणखी खास होईल याची काळजी घेतली आहे.
श्री.रमेश कल्याणरामन, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,’‘ग्राहकाभिमुख उपक्रम आणि नाविन्याप्रती बांधिलकीमुळे ग्राहकांशी असलेले नाते कायम दृढ झाले आहे. त्यांना पूर्ण समाधान देण्याची खात्री ब्रँडतर्फे केली जाते. या नव्या ऑफरच्या माध्यमातून सणासुदीच्या काळात खरेदीचा आनंद घ्यायला आवडणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या पैशांचे पुरेपूर मूल्य मिळेल याची खात्री आम्ही केली आहे.’’
कल्याण ज्वेलर्समधील दागिने बीआयएस हॉलमार्क्ड व शुद्धतेच्या विविध चाचण्या पूर्ण केलेले असतात. ज्यावर ग्राहकांना कल्याण ज्वेलर्समध्ये ४ स्तरीय अश्युरन्स प्रमाणपत्रही दिले जाते, ज्यामुळे त्यांना शुद्धतेची खात्री मिळते, दागिन्यांची मोफत देखभाल, उत्पादनाची तपशीलवार माहिती, पारदर्शक एक्सचेंज पॉलिसी मिळते. हे प्रमाणपत्र ब्रँडच्या निष्ठावान ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या बांधिलकीचा भाग आहे.