पुणे, २४ जून २०२४: पुणे हे देशातील झपाट्याने वाढत असलेले हाऊसिंग मार्केट असून भारताचा प्रीमियर फुल-स्टॅक प्रॉप-टेक प्लॅटफॉर्म हाऊसिंग डॉटकॉमचे पुण्यात आक्रमक विकासाचे लक्ष्य ठेवले आहे. हाऊसिंग डॉटकॉमने आपल्या विकासाला गती देण्यासाठी, पुण्यातील आघाडीच्या रियल इस्टेट विकासकांसाठी ‘हाऊसिंग डॉटकॉम पार्टनर्स मीट’ या एका अत्यंत यशस्वी नेटवर्किंग इव्हेंटचे आयोजन केले. या इव्हेंटने मुख्य हित-धारकांना आपले विचार सामाईक करण्यासाठी, या क्षेत्रात सहयोग आणि कल्पकता वाढवण्यासाठी एक सशक्त मंच प्रदान केला. उपस्थित मान्यवरांमध्ये कोलते पाटील, कोहिनूर ग्रूप, न्याती ग्रुप आणि वेंकटेश ग्रुपचा समावेश होता.
सहभागींनी या उद्योगातील अलीकडचे ट्रेंड, आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट प्रथांविषयीच्या चर्चेत भाग घेतला. या इव्हेंटने संभाव्य भागीदार, सहकारी आणि ग्राहक यांच्यातील नाते दृढ करण्याची अनमोल संधी दिली.
हाऊसिंग डॉटकॉमचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर श्री. अमित मसलदान म्हणाले, “पुण्यातील वाढते इन्फ्रास्ट्रक्चर, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि गतिशील आर्थिक विकास मिळून रियल इस्टेट क्षेत्रात स्थिर वृद्धीसाठी एक मजबूत पाया तयार करतात. शिवाय, मुंबई आणि पुणे अजूनही रियल्टी सेक्टरच्या आणि आमच्या वृद्धीची मुख्य केंद्रे आहेत. एक डिजिटल रियल्टी कंपनी म्हणून आमच्या ग्राहकांमधील मोठा भाग या दोन मोठ्या टियर-1 मार्केटमधून येणारा आहे. हा ट्रेंड असाच चालू राहणार आहे, कारण हे चमकदार मार्केट गुंतवणूकदार आणि घर-खरेदीदार या दोघांकडून लक्षणीय आर्थिक उलाढाल आणि त्यांची रुची आकर्षित करत आहे.”
श्री. मसलदान पुढे म्हणाले, “पुण्यात ऑनलाइन घर शोधण्याच्या मागणीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. देशातील आघाडीची डिजिटल रियल इस्टेट कंपनी म्हणून पुण्यातील लोकांसाठी उत्कृष्ट सर्च आणि डिस्कव्हरी प्लॅटफॉर्म म्हणून आमची स्थिती मजबूत करणे हे आमचे ध्येय आहे.
मोठ्या गुंतवणुकी आणि उच्च मागणी यामुळे विकासाला वेग:
२०२४ मधील जानेवारी-मार्च काळातील विक्रीचे आकडे दाखवतात की, पुण्यातील खरेदीदार प्रामुख्याने २५ लाख ते ७५ लाख या मध्यम श्रेणीच्या किंमतीतील, परवडण्याजोग्या घरांचा शोध घेतात आणि त्यातही राहण्यासाठी अपार्टमेंटला विशेष पसंती देतात. रचना-प्रकार पाहिल्यास, २ बीएचके घरांना सगळ्यात जास्त मागणी आहे. भरभराटीच्या वाणिज्य मार्केटसहित एक औद्योगिक केंद्र असलेल्या पुण्यात निवासी मालमत्तेच्या किंमती देखील गेल्या वर्षात सरासरी १०% ने वाढल्या आहेत.
नवीन मेट्रो खंडांच्या (सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट अंडरग्राऊंड स्ट्रेच जुलैपासून सुरू होणे अपेक्षित आहे) संचालनाच्या माध्यमातून सरकारकडून इन्फ्रास्ट्रक्चरला प्रोत्साहन मिळत असल्यामुळे विशिष्ट क्षेत्रांमध्ये भाव वाढण्याची शक्यता आहे. एकंदरित, पुणे भारतातल्या महानगरांपैकी एक परवडण्याजोगे शहर आहे, जिथले जीवनमान दर्जेदार आहे आणि विकासाची मोठी क्षमता या शहरात आहे.
हाऊसिंग डॉटकॉमच्या आयआरआयएस निर्देशांकानुसार ४२ मुख्य भारतीय शहरांत मालमत्तेच्या मागणीचा जो संकेतक आहे, त्यात ऑनलाइन मालमत्ता शोधण्याच्या प्रमाणात पुण्याने सध्या मुंबई, बंगळूर आणि हैदराबाद सारख्या मोठ्या हाऊसिंग मार्केट्सना मागे टाकले आहे.