राष्ट्रीय, सप्टेंबर १६, २०२३: माझा या कोका-कोला इंडियाच्या स्वदेशी मँगो ड्रिंकने नुकतेच नवीन मोहिम ‘रश नही, सिप करो‘मध्ये मँगो लस्सीसह प्रिमिअम विभाग लाँच केला आहे. या मोहिमेला अनन्या पांडेचे समर्थन आहे. मँगो लस्सीमध्ये दही व आंब्याचे स्वादिष्ट संयोजन आहे, ज्यामधून माझाचे स्वादिष्ट पैलू दिसून येतात आणि ब्रॅण्डची अस्सल आंब्याचा स्वाद देण्याप्रती कटिबद्धता अधिक दृढ होते.
१९७६ मध्ये लाँच झाल्यापासून माझाने भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि प्रत्येक सिपमधून हापूस आंब्याचा स्वाद देत आहे. यासह कंपनी फळांचा राजा आंब्याप्रती देशवासीयांच्या प्रेमाला प्रशंसित करत आहे.
टीअॅन्डपीची (डब्ल्यूपीपीमधील ओपनएक्सचा भाग म्हणून) संकल्पना असलेल्या नवीन टीव्हीसीमध्ये अनन्या पांडे प्रेक्षकांना ‘रश नही, सिप करो‘ संदेश देत आहे. या संदेशामधून माझा मॅजिकच्या मुलभूत उत्पादन तत्त्वाचे सार कॅप्चर करण्यात आले आहे. या मोहिमेचा ग्राहकांना वेळात वेळ काढून माझा मँगो लस्सीच्या स्वादिष्ट चवीचा आस्वाद घेण्यास प्रेरित करण्याचा उद्देश आहे.
टीव्हीसीमध्ये अनन्या पांडे मँगो लस्सीचा आस्वाद घेताना पाहायला मिळते, तसेच या मँगो लस्सीचा स्वाद तिला अधिकाधिक आस्वाद घेण्यास प्रवृत्त करत तिचे लक्ष वेधून घेतो. ती माझाच्या मँगो लस्सीचा आस्वाद घेताच आनंदित होण्यासह स्वादाच्या अनोख्या विश्वामध्ये रममाण होते.
नवीन व्हेरिएण्टच्या लाँचची घोषणा करत कोका-कोला इंडिया व साऊथवेस्ट एशियाच्या न्यूट्रिशन कॅटेगरीचे मार्केटिंगचे वरिष्ठ संचालक अजय कानोले म्हणाले, ”माझा स्वदेशी वारसायुक्त ब्रॅण्ड आहे आणि दशकांपासून अनेक भारतीयांनी याचा आस्वाद घेतला आहे. माझा मँगो लस्सीच्या लाँचसह आमचा समकालीन ट्विस्टसह पारंपारिक फ्लेवर्सच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा मनसुबा आहे. आम्हाला आमची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून अनन्या पांडेला ऑनबोर्ड करण्याचा आनंद होत आहे. तिचे उत्साही व डायनॅमिक व्यक्तिमत्त्व माझाच्या ब्रॅण्ड तत्त्वांशी उत्तमरित्या संलग्न आहे.”
भारतीय अभिनेत्री आणि माझा मॅजिकच्या अॅम्बेसेडर अनन्या पांडेम्हणाल्या, ”मला माझा मॅजिकची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनण्याचा आनंद होत आहे. आंबे आपल्या सांस्कृतिक वारसाचा भाग आहेत आणि या फळाप्रती आपल्या सर्वांच्या गोड आठवणी आहेत. मी सुरूवातीपासून माझाचा आस्वाद घेत आले आहे, ज्यामधून मला आंब्याचा स्वाद मिळायचा. प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा भाग असलेल्या या वारसासोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे, ज्यामुळे मला बालपणीचे ते मौल्यवान क्षण पुन्हा जगता आले आहेत.”
ब्रॅण्डने नवीन मोहिमेच्या प्रचारासाठी सर्वांगीण विपणन दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे, ज्यामध्ये डिजिटल प्रसारणाचा समावेश आहे.
शाश्वततेप्रती कटिबद्धतेचा भाग म्हणून माझाचे उत्पादन स्थानिक पातळीवर केले जाते, ज्यामध्ये कोका-कोलाचा अग्रणी उपक्रम ‘फ्रूट सर्क्युलर इकॉनॉमी‘चा महत्त्वपूर्ण घटक म्हणून स्थानिक घटकांचा वापर करण्यात येतो. २०११ पासून माझा आंध्रप्रदेशमधील ‘प्रोजेक्ट उन्नती मँगो‘ आणि भुवनेश्वरमधील ‘प्रोजेक्ट उन्नती अमृत‘ यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांचा सामाजिक-आर्थिक विकास करण्याप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे.