भारत, २९ मे, २०२४:* रोजगार बाजारपेठेत प्रवेश करू पाहणाऱ्या नवीन पदवीधारकांसाठी लिंक्डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक नेटवर्कने आज भारतात झपाट्याने वाढत असलेले रोजगार, उद्योग, कार्य व कौशल्यांबाबत नवीन डेटा सादर केला. लिंक्डइन डेटामधून निदर्शनास येते की आज डिझाइन, अॅनालिटिक्स व प्रोग्रामिंग हे एण्ट्री-लेव्हल पदांसाठी अव्वल कौशल्ये आहेत.
कंपन्या २०२४ मध्ये परिवर्तनशील धोरणाचा अवलंब करत आहेत, तसेच अधिक लवचिक कामकाज व्यवस्थापनाप्रती ट्रेण्ड वाढत आहे. फक्त ऑन-साइट पदे १५ टक्क्यांनी कमी होत आहेत आणि हायब्रिड पोझिशन्स दरवर्षाला एण्ट्री-लेव्हल पदांसाठी ५२ टक्क्यांनी वाढत आहेत. या परिवर्तनामधून नवीन पदवीधरांना कार्यक्षेत्र निवडण्यासह त्यामध्ये करिअर घडवण्यासाठी व्यापक संधी मिळते.
लिंक्डइनच्या करिअर स्टार्टर २०२४ अहवालानुसार युटिलिटीज हा बॅचलर्स पदवी असलेल्या तरूण व्यावसायिकांसाठी झपाट्याने विकसित होत असलेला उद्योग आहे. नवीन पदवीधरांना कामावर घेणारे इतर अव्वल उद्योग आहेत ऑईल, गॅस अँड मायनिंग, रिअल इस्टेट, इक्विपमेंअ रेण्टल सर्विसेस् आणि कंझ्युमर सर्विसेस्. तसेच, बॅचलर्स पदवी नसलेल्यांसाठी शिक्षण, तंत्रज्ञान व माहिती आणि मीडिया क्षेत्रांत भरपूर संधी आहेत.
लिंक्डइनच्या डेटामधून विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यावसायिकांसाठी वैविध्यपूर्ण टॉप रोजगार निदर्शनास येतात. बॅचलर्स पदवीधारक सॉफ्टवेअर इंजीनिअर, सिस्टम इंजीनिअर आणि प्रोग्रामिंग अॅनालिस्ट अशा पदांना एक्स्प्लोअर करू शकतात. मास्टर्स पदवीधारकांना सॉफ्टवेअर इंजीनिअर व डेटा अॅनालिस्ट म्हणून नियुक्त केले जात आहे. पदवी नसलेले सॉफ्टवेअर इंजीनिअर, सेक्रेटरी व डिझाइन इंजीनिअर अशा पदांमध्ये परिपूर्ण करिअर घडवू शकतात.
शैक्षणिक पार्श्वभूमी कोणतीही असो विविध रोजगार कार्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कम्युनिटी अँड सोशल सर्विसेस्, लीगल, मार्केटिंग आणि मीडिया अँड कम्युनिकेशन अशा क्षेत्रांमधील बॅचलर्स पदवीधारकांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. बॅचलर्स पदवी नसलेल्या व्यक्तींसाठी देखील शिक्षण, मानवी संसाधन, मार्केटिंग आणि मीडिया अँड कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये अनेक रोजगार संधी आहेत.
”स्पर्धात्मक रोजगार बाजारपेठेत प्रवेश करणे, विशेषत: करिअरची सुरूवात करणे आव्हानात्मक असू शकते. उद्योगामधील ट्रेण्ड्स व इन-डिमांड रोजगारांबाबत अपडेटेड राहणे आणि सुरूवातीला अशक्य वाटणाऱ्या पदांना एक्स्प्लोअर करणे यामुळे व्यापक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. आज अनेक कौशल्ये उद्योगांमध्ये हस्तांतरणीय आहेत आणि उदयास आलेल्या एआयसह विविध क्षेत्रांमध्ये अधिक तंत्रज्ञान-संबंधित पदे निर्माण होत आहेत, ज्यामुळे कंपन्या विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या व्यावसायिकांचा शोध घेत आहेत. या हायरिंग ट्रेण्ड्समधून ऊर्जा क्षेत्राप्रमाणे व्यापक आर्थिक संधी दिसून येतात. आपल्या क्षमता वाढवण्यासाठी नोकरीसाधकांनी स्वत:ची कौशल्ये अधिक प्रबळ करणे आणि व्यावसायिकांसोबत नेटवर्किंग करणे आवश्यक आहे,” असे *लिंक्डइन करिअर एक्स्पर्ट व भारतातील वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक निराजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert & India Senior Managing Editor) म्हणाल्या.*
*यंदा रोजगार शोधण्यास सुरूवात करणाऱ्या व्यक्तींसाठी लिंक्डइनच्या टिप्स:*
1. रिक्रूटर्समध्ये तुमची व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी तुमच्या लिंक्डइन प्रोफाइलवर तुमची कौशल्ये दाखवा. लिंक्डइन तुम्ही सूचीबद्ध केलेल्या कौशल्यांचा वापर करत संबंधित रोजगाराबाबत माहिती देईल, ज्याबाबत कदाचित तुम्हाला पूर्वी माहित नसेल.
2. लिंक्डइनच्या ओपन टू वर्क फिचर (Open to Work feature) सह नवीन रोजगार संधींप्रती रूची दाखवा आणि संबंधित ट्रेण्ड्सप्रती तुमचे स्वत:चे कन्टेन्ट पोस्ट करत, तसेच संभाव्य नियोक्त्यांच्या संबंधित कन्टेन्टबाबत जाणून घेत या संधींचा अधिक फायदा घेऊ शकता. तुमचा भावी नियोक्ता कदाचित लवकरच रोजगारासाठी संपर्क साधेल.
3. चौकटीच्या बाहेर विचार करा. तंत्रज्ञानाव्यतिरिक्त वाढते उद्योग उदयास आलेल्या एआयदरम्यान प्रोग्रामिंग कौशल्यांची आवश्यकता असलेल्या पदांसाठी नियुक्ती करत आहेत. रोजगाराचा शोध घेत असताना करिअरला कलाटणीला देणारे यासारखे ट्रेण्ड्स लक्षात ठेवा, ज्यामुळे तुम्हाला अनेक संधी मिळतील. तुमच्या कौशल्यांशी संबंधित लिंक्डइन ग्रुप्समध्ये सामील व्हा. हा नेटवर्क करण्याचा आणि उपलब्ध असलेल्या व्यापक संधींबाबत जाणून घेण्याचा उत्तम मार्ग आहे.
*पदवीधरांना त्यांची कौशल्ये सुधारण्यास मदत करण्यासाठी लिंक्डइन ३० जून २०२४ पर्यंत मोफत लिंक्डइन लर्निंग कोर्सेस् देखील जारी करत आहे:*
● Job hunting for college grads
● Turning an internship into a job
● Professional networking for career starters
● 30-Minute Resume Refresh
● Mastering common interview questions
● Negotiating Your Compensation Package
नवीन पदवीधर भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या उद्योगांमध्ये कशाप्रकारे करिअर घडवू शकतात याबाबत अधिक माहितीसाठी लिंक्डइनचे २०२४ गाइड टू किकस्टार्टींग युअर करिअर वाचा.