मुंबई, १६ ऑगस्ट २०२४: सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी आणि पर्यटन क्षेत्रातील अग्रेसर इंडियन हॉटेल्स कंपनी (IHCL) यंदाच्या स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाला भारताच्या सांस्कृतिक आणि पाककलेतील विविधतेचे उल्लेखनीय प्रदर्शन सादर करत आहे. राष्ट्राच्या समृद्ध परंपरेला सलाम करण्यासाठी म्हणून जिथे परंपरा आणि नावीन्यपूर्णतेचा मिलाफ होतो, अशा गोव्यातील आयएचसीएल च्या वैशिष्ट्यपूर्ण प्रॉपर्टीजमध्ये आनंददायक सादरीकरणाच्या विशेष श्रेणीचा आनंद घ्या.
भारतीय पाककृतीचा वारसा ही प्रादेशिक चव आणि सांस्कृतिक प्रभावांची एक विलक्षण कलाकुसर आहे. प्रत्येक स्वादिष्ट पदार्थ भूतकाळातील एक अनोखी कहाणी सांगतो. आयएचसीएल गोवा येथे या परंपरेचा गौरव एका उत्कृष्ट पाककृती महोत्सवाच्या माध्यमातून केला जातो. त्यात देशभरातील खाद्यपदार्थांवर प्रकाश टाकला जातो. राजधानीच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या पदार्थांपासून ते किनारपट्टीच्या स्वादा पर्यंत स्थानिक घटकपदार्थ, पारंपरिक पद्धती आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कालातीत पाककृतींद्वारे एकत्रित केलेल्या विविध अभिरुचींच्या समृद्ध पाककृतींचा अनुभव घ्या.
रक्षाबंधनाच्या खऱ्या, निरपेक्ष भावनेला जागत मोहक आणि आनंदित करणाऱ्या व काळजीपूर्वक डिझाइन केलेल्या गिफ्ट हॅम्पर्सची निवड करता येईल. पारंपरिक मिठाई, विचारपूर्वक निवडलेल्या भेटवस्तू आणि प्रसंग संस्मरणीय बनविण्यासाठी तयार केलेल्या खास गोष्टी या विशेष डिझाइन केलेल्या मिठाई बॉक्समध्ये आहेत. पणजीमधील विवांता गोवा येथील क्युमीन मनमोहक मेजवानी, सुरेख चॉकलेट्स आणि पर्यावरणपूरक राख्या यांची ऑफर्स सादर करते.
गोव्यातील नयनरम्य स्थळांवर ताज एक्झॉटिका रिसॉर्ट अँड स्पा; ताज सिडेड डी गोवा; ताज फोर्ट अॅगोडा रिसॉर्ट अँड स्पा; ताज हॉलिडे व्हिलेज रिसॉर्ट अँड स्पा; द यलो हाउस, अंजुना- आयएचसीएल SeleQtions; विवांता गोवा, पणजी; विवांता गोवा, मिरामार या ठिकाणी भारतातील समृद्ध स्वाद आणि प्रेमळ बंधनांच्या उत्सवात सामील व्हा.