राष्ट्रीय, नोव्हेंबर: कोस्टा कॉफी या कोका-कोलाच्या भारतातील व्यावसायिक पेय श्रेणींमधील आघाडीच्या ब्रॅण्डला यंदा प्रतिष्ठित बेकर व कन्टेन्ट क्रिएटर शिवेश भाटिया यांच्यासोबत सहयोगाने दिवाळी मोहिम #CostaWaliDiwali लाँच करण्याचा आनंद होत आहे. सहयोगाने ते कॉफीप्रेमींसाठी संस्मरणीय दिवाळी-प्रेरित मेन्यू घेऊन येत आहे. हा सहयोग उल्लेखनीय अनुभवाची खात्री देतो, ज्यामध्ये कोस्टा कॉफीच्या आधुनिक व नाविन्यपूर्णतेला पारंपारिक दिवाळी उत्साहाची जोड देण्यात आली आहे.
विविध फ्लेवर्स आणि दिवाळीच्या उत्सवी उत्साहात कोस्टा कॉफी अभिमानाने ब्लिस्ताचिओ रोझ पेय फॅमिली सादर करत आहे. पारंपारिक भारतीय मिठाईमधून प्रेरणा घेत हे खास कलेक्शन या कालातीत फ्लेवर्सना समकालीन लुक देते, ज्यामधून नाविन्यता दिसून येते. या स्वादिष्ट श्रेणीमध्ये तीन स्वादिष्ट पर्यायांचा समावेश आहे: ब्लिस्ताचिओ रोझ हॉट लॅटे, रिफ्रेशिंग ब्लिस्ताचिओ रोझ आइस कॅप्युचिनो आणि टॅण्टेलायझिंग ब्लिस्ताचिओ रोझ बोबा फ्रॅपे (कॉफीसह किंवा कॉफीशिवाय उपलब्ध).
लिमिटेड-एडिशन ब्लिस्ताचिओ रोझ फॅमिलीच्या लाँचबाबत मत व्यक्त करत कोका-कोला कंपनी येथील कोस्टा कॉफीचे इंडिया अॅण्ड इमर्जिंग इंटरनॅशनलचे जनरल मॅनेजर विनय नायर म्हणाले, ”कोस्टा कॉफीमध्ये आम्ही आमच्या कॉफीच्या माध्यमातून सांस्कृतिक संपन्नता अंगिकारण्याप्रती व प्रशंसित करण्याप्रती समर्पित आहोत. यंदा दिवाळी ब्लिस्ताचिओ रोझ कलेक्शनच्या लाँचसाठी शिवेश भाटिया यांच्यासोबत आमच्या सहयोगामधून ग्राहकांसाठी अद्वितीय अनुभवांची निर्मिती करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. समकालीन सर्जनशीलतेसह परंपरेचे उत्तम संयोजन अद्वितीय फ्लेवरची खात्री देते, जे प्रत्येक कपमध्ये दिवाळीच्या उत्साहाला साजरे करते.”
या लाँचबाबत आपले मत व्यक्त करत प्रतिष्ठित कन्टेन्ट क्रिएटर शिवेश भाटिया म्हणाले, ”मला पेयांच्या उत्साहवर्धक उत्सवी श्रेणीसाठी कोस्टा कॉफीसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. माझ्या मनात खास स्थान असलेल्या, तसेच मी मोठे होत असताना आस्वाद घेतलेल्या फ्लेवर्सचा वापर करत ही श्रेणी तयार करण्याचा अनुभव समाधानकारक आहे. संकल्पना मांडण्यापासून ट्रायल्स करण्यापर्यत आणि शेवटी ब्लिस्तोचिओ श्रेणीचे लाँच पाहण्यापर्यंत अनुभव आनंददायी राहिला आहे, जेथे लोकांमध्ये सर्वोत्तम पेयांच्या माध्यमातून उत्सवी उत्साहाचा प्रसार करण्यात येत आहे.”
दिवाळीच्या उत्साहामध्ये अधिक वाढ करण्यासाठी कोस्टा कॉफीने अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीमधील अत्यंत प्रतिभावान ग्राफिक डिझाइन विद्यार्थी शॅमन सचदेवसोबत सहयोग केला आहे, ज्याअंतर्गत आकर्षक दिवाळी-थीम कॉफी कप्स तयार करण्यात येतील, ज्यामधून उत्सवी उत्साहाप्रती समर्पितता दिसून येते. त्याच्या कलाकृतीमध्ये लक्षवेधक व्हिज्युअल कथानक सामावलेले आहे, जे पारंपारिक दिव्यांची ज्योत कॉफी बीन्समध्ये रूपांतरित करते आणि कोस्टा कॉफीला मानवंदना आहे. कप्समध्ये दिवाळीचा उत्साह आणि परंपरा व नाविन्यतेचे संयोजन करण्याप्रती कटिबद्धता सामावलेले आहे, ज्यांचा अनुभव प्रत्येक कोस्टा कॉफी कपमधून मिळेल.
देशभरातील कॉफीप्रेमींना अपवादात्मक कॉफी अनुभव देण्याप्रती कटिबद्ध असलेल्या कोस्टा कॉफीने नुकतेच नवी दिल्लीमध्ये त्यांच्या १५०व्या स्टोअरचे उद्घाटन केले आहे. सुरू असलेल्या विस्तारीकरण योजनांचा भाग म्हणून कोस्टा कॉफी भारतातील अव्वल ८ ते १० शहरांमध्ये अधिक आऊटलेट्स सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामधून देशभरात ब्रॅण्डची उपस्थिती अधिक दृढ करण्याप्रती त्यांची कटिबद्धता अधिक दृढ होत आहे.