मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४: भारतात पाच हजारांहून अधिक वृद्धाश्रम असले तरी अनेक वृद्धाश्रमांमध्ये मुलभूत सुविधांचा अभाव आहे. आजही १८ दशलक्ष ज्येष्ठ नागरिक बेघर आहेत. वृद्धांची काळजी घेण्यामधील ही मोठी तफावत दूर करण्याच्या उद्देशाने डॉ. बत्रा’ज फाऊंडेशनद्वारे ‘यादों की बहार’ गायन कॉन्सर्टच्या १२व्या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी द शेफर्ड विडोज होममधील वृद्ध विधवांना मदत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे श्री किरण व्ही शांताराम उपस्थित होते.
डॉ. बत्रा आपल्या कौशल्याचा वापर करत वृद्धांना साह्य करतात आणि इतरांना देखील त्यांच्या कौशल्यांसह वृद्धांची काळजी घेण्याप्रती योगदान देण्यास प्रेरित करतात. वृद्ध महिलांचे आरोग्य व स्वास्थ्याप्रती ३० वर्षांपासून कटिबद्ध असलेली डॉ. बत्रा’ज फाऊंडेशन या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व करते, तसेच कॉन्सर्टसह मोफत वैद्यकीय साह्याच्या माध्यमातून पाठिंबा देते.
मुंबईतील नरिमन पॉइण्ट येथील वायबी चव्हाण ऑडिटोरिअममध्ये वार्षिक गायन कॉन्सर्ट ‘यादों की बहार’च्या १२व्या पर्वाचे आयोजन केले. या कॉन्सर्टमध्ये पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी सदाबहार गाणी सादर केली. पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा हे डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष व संस्थापक देखील आहेत.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष व संस्थापक पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, ”मी वृद्धांना आमच्या उत्साहपूर्ण घरांमध्ये सामावून घेण्याचे प्रबळपणे समर्थन करतो आणि आजी-आजोबा दत्तक घेणे ही एक संकल्पना आहे, ज्याची खरी वेळ आली आहे. देशभरातील अनेक वृद्धाश्रमांना पाठिंबा देत ज्येष्ठांच्या कल्याणासाठी योगदान दिल्याचा मला अभिमान आहे. चला तर मग, एकत्र मिळून दयाळूपणासंदर्भात कोणतेच बंधन नसेल असा समाज घडवूया.”