maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपकडून भारतातील पहिले मार्केटप्‍लेस स्कॅनमायट्रिप डॉटकॉम लाँच

मुंबई, २० सप्टेंबर २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने भारतातील पहिले मार्केटप्‍लेस स्कॅनमायट्रिप डॉटकॉम लाँच केले आहे. ओएनडीसी नेटवर्कवर प्रवास सेवांची विक्री करण्‍यासोबत खरेदी करणारी इझमायट्रिप पहिली ओटीए देखील ठरली आहे. नवीन उत्‍पादन स्कॅनमायट्रिप डॉटकॉम ओटीए, एमएसएमई, ट्रॅव्‍हल एजंट्स आणि होमस्‍टेना त्‍यांच्‍या ऑफरिंग – फ्लाइट्स, हॉटेल्‍स व होमस्‍टे ओएनडीसी नेटवर्कवर सूचीबद्ध करत सक्षम करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले मार्केटप्‍लेस आहे. तसेच त्‍यांना व्‍यापक डिजिटल मार्केटप्‍लेस देखील उपलब्‍ध होईल.

इझमायट्रिपचा ओएनडीसी नेटवर्कसोबतचा सहयोग प्रवास व पर्यटन क्षेत्रातील व्‍यवसायांना ओएनडीसी प्रदान करणाऱ्या डिजिटल पायाभूत सुविधांचा फायदा घेण्‍याची सुविधा देईल, तसेच लहानात लहान सेवा प्रदात्‍यांना व्‍यापक ग्राहकवर्गाशी संलग्‍न होण्‍यास सक्षम करेल. स्कॅनमायट्रिप डॉटकॉम ऑनबोर्डिंग प्रक्रिया सोपी करते, ज्‍यामुळे व्‍यवसायांना प्रवाशांशी सहजपणे कनेक्‍ट होता येते आणि ऑनलाइन मार्केटप्‍लेसमध्‍ये स्‍पर्धा करता येते.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी म्‍हणाले, ”आम्‍हाला भारतातील पहिले तंत्रज्ञान डिझाइन करण्‍याचा आनंद होत आहे, जे आम्‍हाला हजारो प्रवास सेवा प्रदात्‍यांच्‍या मुलभूत आव्‍हानांचे निराकरण करण्‍यास सक्षम करेल. ओएनडीसी नेटवर्क ScanMyTrip.com एकीकृत करत आम्‍ही खात्री घेत आहोत की, होमस्‍टेपासून एमएसएमईंपर्यंत इकोसिस्‍टममधील प्रत्‍येक प्रवास सेवा प्रदात्‍याला स्‍पर्धात्‍मक डिजिटल बाजारपेठेत प्रगती करण्‍याची संधी मिळेल. आमचा सर्व आकारांच्‍या व्‍यवसायांना प्रगत डिजिटल टूल्‍स उपलब्‍ध करून देण्‍याचा, तसेच प्रगती करण्‍यासोबत नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे.”

ओएनडीसीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. थम्‍पी कोशी म्‍हणाले, ”इझमायट्रिपचा ओएनडीसी नेटवर्कसोबत सहयोग अधिक सर्वसमावेशक आणि पारदर्शक प्रवास इकोसिस्‍टम डिझाइन करण्‍याप्रती आमच्‍या मिशनमधील महत्त्वाचा क्षण आहे. यामुळे एमएसएमई व लघु होमस्‍टेसाठी संधी वाढण्‍यासोबत सर्व सहभागींकरिता समान मार्केटप्‍लेस आणण्‍यास आणि उत्तम स्‍पर्धेला चालना देण्‍यास मदत देखील होईल. हे प्रवास अनुभव आणि त्‍याद्वारे सर्वांसाठी एकूण ई-कॉमर्स सुव्‍यवस्थित व लोकशाहीकरण करण्‍याच्‍या आमच्‍या मिशनशी संलग्‍न आहे.”

या वर्षाच्‍या सुरूवातीला इझमायट्रिपने ‘ओएनडीसी स्‍टार्टअप महोत्‍सवा’दरम्‍यान ओएनडीसीसोबत लेटर ऑफ इण्‍टेण्‍टवर स्‍वाक्षरी केली, ज्‍यामुळे इझमायट्रिप डिजिटल क्रांतीचा भाग बनली आहे, जी ओएनडीसी ईकॉमर्स इकोसिस्‍टममध्‍ये घडवून आणत आहे. इझमायट्रिपद्वारे नेतृत्वित या सहयोगामधून सर्वसमावेशक विकासाला चालना देण्‍याप्रती आणि पर्यटन उद्योगामध्‍ये नाविन्‍यपूर्ण डिजिटल सोल्‍यूशन्‍स आणण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते.

Related posts

आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपची ऑफिशियल बेव्‍हरेज सहयोगी थम्‍स अपकडून मोहिम ‘थम्‍स अप उठा, इंडिया इंडिया मचा’ लाँच

Shivani Shetty

कोका-कोलाकडून आइस्‍ड ग्रीन टी ‘ऑनेस्‍ट टी’ लाँच

Shivani Shetty

Mobil 1 50वीं वर्षगांठ: आगे के लिए तैयार

Shivani Shetty

Leave a Comment