maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

केकाकडून भारतातील सर्वात मोठ्या व्‍हर्च्‍युअल एचआर परिषदेचे आयोजन

मुंबई, १८ डिसेंबर २०२३: भारतातील आघाडीचं एचआर टेक व्‍यासपीठ केकाने नुकताच दोन दिवसीय इव्‍हेण्‍ट एचआर कॅटालिस्‍ट २.० या भारतातील सर्वात मोठ्या व्‍हर्च्‍युअल एचआर परिषदेचे समापन केले, जेथे सर्वोत्तम इंटेलेक्‍चुअल अनुभव मिळण्‍यासह उद्योगातील प्रमुखांनी अत्‍यंत महत्त्वपूर्ण एचआर विषयांवर माहितीपूर्ण चर्चा केली. सहयोगी क्‍लीअरसाइट, नोव्‍हा बेनीफिट्स आणि स्‍प्रिंगवर्क्‍स यांच्‍यासोबत सहयोगाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या समिटमध्‍ये ५० हून अधिक प्रवक्‍ते एकत्र आले आणि त्‍यांनी १७ विविध विषयांवरील त्‍यांचे कौशल्‍य शेअर केले. २३,००० नोंदणींसह १० देशांमधील ८००० हून अधिक व्‍यावसायिकांनी वेबिनार्समध्‍ये सहभाग घेतला.

परिषदेच्‍या सुरूवातीला रिलायन्‍स येथील ह्युमन रिसोर्सेसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष हरजीत खंडुजा यांनी ‘बीहाइण्‍ड द स्‍माइल: द सायलण्‍ट कॉस्‍ट ऑफ फेकिंग इमोशन्‍स अॅट वर्क’ या विषयावर प्रमुख भाषण केले, तसेच कामाच्‍या ठिकाणी दुर्लक्ष केले जाणाऱ्या भावनांच्‍या पैलूंवर प्रकाश टाकला. इव्‍हेण्‍टच्‍या उत्तरार्धात क्‍लीअरसाइटच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी जोसेफिन ग्रुम यांनी ‘एसेन्शियल्‍स ऑफ बिल्डिंग अॅन एचआर टीम’वरील विचारशील पॅनेल चर्चासत्राचे नेतृत्‍व केले. केका एचआर येथील परफॉर्मन्‍स मॅनेजमेंटचे प्रोसेस कोच क्षितिज साचन यांनी ‘गोल सेटिंग हॅक्‍स’वर इंटरअॅक्टिव्‍ह वर्कशॉपचे आयोजन करण्‍यासह दिवसाची सांगता झाली, जेथे एचआर व्‍यवस्‍थापनामध्‍ये ध्‍येय स्‍थापित करण्‍याच्‍या प्रभावी धोरणांसाठी व्‍यावहारिक मार्गदर्शन करण्‍यात आले.

परिषदेच्‍या दुसऱ्या दिवसाची सुरूवात ‘हाऊ एचआर हेड्स कॅन बीकम सीईओ’ या विषयावर प्रमुख पॅनेल चर्चेसह झाली, ज्‍यामध्‍ये नोव्‍हा बेनीफिट्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व संस्‍थापक सारांश गर्ग, एसआयएक्‍सटी रिसर्च अॅण्‍ड डेव्‍हलपमेंट, इंडियाचे को-सीईओ सुमंत बीएस आणि केका एचआरचे कम्‍युनिकेशन्‍स मॅनेजर डॉ. निशांत अफझल यांचा समावेश होतात. या पॅनेल चर्चेमध्‍ये एचआर लीडरशीपवरून सीईओ बनण्‍यापर्यंतच्‍या प्रवासाबाबत चर्चा करण्‍यात आली, तसेच कार्यकारी पदांवर काम करण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या एचआर व्‍यावसायिकांना बहुमूल्‍य मार्गदर्शन करण्‍यात आले.

इतर आकर्षण होते ‘एम्‍प्‍लॉयी ऑटोनॉमी व्‍हर्सेस मायक्रोमॅनेजेमेंट’वरील सर्वसमावेशक पॅनेल चर्चा, ज्‍यामध्‍ये टॉपलिन येथील पीपील सक्‍सेस अॅण्‍ड कम्‍युनिटीचे संचालक मोहम्‍मद सुफियान सैत यांचा समावेश होता. सहभागींना कामाच्‍या ठिकाणी स्‍वायत्तता व सूक्ष्‍म व्‍यवस्‍थापनादरम्‍यान योग्‍य संतुलन राखण्‍याबाबत बहुमूल्‍य माहिती मिळाली. स्प्रिंगवर्क्‍सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कार्तिक मंदाविले यांनी होस्‍ट केलेल्‍या फायरसाइड चॅटमध्‍ये’एक्झिट इंटरव्‍ह्यूज, ऑफबोर्डिंग अॅण्‍ड रिटेशन स्‍ट्रॅटेजीज’ या विषयावर चर्चा करण्‍यात आली, ज्‍यामध्‍ये कंपनीमध्‍ये राजीनामा देण्‍याचा निर्णय घेतलेल्‍यांकडून शिकवण घेत उत्तमप्रकारे मार्गदर्शन करण्‍यात आले.

“आम्‍हाला एचआर कॅटालिस्‍ट २.० ला मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादाचा आनंद होत आहे,”असे केका एचआर येथील विक्रीचे उपाध्‍यक्ष धीरज पांडे म्‍हणाले. “ परिषदेत एचआरमधील सर्वोत्तम विचारवंतांना एकत्र आणले, अर्थपूर्ण चर्चा करण्‍यात आल्‍या आणि माहिती व नेटवर्किंगसाठी व्‍यासपीठ प्रदान केले. आम्‍ही या इव्‍हेण्‍टला भव्‍य यशस्‍वी करण्‍यासाठी आमचे सहयोगी, प्रवक्‍ते व उपस्थितांचे आभार व्‍यक्‍त करतो.”

 

Related posts

कॅम्पस ऍक्टिव्हवेअर हे नवीन *BIS परवाना प्राप्त करणारे पहिले फुटवेअर उत्पादक

Shivani Shetty

सॅमसंगकडून भारतातील गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टम अनुभवामध्‍ये वाढ; गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजसाठी प्री-बुकिंगची घोषणा

Shivani Shetty

बीएलएस ई-सर्विेसेस लिमिटेडच्या महसूलात वार्षिक २५.७ टक्क्यांची वाढ

Shivani Shetty

Leave a Comment