maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ओबेन इलेक्ट्रिकची ‘रॉर ईझी’ ७ नोव्हेंबरला लाँच होणार

मुंबई, १ नोव्हेंबर २०२४: भारतातील अग्रगण्य घरगुती इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांपैकी एक असलेल्या ओबेन इलेक्ट्रिकने आपल्या ७ नोव्हेंबर २०२४ रोजी लाँच होणार असलेल्या बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक मोटारसायकल रॉर ईझी (Rorr EZ)चा एक रोमांचक टीझर लाँच केला आहे. दैनंदिन प्रवासी सेगमेंटमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या रॉर ईझीने यथास्थितीला आव्हान देण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये नावीन्य आणि उत्साहाची नवीन लाट येईल.

 

तपशील अद्याप उघड करण्यात आला नसला तरी, रॉर ईझमध्ये सुविधा, डिझाइन, कामगिरी, आणि आराम यांची निर्बाधपणे सांगड घातली जाईल आणि बाईकर्सना भेडसावणार् या विशिष्ट अडचणीच्या मुद्द्यांचे निराकरण केले जाईल अशी अपेक्षा आहे. रॉर ईझीसह, ओबेन इलेक्ट्रिकचे उद्दीष्ट हे, दैनंदिन प्रवासाचा अनुभवात सुधारणा करणे आणि इलेक्ट्रिक प्रवासाचे भविष्य पुन्हा परिभाषित करणे आहे. ईझीमध्ये अत्याधुनिक पेटंटेड उच्च-कार्यक्षमता एलएफपी बॅटरी तंत्रज्ञान असेल, जे भारताच्या वैविध्यपूर्ण हवामानात असाधारण उष्णता प्रतिरोध, दीर्घायुष्य आणि विश्वासार्हतेसाठी ओळखले जाते. ओबेन इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक टू-व्हीलर्समध्ये एलएफपी केमिस्ट्री बॅटरीमध्ये अग्रगण्य कामगिरी केली आहे, जेणेकरून ही बाब सुनिश्चित केली गेली आहे की, बाईक्स, उच्च सुरक्षा मानके राखत इष्टतम कामगिरी प्रदान करतील.

 

ओबेन इलेक्ट्रिकच्या यशामागे संशोधन आणि विकासाप्रती असलेली अतूट बांधिलकी आहे. संशोधन आणि विकासापासून बॅटरी, मोटर्स, वाहन नियंत्रण युनिट्स आणि फास्ट चार्जर सारख्या महत्त्वपूर्ण घटकांच्या उत्पादनापर्यंत ब्रँडचा पूर्णपणे इन-हाऊस दृष्टिकोन हा, अचूकता, गुणवत्ता आणि बाजारातील बदलांना त्वरित प्रतिसाद सुनिश्चित करतो. तसेच, ओबेन केअरने विक्रीनंतर सर्वसमावेशक सहाय्य प्रदान केल्याने, रॉर ईझी केवळ एक उत्कृष्ट रायडिंग अनुभवच नव्हे तर मालकीच्या निर्बध प्रवासाचे आश्वासन देते.

Related posts

नेस्‍ले इंडियाकडून बहुप्रतिक्षित नेस्‍प्रेसो लाँच

Shivani Shetty

IMDbच्या Popular Indian Celebrities यादीत शर्वरीने पटकावले प्रथम स्थान

Shivani Shetty

सॅमसंग इंडियाकडून एआय पॉवर्ड वैशिष्‍ट्ये असलेले ओडीसी ओएलईडी, व्‍ह्यूफिनिटी आणि स्‍मार्ट मॉनिटर्सची २०२४ लाइनअप लाँच

Shivani Shetty

Leave a Comment