मुंबई, १८ डिसेंबर २०२३: त्वचेचे पोषण व संरक्षण करणाऱ्या उत्पादनांसह पॅम्परिंगचा अनुभव देण्यासाठी द बॉडी शॉप या ब्रिटन-स्थित आंतरराष्ट्रीय एथिकल ब्युटी ब्रॅण्डने त्याच्या वार्षिक लिमिटेड एडिशन ख्रिसमस बॉडी केअर कलेक्शनची घोषणा केली आहे. द बॉडी शॉपचे ख्रिसमस कलेक्शन निश्चितच तुमच्या त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासह ती कोमल व तेजस्वी करेल. या लिमिटेड एडिशन कलेक्शनमध्ये दोन श्रेणी आहेत – चेरीज अॅण्ड चेरी आणि पीअर्स अॅण्ड शेअर. या दोन्ही श्रेणी वेगन-प्रमाणित आहेत. उत्पादने आता रिसायक्लेबत पॅकेजिंगमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामधून पृथ्वी आणि पृथ्वीवरील अधिवासांचे संरक्षण करण्याप्रती द बॉडी शॉपची कटिबद्धता दिसून येते. या दोन कलेक्शन्सबाबत अधिक माहिती पुढे देण्यात आली आहे.
चेरीज अॅण्ड चीअर: शॉवर जेल, बॉडी बटर, बॉडी ऑईल, हँड बाम, लिप बाम व बॉडी मिस्ट यांचा समावेश असलेले द बॉडी शॉपचे चेरीज अॅण्ड चीअर कलेक्शन तुम्हाला उबदार व फ्रूटी चेरीजचा उत्साहवर्धक सुगंध देण्यासह त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. या सुगंधामध्ये चेरी, स्वीट आल्मंड मिल्क व पीओनी यांचा समावेश आहे. तसेच या सुगंधित मिश्रणामध्ये व्हॅनिला व मस्कचा देखील समावेश आहे.
पहिल्यांदाच द बॉडी शॉपने आपल्या चेरीज अॅण्ड चीअर कलेक्शनमध्ये दोन लक्षवेधक उत्पादनांची भर केली आहे – नरीशिंग बॉडी अॅण्ड मसाज ऑईल आणि बॉडी अॅण्ड स्पेस मिस्ट. नरीशिंग बॉडी अॅण्ड मसाज ऑईल त्वचेला पोषण देण्यासह उत्साहवर्धक व सुगंधी अनुभव देते. दुसरीकडे, बॉडी अॅण्ड स्पेस मिट हे बहुउद्देशीय सेंट स्प्रे आहे, जो चालता-फिरता फ्रॅग्रन्स म्हणून किंवा घरामध्ये उत्सवी उत्साह निर्माण करण्यासाठी वापरता येऊ शकतो. या सेटची ४,२७५ रूपये आहे.
पीअर्स अॅण्ड शेअर: द बॉडी शॉपच्या लिमिटेड एडिशन पीअर्स अॅण्ड शेअर कलेक्शनमध्ये बॉडी स्क्रब, ब्रॅण्डचे आयकॉनिक बॉडी योगर्ट व बॉडी बटर, हँड क्रीम, लिप स्क्रब आणि फ्रॅग्रन्स मिस्ट आहे. हे सर्व डोक्यापासून पायापर्यंत टीएलसी देतात. ज्यूसी पीअर्सचा आल्हाददायी व सुगंधित अनुभव देत हे गूडीज तुम्हाला यंदा सुट्टीच्या सीझनमध्ये स्वत:ची काळजी घेण्यास प्रेरित करतील. कलेक्शनमधील प्रमुख आकर्षण असलेले पीअर्स अॅण्ड शेअर फ्रॅग्रन्स मिस्ट वैविध्यपूर्ण सेंट आहे, ज्यामध्ये पीअरच्या अर्कसह स्लो बेरी, पेओनी व स्ट्रॉबेरी सोर्बट यांचे मिश्रण आहे, तर मस्क व टोन्का बीन नोट्स मोहकपणा निर्माण करतात. यामधील सुगंध हिवाळ्यातील थंडाव्यामधून फेरफटका मारण्याची भावना जागृत करतो. या सेटची किंमत ६,१२० रूपये आहे.
परिवर्तन घडवून आणणारा ब्युटी ब्रॅण्ड द बॉडी शॉप विश्वामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याप्रती समर्पित आहे. चेरीज अॅण्ड चीअर आणि पीअर्स अॅण्ड शेअर कलेक्शन्स ग्राहकांना यंदाच्या सुट्टीच्या सीझनमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याप्रती योगदान देण्याची अतिरिक्त संधी देतात. फ्रॅग्रन्स मिस्ट आणि बॉडी अॅण्ड स्पेस मिस्ट यांना वगळता या लिमिटेड-एडिशन सेट्समधील प्रत्येक उत्पादनामध्ये द बॉडी शॉपच्या कम्युनिटी फेअर ट्रेड (सीएफटी) उपक्रमाच्या माध्यमातून स्रोत मिळवलेल्या घटकांचा समावेश आहे.