maharashtraprimenews
ठळक बातम्या
मनोरंजनसार्वजनिक स्वारस्य

जिओ स्टुडिओजच्या “द स्टोरीटेलर” चित्रपटाचा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI)भव्य प्रीमियर

बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये तसेच अनेक नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये यशाची मोहोर उमटवल्या नंतर, जिओ स्टुडिओजचा चित्रपट “द स्टोरीटेलर” आता इफ्फी महोत्सवात (IFFI) अधिकृतपणे निवडला गेला आहे आणि काल संध्याकाळी गोव्यात ह्या चित्रपटाचे एक भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आले होते ज्यात चित्रपटाचे निर्माते आणि प्रमुख कलाकारही उपस्थित होते.

आपला उत्साह शेअर करताना *परेश रावल* म्हणतात, “द स्टोरीटेलर हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे. तो इफ्फी स्पर्धेत सादर केल्यामुळे आणखीनच खास बनतो. प्रेक्षकांचा प्रतिसाद जबरदस्त आणि नम्र होता. दिग्गज रे यांनी लिहिलेल्या कथेवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल अनंत महादेवन यांचा मी आभारी आहे. अनुभवी सहकलाकार आणि सगळ्याच टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता.

अनंत महादेवन दिग्दर्शित, पर्पज एंटरटेनमेंट आणि क्वेस्ट फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित, या चित्रपटात पॉवरहाऊस अभिनेते परेश रावल, आदिल हुसेन, तन्निष्ठ चॅटर्जी, जयेश मोरे, अनिंदिता बोस आणि रेवती यांच्या भूमिका आहेत.

हा चित्रपट दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या एका लघुकथेवर आधारित आहे, ही एका धनाढ्य व्यावसायिकाची कथा आहे जो त्याच्या निद्रानाशावर मात करण्यासाठी एका कथाकाराची नियुक्ती करतो, ह्यात खूप सारे ट्विस्ट आणि वळणे समाविष्ट असल्याने हि कथा अधिक आकर्षित बनते. मूळ बंगाली लघुकथा गोलपो बोलिये तारिणी खुरो ही रे यांनी लिहिलेल्या कथांच्या मालिकेपैकी एक आहे, जी तारिणी खुरो यांनी तयार केलेल्या रहस्यमय पात्रावर आधारित आहे.

Related posts

हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच पडद्यावर

Shivani Shetty

आता फिजिक्स वाला विद्यार्थ्यांना देणार एमपीएससीचे प्रशिक्षण

Shivani Shetty

अलिबागमधील आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट, तिघांचा मृत्यू; स्फोटाचे कारण अस्पष्ट

cradmin

Leave a Comment