maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

येत्या वर्षात मोठ्या सदनिकांसह लक्‍झरी राहणीमानाला भारतीयांची पसंती: हाऊसिंग डॉटकॉम

मुंबई, २८ डिसेंबर २०२३: येत्या वर्षात मोठ्या सदनिकांसाठी तसेच लक्झरी राहणीमानाला भारतीयांची अधिक पसंती असल्याचे हाऊसिंग डॉटकॉमच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. २०२४ मध्‍ये भारतातील निवासी रिअल इस्‍टेट क्षेत्राच्‍या अपेक्षित सातत्‍यपूर्ण विकासासाठी मुंबई, पुणे व हैदराबाद ही शहरे अग्रणी राहतील. ऑनलाइन गृहखरेदीदारांच्‍या अॅक्टिव्हिटीच्‍या व्‍यापक डेटा विश्‍लेषणाचा फायदा घेत हा अहवाल मांडण्यात आला आहे. मुंबई, पुणे व हैदराबाद ही शहरे व्‍यापक बाजारपेठ क्रियाकलापांचे मुख्‍य केंद्र ठरली असून आगामी महिन्‍यांमध्‍ये या क्षेत्राच्‍या विकासाला मोठ्या प्रमाणात आकार देण्‍यास सज्ज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मोठ्या सदनिकांसाठी वाढती मागणी: मोठ्या सदनिकांसाठी, विशेषत ३+ बीएचके सदनिकांसाठी ट्रेण्‍डला गती मिळत आहे. या एैसपैस लेआऊट्ससाठी शोधांच्‍या चौकशीमध्‍ये २०२३ मध्‍ये वार्षिक सहापट वाढ झाली आहे, ज्‍यामधून मोठ्या राहणीमानाप्रती वाढता कल दिसून येतो.

लक्‍झरी राहणीमानाला अधिक पसंती: २०२४ साठी उच्‍च-स्‍तरीय सदनिकांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. विशेषत: १ ते २ कोटी व त्‍यावरील किमतीच्‍या लक्‍झरी सदनिकांसाठी मागणी २०२४ मध्‍ये वाढण्‍याची अपेक्षा आहे. या विभागासाठी २०२३ मध्‍ये वार्षिक ऑनलाइन मालमत्ता शोध आकारमानामध्‍ये उल्‍लेखनीय ७.५ पट वाढ दिसण्‍यात आली आहे.

मुंबईमध्ये राहण्यासाठी सर्वाधिक शोधण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये मालाड (पश्चिम), कांदिवली (पश्चिम), बोरिवली (पश्चिम), मीरा रोड (पूर्व) आदींचा समावेश आहे तर पुण्यात राहण्यासाठी सर्वाधिक मागणी वाकड, वाघोली, बाणेर या ठिकाणांना आहे.

द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमधील रेंटल बाजारपेठ आणि उदयोन्‍मुख ट्रेण्‍ड्स: ऑनलाइन सर्च ट्रेण्‍ड्समधून निदर्शनास येते की २०२४ मध्‍ये विशेषत: गुरूग्राम, मुंबई, बेंगळुरू आणि पुणे येथील रेंटल बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍याचे श्रेय पुन्‍हा कार्यालयात कामावर परतण्‍याच्‍या धोरणांना जाते. २०२३ मध्‍ये या शहरांच्‍या प्रमुख क्षेत्रांमधील भाडेदरात महामारीपूर्वीच्‍या किमतीच्‍या तुलनेत २५ ते ५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

तसेच, द्वितीय श्रेणीची शहरे जसे जयपूर, इंदौर, लखनौ, मोहाली आणि वडोदरा निवासी अॅक्टिव्हिटींसाठी लक्षणीय बाजारपेठा म्‍हणून उदयास आली आहेत. यामधून खरेदीसाठी ऑनलाइन मालमत्ता शोध आकारमानामध्‍ये त्‍यांची सर्वोच्‍च वार्षिक वाढ दिसून येते.

गेटेड समुदाय आणि कंझ्युमर सेण्टिमेंटचे महत्त्व: रेडी-टू-मूव्‍ह-इन मालमत्तांसह गेटेड समुदाय २०२४ मध्‍ये गृहखरेदीमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावण्‍याची अपेक्षा आहे. कंझ्युमर सेण्टिमेंट आऊटलुकनुसार, बहुतांश गृहखरेदीदार प्रत्‍यक्ष विकासकांकडून घर खरेदी करण्‍याला प्राधान्‍य देतात. यामधून रिसेल मालमत्तांच्‍या तुलनेत नवीन मालमत्ता विकासांप्रती विश्‍वास दिसून येतो.

हाऊसिंग डॉटकॉम, प्रॉपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे ग्रुप सीईओ श्री. ध्रुव अगरवाल म्‍हणाले, “अपवादात्‍मक विकास व स्थिरतेमुळे २०२३ हे भारतातील रिअल इस्‍टेट क्षेत्रासाठी उल्‍लेखनीय वर्ष राहिले आहे. व्‍याजदरांमध्‍ये वाढ आणि जागतिक अनिश्चितता अशी आव्‍हाने असताना देखील क्षेत्राने दृढता दाखवली आहे. आरबीआयने एप्रिलमध्‍ये व्‍याजदर न वाढवण्‍याचा घेतलेला निर्णय, तसेच महामारीनंतर मागणीमधील वाढीने ग्राहकांचा आत्‍मविश्‍वास वाढवला आहे. विविध बाजारपेठ विभागांमध्‍ये निवासी मागणीत उल्‍लेखनीय वाढ दिसून येत आहे, ज्‍यामधून २०२४ उत्तम वर्ष ठरण्‍याची अपेक्षा आहे.”

हाऊसिंग डॉटकॉम, प्रॉपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमच्या संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूद म्‍हणाल्‍या, “वर्ष २०२४ क्षेत्राला प्रगतीच्‍या दिशेने नेण्‍यास उत्तमरित्‍या सज्‍ज आहे. आम्‍ही मालमत्ता खरेदी व भाड्याने देण्‍यामध्‍ये उत्तम गती असण्‍याची अपेक्षा करतो. आमच्‍या आयरिस इंडेक्‍समधून आगामी मागणी दिसून येण्‍यासह उल्‍लेखनीय वाढ निदर्शनास येते. मालमत्ता किमतींमध्‍ये कोविडपूर्व किमतींच्‍या तुलनेत १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आणि सेवा उद्योगांच्‍या कार्यसंचालनामुळे शहरांच्‍या प्रमुख क्षेत्रांमध्‍ये मासिक भाडेदरात २५ ते ५० टक्‍क्‍यांची वाढ झाली. आम्‍ही अपेक्षा करतो की, २०२४ साठी ही वाढ फक्‍त मेट्रो शहरांपर्यंत मर्यादित न राहता नवीन आर्थिक व रिअॅल्‍टी एपिकसेंटर असलेल्‍या द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये देखील दिसून येईल.”

Related posts

फिजिक्‍सवालाची भारतातील विद्यार्थ्‍यांसाठी ५० लाख रूपयांच्‍या स्‍कॉलरशिपची घोषणा

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून चंदिगडमध्‍ये अत्‍याधुनिक रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन

Shivani Shetty

डिजिटल पर्यवेक्षण आणि बीएफएसआयमधील सायबर सुरक्षितता

Shivani Shetty

Leave a Comment