maharashtraprimenews
ठळक बातम्या
महाराष्ट्र

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), मुंबई ठरले कमिन्‍स इंडिया रिडिफाइन 2023 बी-स्‍कूल केस स्‍टडी स्‍पर्धेचे विजेते

भारत: देशातील अग्रगण्यांपैकी एक असलेली पॉवर सोल्‍यूशन्‍स टेक्‍नॉलॉजी प्रोव्‍हायडर कमिन्‍स इंडियाने आज त्‍यांची फ्लॅगशिप बी-स्‍कूल केस स्‍टडी कॉम्‍पीटिशन – रिडिफाइन 2023 च्‍या विजेत्‍यांची घोषणा केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), मुंबई मधील उल्‍लेखनीय टीम व्हिज़न स्‍पर्धेची विजेती ठरली, त्‍यांना प्रतिष्ठित ट्रॉफी व रोख बक्षीसासह सन्‍मानित करण्‍यात आले. एस पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई मधील टीम कमबॅक ला रनर्स-अप पुरस्‍कारासह गौरविण्‍यात आले. दोन्‍ही विजेत्‍या टीम्‍सची कमिन्‍स इंडिया लीडरशीपसह समृद्ध मेन्‍टोरशीप प्रोग्राममध्‍ये देखील नोंदणी करण्‍यात येईल.
‘अनलॉकिंग द पॉवर ऑफ डिजिटलायझेशन इन द आफ्टरमार्केट’ थीम असलेल्‍या यंदाच्‍या वार्षिक स्‍पर्धेच्‍या पर्वामध्‍ये देशातील 18 प्रिमिअम बी-स्‍कूल्‍सचे प्रतिनिधीत्‍व करणाऱ्या 938 टीम्‍समधील 3752 विद्यार्थ्‍यांचा सहभाग दिसण्‍यात आला. प्रखर मूल्‍यांकन फेऱ्यांना पार करत सहा फायनालिस्‍ट टीम्‍सना निवडण्‍यात आले. या सहा टीम्‍स दोन दिवसीय ग्रॅण्‍ड फिनालेमध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी पुण्‍यामध्‍ये आल्‍या. इव्‍हेण्‍टमध्‍ये उत्‍साहवर्धक नेतृत्‍वविषयक चर्चा व नेटवर्किग संधी, कमिन्‍स टेक्निकल सेंटर इंडिया व कोथरूड इंजिन प्‍लाण्‍टचे विशेष दौरे यांचा समावेश होता. कमिन्‍स इंडिया ऑफिस कॅम्‍पस (आयओसी) येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या ज्‍यूरी मूल्‍यांकन फेरीसह इव्‍हेण्‍टची सांगता झाली.
ग्रॅण्‍ड फिनाले सेरेमनीमध्‍ये फायनालिस्‍ट्सनी कमिन्‍स इंडियामधील ज्‍यूरी सदस्‍यसांच्‍या पॅनेलसमोर त्‍यांचे सोल्‍यूशन्‍स सादर केले. या पॅनेलमध्‍ये ह्युमन रिसोर्सेस् लीडर अनुपमा कौल, स्‍ट्रॅटेजी लीडर सुब्रमण्‍यन चिदंबरन आणि डिस्ट्रिब्‍युशन बिझनेस युनिट अॅण्‍ड न्‍यू अॅण्‍ड रिकॉन पार्ट्स ऑर्गनायझेशनचे व्‍हाइस प्रेसिडण्‍ट विवेक मलापती हे मान्‍यवर होते. या इव्‍हेण्‍टला कंपनीचे वरिष्‍ठ लीडर्स व कर्मचारी देखील उपस्थित होते.
याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत कमिन्‍स इंडियाच्‍या एचआर लीडर, अनुपमा कौल म्‍हणाल्‍या, ”सर्व विजेते, फायनालिस्‍ट्स आणि सहभागींचे त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय योगदानासाठी मन:पूर्वक अभिनंदन. त्‍यांच्‍यामुळे रिडिफाइनला सलग सातव्‍या वर्षी उल्‍लेखनीय यश मिळाले आहे. विद्यार्थ्‍यांना सर्जनशीलता व भविष्‍यकालीन सोल्‍यूशन्‍ससह वास्‍तविक विश्‍वातील व्‍यवसाय आव्‍हानांचा सामना करण्‍यास आणि त्‍यांचे निराकरण करण्‍यास प्रेरित करण्‍यासाठी रिडिफाइन डिझाइन करण्‍यात आले आहे. या वार्षिक इव्‍हेण्‍टमधून तरूणांना निपुण करण्‍यासह ग्रोथ माइण्‍डसेटला चालना देण्‍याप्रती कमिन्‍स इंडियाचा संपन्‍न वारसा दिसून येतो. ज्‍यूरी सदस्‍य म्‍हणून मला उदयोन्‍मुख तरूण प्रतिभांनी सादर केलेले अपवादात्‍मक टॅलेंट व कल्‍पकता पाहण्‍याचा विशेषाधिकार मिळाला. स्‍पर्धा करणाऱ्या टीम्‍सनी सादर केलेले आधुनिक सोल्‍यूशन्‍स आणि सर्जनशील माहिती सर्वोत्तम होत्‍या. यामधून भावी प्रमुखांच्‍या अविश्‍वसनीय क्षमतांवरील आमचा प्रबळ विश्‍वास अधिक दृढ झाला आहे.”
कमिन्‍स इंडियाचे स्‍ट्रॅटेजी लीडर सुब्रमण्‍यन चिदंबरन म्‍हणाले, ”रिडिफाइनचा महत्त्वाकांक्षी व्‍यवसाय प्रमुखांना गुंतागूंतीच्‍या व्‍यवसाय स्थिती सादर करण्‍याचा, सर्जनशीलता व क्षमतेसह वास्‍तविक विश्‍वातील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी त्‍यांच्‍या बुद्धीकौशल्‍याला चालना देण्‍याचा मनसुबा आहे. वर्षानुवर्षे रिडिफाइन आम्हाला व्‍यवसाय विश्‍वातील उज्‍ज्‍वल विचारवंत आणि भावी सिताऱ्यांशी संलग्‍न होण्‍याची बहुमूल्‍य संधी देत आहे. त्‍यांची नाविन्‍यपूर्ण विचारसरणी व दूरदर्शी सोल्‍यूशन्‍स आमच्‍यासाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत. रिडिफाइन 2023 च्‍या विजेत्‍या टीम्‍सनी अॅनालिटिकल स्किल्‍ससह स्‍ट्रॅटेजिक थिंकिंग आणि सुस्‍पष्‍टता व अचूकतेसह त्‍यांचे सोल्‍यूशन्‍स सादर करण्‍याची अपवादात्‍मक क्षमता देखील दाखवली. मी विजेत्‍यांना मन:पूर्वक शुभेच्‍छा देतो आणि ही कॉम्‍पीटिशन सर्व सहभागींसाठी संपन्‍न अनुभव ठरली असेल, अशी आशा व्‍यक्‍त करतो.”
ग्रॅण्‍ड फिनालेकडे वाटचाल करत कंपनीने विद्यार्थ्‍यांशी संलग्‍न राहण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या जिज्ञासू वृत्तीला चालना देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले अनेक उपक्रम राबवले. कमिन्‍स इंडियाने रिडिफाइन व्हिडिओ पॉडकास्‍ट REDEFINE video podcast चे देखील आयोजन केले, ज्‍यामध्‍ये ज्‍यूरी सदस्य विवेक मलापती आणि सुब्रमण्‍यन चिदंबरन हे सामील होते. पॉडकास्‍टने आफ्टरमार्केट डिस्ट्रिब्‍युशन नेटवर्कच्‍या गुंतागूंतींना आणि ऑन-हायवे डिस्ट्रिब्‍युशनच्‍या ऑपरेशनल डायनॅमिक्‍सना दाखवले, तसेच यंदाच्‍या केस स्‍टडी थीमवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्‍यांना कंपनीचे मिशन, व्हिज़न, बिझनेस स्‍ट्रॅटेजी आणि टेक्‍नॉलॉजीची ओळख करून देण्‍यासाठी इंटरअॅक्टिव्‍ह लीडरशीप सेशनचे आयो‍जन करण्‍यात आले. अधिक उत्‍साहाची बाब म्‍हणजे क्विझ कॉम्‍पीटिशनचे आयोजन करण्‍यात आले, जेथे इंडस्‍ट्री ट्रेण्‍ड्स, बिझनेस डायनॅमिक्‍स, टेक्‍नॉलॉजिकल अडवान्‍समेंट्स संदर्भात सहभागींचे ज्ञान आणि कमिन्‍सबाबत त्‍यांना असलेल्‍या माहितीचे मूल्‍यांकन करण्‍यात आले.
ग्रॅण्‍ड फिनालेमध्‍ये सहभाग घेतलेल्‍या सहा शॉर्टलिस्‍ट केलेल्‍या टीम्‍स पुढीलप्रमाणे:
1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), लखनौ मधील हेलिओस
2. सिम्‍बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अॅण्‍ड ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट, पुणे मधील द बेंचवार्मर्स
3. IIM, मुंबई मधील व्हिज़न
4. नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्‍टडीज़ (NMIMS), मुंबई मधील सिनर्जी
5. NMIMS, मुंबई मधील इनक्विझिटर्स
6. एस पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई मधील कमबॅक
रिडिफाइन 2023 बाबत अधिक माहितीसाठी Cummins REDEFINE | Cummins Inc येथे भेट द्या आणि लिंक्‍डइन, फेसबुक, इन्‍स्‍टाग्राम व फेसबुकवर कमिन्‍स इंडियाला फॉलो करा.

कमिन्‍स इंडिया लिमिटेड बाबत:
1962 पासून पुण्‍यामध्‍ये मुख्‍यालय असलेली कमिन्‍स इंडिया लिमिटेड इंडियामधील कमिन्‍स ग्रुपचा भाग आहे आणि पॉवर जनरेशन, इंडस्‍ट्रीयल व ऑटोमोटिव्‍ह मार्केट्ससाठी डिझेल व नॅच्‍युरल गॅस इंजिन्‍सची आघाडीची उत्‍पादक कंपनी आहे. कमिन्‍स इंडिया लिमिटेडचे 480 हून अधिक सर्विस पॉइण्‍ट्ससह 18 एक्‍सक्‍लुसिव्‍ह 4S डिलरशिप्‍सचे देशव्‍यापी नेटवर्क आहे, जे इंडिया, नेपाळ व भूतानमधील ग्राहकांना कमिन्‍स इक्विपमेंट आणि इंजिन्‍सच्‍या अपटाइमसाठी पार्ट्स, सर्विसेस् व आफ्टर-मार्केट सोल्‍यूशन्‍स देते.

Related posts

कोका-इंडिया आणि अंजू बॉबी स्‍पोर्ट्स फाऊंडेशन यांच्‍यामधील दीर्घकालीन सहयोग महिला अॅथलीट्सना सक्षम करत आहे ~ कोका-कोला इंडिया सरावासाठी मोठे मैदान आणि दर्जात्‍म‍क

Shivani Shetty

स्प्राइटच्या ‘जोक इन ए बॉटल’चे पुनरागमन: विनोदाच्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आणि डिजिटल स्टास एकत्र येऊन घडविणार एक अफलातून हास्यानुभव

Shivani Shetty

अंगणवाडी सेविका प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक, मुख्यंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना इशारा

cradmin

Leave a Comment