maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

अॅबॉटकडून भारतातील फ्रीस्‍टाइल लिब्रे® सिस्‍टमचा वापर करणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी फ्रीस्‍टाइल लिब्रेलिंक मोबाइल अॅप लाँच

मुंबई, भारत, XX नोव्‍हेंबर २०२३ – अॅबॉट या जागतिक आरोग्‍यसेवा अग्रणी कंपनीने भारतात त्‍यांचे डिजिटल हेल्‍थ टूल फ्रीस्‍टाइल लिब्रेलिंक अॅपच्‍या लाँचची घोषणा केली. मोबाइल अॅप्‍लीकेशन फ्रीस्‍टाइल लिब्रे सिस्‍टमचा वापर करणाऱ्या व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे मापन करण्‍यासाठी आता कधीही,कुठेही टोचण्‍याच्‍या वेदनेशिवाय त्‍यांच्‍या मोबाइल फोन्‍सवर रिडिंग्‍ज मिळवण्‍यास साह्य करेल.1 एकीकृत फ्रीस्‍टाइल लिब्रे डिजिटल व्‍यासपीठ लाँच करत अॅबॉटचा व्‍यक्‍तींना सुलभ देखरेख, सहज उपलब्‍ध होणारी माहिती व सुलभ कलेक्‍शनच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या मधुमेहाचे उत्तम व्‍यवस्‍थापन करण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. मोबाइल अॅप सुसंगत आयफोन व अँड्रॉईड स्‍मार्टफोन्‍सवर काम करण्‍यासाठी उपलब्‍ध आहे.

फ्रीस्‍टाइल लिब्रेलिंक अॅप मधुमेही व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन्‍सवर रिअल-टाइममध्‍ये रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांबाबत माहिती पाहण्‍याची आणि त्‍यांचे डॉक्‍टर्स व केअरगिव्‍हर्सना माहिती शेअर करण्‍याची सुविधा देते. मोबाइल अॅप नीअर-फिल्‍ड कम्‍युनिकेशन (एनएफसी) तंत्रज्ञानाचा वापर करत ग्‍लुकोज डेटा सेन्‍सरमधून मोबाइल अॅपमध्‍ये हस्‍तांतरित करते, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या स्‍मार्टफोनवर आठ-तासांची ग्‍लुकोज हिस्‍ट्री, आहाराचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी रिअल-टाइम ट्रेण्‍ड पॅटर्न्‍स, इन्‍सुलिन वापर, औषधोपचार व व्‍यायामावर देखरेख ठेवण्‍यास मदत होते. यामुळे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवण्‍यासाठी स्‍वतंत्र रीडरची गरज भासत नाही.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत दक्षिण आशियामधील अॅबॉटच्‍या डायबेटीस केअर बिझनेसचे महाव्‍यवस्‍थापक कल्‍याण सत्तारूम्‍हणाले, ”मधुमेही व्‍यक्‍तींवर मोठा तणाव असतो, त्‍यांना मधुमेहाचे प्रभावीपणे व्‍यवस्‍थापन करण्यासाठी बरीच मेहनत घ्‍यावी लागते. फ्रीस्‍टाइल लिब्रेलिंक अॅप जगभरातील ५ दशलक्षांहून अधिक व्‍यक्‍ती वापरत असलेले जगातील पहिल्‍या क्रमांकाचे कन्टिन्‍युअस ग्‍लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) फ्रीस्‍टाइल लिब्रे सेन्‍सरशी एकसंधीपणे एकीकृत होते.2 अॅबॉटमध्‍ये आम्‍ही आमचे फ्रीस्‍टाइल लिब्रे तंत्रज्ञान मधुमेही व्‍यक्‍तींसाठी दैनंदिन नित्‍यक्रम सुलभ करण्‍याची खात्री घेण्‍यासह त्‍यांना त्‍यांच्‍या मुधमेहाचे अधिक प्रभावीपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यास सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

1अस्‍वीकृती: तुमचे ग्‍लुकोज रिडिंग्‍ज लक्षणे किंवा अपेक्षित प्रमाणाशी जुळत नसतील तर बोटांना टोचणे आवश्‍यक आहे.

2अस्‍वीकृती: अॅबॉट डायबेटिस केअर, इन्‍क.वरील डेटा सेन्‍सर-आधारित ग्‍लुकोज मॉनिटरिंग सिस्‍टम वापरणाऱ्या इतर व्‍यक्‍तींसाठी वापरकर्त्‍यांच्‍या आकडेवारीच्‍या तुलनेत फ्रीस्‍टाइल लिब्रे पोर्टफोलिओसाठी जगभरातील वापरकर्त्‍यांच्‍या आकडेवारीवर आधारित आहे.

सीनियर डायबेटोलॉजिस्‍ट डॉ. मनोज चावला म्‍हणाले, ”रिअल-टाइम आधारावर आपोआपपणे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांबाबत माहिती मिळाल्‍यास मधुमेही व्‍यक्‍ती व त्‍यांच्‍या केअरगिव्‍हर्सना मधुमेहाचे सुलभपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होऊ शकते. नवीन मधुमेह तंत्रज्ञान अचूक व योग्‍य निर्णय घेण्‍याचा मार्ग सुलभ करेल.”

फ्रीस्‍टाइल लिब्रेलिंकचा वापर करणाऱ्या व्‍यक्‍ती फ्रीस्‍टाइल लिब्रे व्‍यासपीठाचा भाग असलेले डिजिटल हेल्‍थ टूल्‍स लिब्रेव्‍ह्यू आणि लिब्रेलिंकअपच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे आरोग्‍यसेवा व्‍यावसायिक व केअरगिव्‍हर्सना माहिती शेअर करू शकतात.      

  • लिब्रेव्‍ह्यू विश्‍वसनीय, क्‍लाऊड-आधारित डायबेटिस मॅनेजमेंट सिस्‍टम आहे, जी रूग्‍णांना त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांबाबतची माहिती त्‍यांच्‍या आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांना शेअर करण्‍याची सुविधा देते, ज्‍यामुळे त्‍यांना वेळेवर हस्‍तक्षेप करण्‍यास मदत होते.
  • लिब्रेलिंकअप रूग्‍ण व केअरगिव्‍हर्ससाठी मोबाइल अॅप आहे, जे त्‍यांना मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करणारी मुले, वृद्ध पालक किंवा प्रियजनांसाठी ग्‍लुकोज हिस्‍ट्री व ट्रेण्‍ड्स सुलभपणे तपासण्‍याची सुविधा देते. 

फ्रीस्‍टाइल लिब्रेलिंक अॅपचा वापर करणाऱ्या व्‍यक्‍तींना फ्रीस्‍टाइल लिब्रे रीडरच्‍या तुलनेत नवीन अपडेट्स व नवीन वैशिष्‍ट्ये उपलब्‍ध होतात. यामध्‍ये मोठे व हाय-रिझॉल्‍युशन डिस्‍प्‍ले, ग्‍लुकोज रिडिंग्‍जसाठी टेक्‍स्‍ट-टू-स्‍पीच क्षमता (सक्षम असताना) आणि मॅन्‍युअल अपलोड न करता अॅपच्‍या माध्‍यमातून आपोआपपणे शेअर केलेला डेटा यांचा समावेश आहे. रीडरऐवजी अॅपचा वापर करता येत असला तरी दोन्‍ही टूल्‍स एकमेकांच्‍या संयोजनामध्‍ये देखील वापरता येऊ शकतात.

फ्रीस्‍टाइल लिब्रे सिस्‍टम बाबत:

अॅबॉटची फ्रीस्‍टाइल लिब्रे सिस्‍टम मधुमेही व्‍यक्‍तींच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे मापन करण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यासाठी आणि त्‍यांना त्‍यांच्‍या आरोग्‍यावर उत्तमपणे देखरेख ठेवण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. सिस्‍टम सेन्‍सरच्‍या माध्‍यमातून रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे वाचन करते, जी जवळपास १४ दिवसांपर्यंत वरच्‍या हाताच्‍या मागील बाजूस परिधान करता येऊ शकते, ज्‍यामुळे बोटांना टोचण्‍याची गरज भासत नाही.  

Related posts

डिजिकोअर स्टुडिओचा आयपीओ २५ सप्टेंबर रोजी खुला होणार

Shivani Shetty

ओटीटीवरील जगातील पहिला एंजल इन्व्हेस्टमेंट शो ‘इंडियन एंजल्स’ लॉन्च

Shivani Shetty

१४व्या शिकागो दक्षिण आशियाई महोत्सवात क्लोजिंग नाईटसाठी स्टोरीटेलर चित्रपटाची निवड

Shivani Shetty

Leave a Comment