maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२३ सादर

मुंबई, २२ डिसेंबर २०२३: क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक स्तरावरील सायबरसिक्युरिटी उपाययोजना पुरवठादार कंपनीचा उद्योग असलेल्या सिक्युराइटने डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया (डीएससीआय)च्या भागीदारीत नॅसकॉम-डीएसआयसी एन्युअल इन्फॉर्मेशन सिक्युरिटी समिट २०२३ मध्ये बहुप्रतीक्षित इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२३ चे अनावरण केले. या रिपोर्टचे अनावरण क्वीक हीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी, डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रमोद भसीन आणि डीएसआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक गोडसे यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव श्री. एस. कृष्णन यांच्या उपस्थितीत केले. हा संयुक्त अहवाल भारतीय सायबर सिक्युरिटी वातावरणासाठी खास तयार केलेला असा पहिलावहिला उपक्रम आहे.

सर्वांगीण थ्रेट रिपोर्ट सिक्युराइट आणि डीएसआयसीच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे. त्यातून देशातील सर्वांत मोठ्या मालवेअर अॅनालिसिस लॅब असलेल्या सिक्युराइट लॅब्सकडून आलेली अमूल्य माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. तिचे उद्दिष्ट व्यवसायांना आपल्या सायबर सिक्युरिटीला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी भारतकेंद्री ज्ञान आणि कृतीयोग्य शिफारशी करण्याचे आहे. हा अहवाल सिक्युराइटच्या संशोधक आणि तज्ञांचा अभ्यास व कटिबद्धता यांचे प्रतीक आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय परिस्थितीत असणारे अनेक सायबर धोके, प्रचंड डेटाच्या संचय, आकडेवारी आणि जवळपास ८.५ दशलक्ष एंडपॉइंट्सवरून टेलिमेट्री यांचे विश्लेषण करणे शक्य झाले आहे.

या अहवालात सायबर धोक्यांचा भौगोलिक आणि विभागीय परिणामांचा अभ्यास समाविष्ट केला गेला आहे. त्यात संपूर्ण वर्षभरात लक्ष्याधारित राज्ये, शहरे आणि उद्योग यांचा अभ्यास आहे. अँड्रॉइडच्या दृष्टीकोनातून एडवेअर आणि पोटेन्शियली अनवॉन्टेड अॅप्लिकेशन्स (पीयूए) यांच्यामधील मोठ्या वाढीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे गुगल प्ले स्टोअरवरील स्पायलोन अॅप्‍स, खोटे अॅप्‍स, हिडएड अॅप्‍स आणि इतर अनेक खोट्या व खोडसाळ अॅप्लिकेशन्स लाखो वापरकर्त्यांनी डाऊनलोड केल्याचे दिसते.

क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी म्हणाले की, “आजच्या सायबर क्षेत्राला एकत्रित प्रयत्न आणि नावीन्यपूर्ण उपाययोजनांची गरज आहे. भारताच्या सर्वांत मोठ्या मालवेअर विश्लेषण प्रयोगशाळा असलेल्या सिक्युरिट लॅबमध्ये तसेच आमच्या या क्षेत्रातील जवळपास तीन दशकांच्या अभ्यासाद्वारे हा पहिलावहिला भारतकेंद्री अहवाल फक्त धोक्याच्या क्षेत्रावरच लक्ष देत नाही तर सायबर हल्ल्यांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी आवश्यक ती माहिती देखील देतो. सिक्युराइटमध्ये आम्ही सर्व उद्योगांमधील मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सीआयएसओ) आणि मुख्य माहिती अधिकाऱ्यांसमोरील (सीआयओ) आव्हाने समजू शकतो. त्यामुळे, भारताचा एकमेव पूर्णपणे सज्ज उद्योग सायबरसिक्युरिटी उपाययोजना पुरवठादार म्हणून आम्ही एकात्मिक, मोड्यूलर, गणनयोग्य, परिपूर्ण आणि वापरण्यास तसेच कार्यान्वयित करण्यास सोप्या उपाययोजना देतो. आपल्या देशाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे रक्षक म्हणून त्याचा डिजिटल पाया सुरक्षित करणे ही आमच्यासाठी फक्त एक जबाबदारी नाही तर बदलत्या धोक्यांच्या परिस्थितीत ते टिकून राहणे यासाठीची आमची ही वचनबद्धता आहे.”

डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक गोडसे म्हणाले की, “सायबरसिक्युरिटी ही गोष्ट संचालक मंडळाच्या स्तरावर एक धोरणात्मक काळजीचा विषय ठरला आहे. त्याचे प्रमुख कारण सायबर धोक्यांचे वैविध्यपूर्ण स्वरूप आणि डेटाचे उल्लंघन केल्यामुळे होणारे विविध प्रकारचे आर्थिक परिणाम हे आहे. सायबर गुन्हे इंजिनीअरिंग वैविध्यपूर्ण हल्ला पद्धतींमुळे वाढत असल्यामुळे मालवेअर हा एक मोठा धोका ठरू लागला आहे. त्याचबरोबर रँसमवेअरचे हल्लेखोर आपल्या कार्यपद्धतींमध्ये सातत्याने बदल करतात आणि पारंपरिक सहीवर आधारित शोधातून पळ काढण्यासाठी नवनवीन तंत्रांचा वापर करतात. ही गोष्ट मालवेअर विरूद्ध रँसमवेअर घटना प्रमाण शोधांमधून दिसून येते. या अहवालातून भारतीय दृष्टीकोनातून सध्याच्या धोक्याच्या वातावरणाची व्यापक माहिती आणि त्याचबरोबर आगामी वर्षांसाठी अंदाज देण्यात आला आहे. डिजिटल वातावरणाला अत्यंत सहजपणे अंगीकारण्यासाठी संस्था तसेच सायबरसिक्युरिटीतील आघाडीच्या लोकांसाठी हे एक धोरणात्मक मार्गदर्शक ठरेल, अशी मला आशा वाटते. मी धोक्याबाबतची माहिती सर्वसमावेशक पद्धतीने समोर आणण्यासाठी आमच्यासोबत भागीदारी केल्याबाबत संपूर्ण सिक्युराइट टीमचे आभार मानतो.”

Report Link: https://www.dsci.in/resource/content/india-cyber-threat-report-2023

Related posts

ईरिक्रूटकडून उल्‍लेखनीय वाढीची नोंद

Shivani Shetty

इंडियास्किल २०२४ ग्रँड फिनाले: ५८ विजेते वर्ल्ड स्किल्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

Shivani Shetty

‘लव्ह कनेक्शन’ मोहिमेच्या परतीचा महासोहळा: व्हिएतजेटकडून व्हिएतनाममध्ये ५० भारती जोडप्यांसाठी मोफत फ्लाइट्सची ऑफर

Shivani Shetty

Leave a Comment