मुंबई, २४ डिसेंबर २०२३: मुंबईतील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन आयआयसीएफ कंझ्युमर एक्स्पोच्या घोषणेसह विजय सेल्स ही भारतातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल साखळी तंत्रज्ञानप्रेमी व ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यास सज्ज आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राऊंड्सवर आयोजित करण्यात आलेलया या प्रदर्शनात ६५ हून अधिक इलेक्ट्रॉनिक ब्रँडची उत्पादने स्वस्त दरात विक्रीसाठी सादर केली जाणार आहेत. यामध्ये सॅमसंग, एलजी, सोनी, अॅप्पल, वनप्लस, बोट, हायर, व्हर्लपूल, असुस, हिताची, गोदरेज, आयएफबी, मॉर्फी रिचर्ड्स, फिलिप्स, वंडरशेफ, एआय स्मिथ अशा लोकप्रिय ब्रॅण्ड्सचा समावेश आहे. हे १६ दिवसीय प्रदर्शन ८ जानेवारी २०२४ पर्यंत ग्राहकांसाठी खुले राहील. ग्राहकांना बेस्ट-इन-टेक ब्रॅण्ड्सचे नवीन लॉन्चेस व विविध ऑफरिंग्जचा अनुभव देण्यासाठी, त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी हे प्रदर्शन डिझाइन केले असल्याचे विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता यांनी सांगितले.
सर्व ब्रॅण्ड्सचे स्वत:चे विभाग असतील, जे ग्राहकांना नवीन गॅझेट्स खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी देतील. ५०,००० चौरस मीटर जागेवर पसरलेले हे प्रदर्शन विविध इलेक्ट्रॉनिक विभागांमधील उत्पादनांची सर्वात मोठी श्रेणी दाखवते. उत्पादनांना जवळून पाहण्याची संधी देण्याचा या प्रदर्शनाचा मनसुबा आहे. ग्राहकांना लाइव्ह कूकरी प्रात्यक्षिकांचा, तसेच ब्रॅण्ड्सनी लाँच केलेल्या नवीन उत्पादनांचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.
तसेच, ग्राहकांना त्यांच्या खरेदीवर त्वरित बँक सूट, तसेच कॅशबॅक्स देखील मिळू शकतात. १५,००० रूपयांपेक्षा अधिक एचडीएफसी बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्स ईएमआय व्यवहारांवर १० टक्क्यांची म्हणजेच जवळपास ३००० रूपयांची त्वरित सूट मिळेल. आयसीआयसीआय बँक कार्डधारकांना २०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट व डेबिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर ७.५ टक्क्यांची म्हणजेच जवळपास ३००० रूपयांची त्वरित सूट मिळेल आणि २०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवरील ५ टक्क्यांची म्हणजेच जवळपास १५०० रूपयांची त्वरित सूट मिळेल. याव्यतिरिक्त, आयसीआयसीआय बँक कार्डधारक १००,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट व डेबिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर ५००० रूपयांच्या त्वरित सूटचा लाभ घेऊ शकतात आणि क्रेडिट कार्डधारक १००,००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्यवहारांवर ५००० रूपयांच्या त्वरित सूटचा लाभ घेऊ शकतात. एचएसबीसी बँक ग्राहक २०,००० रूपयांपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर ७.५ टक्क्यांची म्हणजेच जवळपास ५००० रूपयांची त्वरित सूट मिळवू शकतात. आरबीएल बँक ग्राहकांना क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर १० टक्क्यांची म्हणजेच जवळपास ३,५०० रूपयांची त्वरित सूट मिळेल आणि १५,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर ५ टक्क्यांची म्हणजेच जवळपास २,००० रूपयांची त्वरित सूट मिळेल.
येस बँक ग्राहकांना १०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर ५ टक्क्यांची म्हणजेच जवळपास २,५०० रूपयांची सूट मिळेल. इंडसइंड बँक ग्राहकांना १५,००० रूपयांपेक्षा अधिक डेबिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर ७.५ टक्क्यांची म्हणजेच जवळपास २,००० रूपयांची त्वरित सूट मिळेल. एयू स्मॉल फायनान्स बँक डेबिट व क्रेडिट कार्डधारक १०,००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्यवहारांवर १० टक्क्यांची म्हणजेच जवळपास २,००० रूपयांच्या त्वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. वन कार्ड धारकांना क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर ५ टक्क्यांची म्हणजेच जवळपास ७,५०० रूपयांची त्वरित सूट मिळेल आणि १५,००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्यवहारांवर १,००० रूपयांची त्वरित सूट मिळेल. आयडीएफसी फर्स्ट बँक ग्राहक ३,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर ७.५ टक्क्यांच्या अमर्यादित त्वरित सूटचा आणि १०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर ५ टक्क्यांची म्हणजेच जवळपास १,५०० रूपयांच्या त्वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. डीबीएस बँक क्रेडिट कार्डधारक १५,००० रूपयांपेक्षा अधिक ईएमआय व नॉन-ईएमआय व्यवहारांवर १० टक्क्यांची म्हणजेच जवळपास २,५०० रूपयांच्या त्वरित सूटचा आनंद घेऊन शकतात. फेडरल बँक क्रेडिट कार्डधारकांना १५,००० रूपयांपेक्षा अधिक ईएमआय व नॉन-ईएमआय व्यवहारांवर १० टक्क्यांची म्हणजेच जवळपास ५,००० रूपयांची त्वरित सूट मिळेल. दरम्यान, ग्राहकांना पेटीएम पीओएस मशिनच्या माध्यमातून केलेल्या सर्व कार्ड व्यवहारांवर जवळपास ७०० रूपये किमतीचे मूव्ही वाऊचर्स मिळू शकतात. एचडीबी पेपर फायनान्सच्या माध्यमातून केलेल्या खरेदींसाठी ग्राहकांना १० टक्क्यांची म्हणजेच १०,००० रूपयांची कॅशबॅक मिळू शकते.