maharashtraprimenews
ठळक बातम्या
Financeइक्विटीठळक बातम्यामहाराष्ट्रमुंबई

इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट लिमिटेडचा अपरिवर्तनीय कर्जरोखे (NCD) ट्रान्चे I इश्यू खुला . कूपनचा दर, दरवर्षाला 10.30% पर्यंत# प्रभावी उत्पन्न दरवर्षाला 10.30% पर्यंत#

मुंबई, 06 जानेवारी, 2023: नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली, इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट लिमिटेड (ICCL) (“कंपनी” किंवा “इश्यूअर”), ही एक गैर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे, जी भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)शी नोंदणीकृत आहे आणि तिने प्रत्येकी रु. 1,000 चे दर्शनी मूल्य असलेल्या सुरक्षित, विमोचनीय, अपरिवर्तनीय कर्जरोख्यां (“NCDs”)चा सार्वजनिक इश्यू जाहीर केला आहे. हा ट्रान्चे I इश्यू, 05 जानेवारी, 2023 रोजी खुला झाला आणि तो, शुक्रवार, 27 जानेवारी, 2023 रोजी बंद होईल.

या ट्रान्चे I इश्यूचा मूळ इश्यू आकार, ₹ 100 कोटी आहे, ज्यामध्ये ₹ 1,000 कोटींच्या शेल्फच्या मर्यादेच्या आत, एकत्रितपणे ₹ 200 कोटी (ट्रान्चे I इश्यू)पर्यंत, ₹ 100 कोटींपर्यंतचे ओव्हरसबस्क्रिप्शन कायम ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ट्रान्चे I इश्यूद्वारे, दर वर्षाला 9.05% ते 10.30%च्या कूपन दरांसह सबस्क्रिप्शनसाठी एनसीडी (NCDs)च्या विविध मालिका देऊ केल्या जातात. या एनसीडी (NCDs)ना, बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (बीएसई सह “NSE” एकत्रितपणे, “स्टॉक एक्स्चेंजेस)वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. बीएसई (BSE) हे, ट्रँचे I इश्यूसाठी नियुक्त स्टॉक एक्सचेंज असेल. या अपरिवर्तनीय कर्जरोख्यां (NCDs)ना, क्रिसिल (CRISIL) रेटिंग्ज लिमिटेडद्वारे “क्रिसिल एए/स्टेबल” आणि इन्व्हेस्टमेंट इन्फर्मेशन अँड क्रेडीट रेटिंग एजन्सी (ICRA)द्वारे “[आयसीआरए]एए (स्टेबल)” असे रेटिंग दिले गेले आहे.

ट्रान्चे I इश्यू अंतर्गत अपरिवर्तनीय कर्जरोख्यां (NCDs)चा कालावधी 24 महिने (मालिका I, II, III), 36 महिने (मालिका IV, V, VI), आणि 60 महिने (मालिका VII, VIII) असतो. श्रेणी I (संस्थात्मक गुंतवणूकदार) आणि श्रेणी II (गैर-संस्थागत गुंतवणूकदार)मधील अपरिवर्तनीय कर्जरोखे (NCDs) धारकांसाठी, प्रभावी उत्पन्न (दर वर्षाला) दर वर्षाला 9.39% ते 9.81% पर्यंत आणि श्रेणी III (उच्च नेट-वर्थ वैयक्तिक गुंतवणूकदार) आणि श्रेणी IV (किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार) धारकांसाठी, दर वर्षाला 9.79% ते 10.30% आहे. अपरिवर्तनीय कर्जरोख्यां (NCD)साठी, व्याज देय पद्धती, गुंतवणूकदारांनी निवडलेल्या मालिकेनुसार वार्षिक, मासिक किंवा संचयी आहेत. श्रेणी I (संस्थात्मक गुंतवणूकदार) आणि श्रेणी II (गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार) मधील अपरिवर्तनीय कर्जरोखे (NCD) धारकांसाठी मॅच्युरिटीची रक्कम ही, प्रति अपरिवर्तनीय कर्जरोखा (NCD),  ₹ 1,000 ते ₹ 1,315.10 पर्यंत आहे आणि श्रेणी IV (किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार)साठी, प्रति अपरिवर्तनीय कर्जरोखा (NCD), ₹ 1,000 ते ₹ 1,333.20 पर्यंत आहे. 36 महिन्यांच्या (मालिका IV आणि मालिका VI) आणि 60 महिन्यांच्या (मालिका VII आणि मालिका VIII) आत, वार्षिक पेमेंटद्वारे दर्शनी मूल्यानुसार, स्टॅगर्ड रिडम्प्शनसाठी ट्रान्चे I इश्यू पर्याय.

कंपनीद्वारे, प्रस्तावित ट्रान्चे I इश्यूमध्ये अशा श्रेणी III आणि श्रेणी IV गुंतवणूकदारांना 0.25% अतिरिक्त प्रोत्साहन दिले जात आहे, जे कंपनी आणि/किंवा तिच्या होल्डिंग कंपनीने, आणि/किंवा त्याची होल्डिंग कंपनीने, जसे प्रकरण असेल त्या प्रमाणे, त्या प्रमाणे, मागे जारी केलेल्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यां (NCD)/बाँडचे धारक आहेत, आणि/किंवा ते, जसे प्रकरण असेल त्या प्रमाणे, वाटपाच्या डीम्ड तारखेला, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे इक्विटी होल्डर(होल्डर्स) [“प्रायमरी होल्डर(होल्डर्स)”] आहेत आणि मालिका I, मालिका III, मालिका IV, मालिका VI, मालिका VII मध्ये अर्ज करत आहेत; पण, मालिका I, मालिका III, मालिका IV, मालिका VI, मालिका VII आणि/किंवा मालिका VIII च्या संदर्भात, या टप्प्या I इश्यू अंतर्गत जारी केलेले अपरिवर्तनीय कर्जरोखे (NCDs), संबंधित कूपनच्या पेमेंटसाठी लागू असलेल्या संबंधित रेकॉर्ड तारखेला गुंतवणूकदारांनी धारण केलेले असावेत.

या इश्यूचे लीड मॅनेजर्स हे, एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, एलारा कॅपिटल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आहेत. बीकन ट्रस्टीशिप लिमिटेड हे, या इश्यूचे कर्जरोखा विश्वस्त आहेत आणि केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे, या ट्रान्चे I इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

ट्रॅन्चे I इश्यूच्या आणि संबंधित खर्चाची पूर्तता केल्यानंतर, ट्रान्चे I इश्यूच्या निव्वळ उत्पन्नापैकी, किमान 75% उत्पन्न पुढील कर्ज (ऑनवर्ड लेंडिंग), वित्तपुरवठा आणि कंपनीच्या विद्यमान कर्जाच्या व्याज आणि मुद्दलाची परतफेड करण्यासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतूंसाठी 25% पर्यंत उत्पन्न, वापरले जाईल.

30 सप्टेंबर, 2022 रोजी संपलेल्या सहा महिन्यांसाठी, इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट लिमिटेड (ICCL)ने मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत अनुक्रमे ₹ 268.53 कोटी आणि ₹ 859.60 कोटींच्या तुलनेत,  एकूण ₹ 937.11 कोटी उत्पन्नावर, ₹ 236.90 कोटींचा करानंतरचा नफा (PAT) नोंदवला.

Related posts

बँक ऑफ बडोदाने व्हिजाच्या सोबत प्रीमियम डेबिट कार्ड्स- बीओबी वर्ल्ड ओप्युलन्स (मेटल एडिशन) आणि बीओबी सफायर कार्ड्स ची सुविधा

Shivani Shetty

एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी पण शेवटी शरद पवारांनी कॅच पकडलाच…!

cradmin

युनिव्हर्सिटी ऑफ कॅनबेराचा नवीन बॅचलर ऑफ सायन्स अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देणार विविध स्पेशलायझएशन्समधील प्रोग्राम्स स्वत: निवडण्याची संधी

Shivani Shetty

Leave a Comment