maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. विनीत अग्रवाल

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या महसूलात वाढ

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४: भारतातील आघाडीची एकात्मिक पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स सोल्युशन पुरवणारी कंपनी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आज ३१ डिसेंबर २०२३ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिसऱ्या तिमाहीसाठी आणि नऊमाहीसाठी आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीच्‍या या तिमाहीतील एकूण महसूलामध्ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत २.२ टक्के वाढ झाली, तर याच कालावधीदरम्‍यान नफ्यामध्ये ०.३ टक्के वाढ झाली.

कामगिरीमधील ठळक वैशिष्‍ट्ये (स्वतंत्र): आर्थिक वर्ष २०२४ ची तिसरी तिमाही वि. आर्थिक वर्ष २०२३ ची तिसरी तिमाही:

कंपनीचा कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक २.२ टक्‍क्‍यांच्यावाढीसह ८,९९९ दशलक्ष रूपये झाला आहे. ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २०२३ मधील १,३७६ दशलक्ष रूपयांच्‍या तुलनेत १,३८६ दशलक्ष रूपये झाला आहे. ईबीआयटीडीए मार्जिन आर्थिक वर्ष २०२३ मधील १५.६२ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत १५.४० टक्‍के झाले आहे. पीएटी (करोत्तर नफा) आर्थिक वर्ष २०२३ मधील ९५३ दशलक्ष रूपयांच्‍या तुलनेत ९५६ दशलक्ष रूपये आणि ०.३ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. पीएटी मार्जिन आर्थिक वर्ष २०२३ मधील १०.८२ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत १०.६२ टक्‍के झाले आहे.

कामगिरीमधील ठळक वैशिष्‍ट्ये (एकत्रित): आर्थिक वर्ष २०२४ ची तिसरी तिमाही वि. आर्थिक वर्ष २०२३ ची तिसरी तिमाही:

कंपनीचा कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक ३.७ टक्‍क्‍यांच्या वाढीसह १०,०२० दशलक्ष रूपये झाला आहे. ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २०२३ मधील १,३१६ दशलक्ष रूपयांच्‍या तुलनेत १,२७६ दशलक्ष रूपये झाला आहे. ईबीआयटीडीए मार्जिन आर्थिक वर्ष २०२३ मधील १३.६१ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत १२.७३ टक्‍के झाले आहे. पीएटी (करोत्तर नफा) आर्थिक वर्ष २०२३ मधील ८६५ दशलक्ष रूपयांच्‍या तुलनेत ८०२ दशलक्ष रूपये झाला आहे. पीएटी मार्जिन आर्थिक वर्ष २०२३ मधील ८.९५ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत ८.०० टक्‍के झाले आहे.

म्‍हणाले, ”कंपनीने सूक्ष्‍म वातावरणामधील आव्‍हाने पाहता चालू असलेल्‍या तिमाहीमध्‍ये आणि डिसेंबर २०२३ रोजी समाप्‍त झालेल्‍या नऊमाहीमध्‍ये स्थिर कामगिरी केली आहे. आमचे सप्‍लाय चेन सोल्‍यूशन्‍स, रेल मल्‍टी-मोडल व कोल्‍ड सप्‍लाय चेन सोल्‍यूशन्‍सना धार मिळाली. आम्‍ही वेअरहाऊसिंग, मल्‍टीमोडल पायाभूत सुविधा आणि अत्‍याधुनिक तंत्रज्ञानामध्‍ये गुंतवणूकींना प्राधान्‍य देत भारतीय उपखंडामधील आमच्‍या ग्राहकांसाठी पसंतीचे लॉजिस्टिक्‍स भागीदार राहण्‍याचा प्रयत्‍न करतो. यापुढे, टीसीआय नवीन संधींच्‍या ज़ोरावर देशासाठी अधिक कार्यक्षम व स्‍पर्धात्‍मक लॉ‍जिस्टिक्‍स इकोसिस्‍टमला आकार देण्‍याप्रती योगदान द्यायला तयार आहे.”

Related posts

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचा मुंबईत विस्तार

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून चंदिगडमध्‍ये अत्‍याधुनिक रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन

Shivani Shetty

स्विस ब्‍युटीकडून द लिपस्टिक ऑफ इंडिया लाँच

Shivani Shetty

Leave a Comment