मुंबई, मे १६, २०२४: मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइनने आज भारतातीलकामाच्या ठिकाणी एआयच्या स्थितीवरील २०२४ वर्क ट्रेण्ड इंडेक्सच्यानिष्पत्तींना जारी केले. अहवाल ‘एआय अॅट वर्क इज हिअर. नाऊ कम्स दहार्ड पार्ट‘ फक्त एका वर्षामध्ये एआयचा कर्मचाऱ्यांच्या काम, नेतृत्व वनियुक्ती करण्याच्या पद्धतीवर पडलेल्या प्रभावाला निदर्शनास आणतो. हाअहवाल कामाच्या ठिकाणी एआयचा समावेश करण्याप्रती कर्मचाऱ्यांच्याप्रबळ महत्त्वाकांक्षेला निदर्शानास आणतो, तसेच करिअर विकासासाठीनिर्माण होणाऱ्या संधी आणि एआय वापरकर्त्यांना भावी कामकाजपद्धतींमध्ये देणाऱ्या पाठिंब्याला प्रकाशझोतात आणतो.
मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइनने एआय कामाच्या पद्धतीला कशाप्रकारेआकार देत आहे याबाबत सर्वसमावेशक दृष्टीकोन प्रदान करण्यासाठीचौथ्या वर्क ट्रेण्ड इंडेक्सकरिता पहिल्यांदाच सहयोग केला. या निष्पत्ती३१ देशांमधील ३१,००० व्यक्तींचे सर्वेक्षण, लिंक्डइनवरील लेबर वहायरिंग ट्रेण्ड्स, मायक्रोसॉफ्ट ३६५ चे ट्रिलियन्स उत्पादकता सिग्नल्सअणि फॉर्च्युन ५०० ग्राहकांसोबत संशोधनावर आधारित आहेत.
हा अहवालात प्रत्येक प्रमुख व व्यावसायिकांना भावी वर्षांमध्ये काम, टॅलेंटव हायरिंगवरील एआयच्या प्रभावाबाबत माहित असणे आवश्यकअसलेले तीन इनसाइट्स दिले आहेत:
भारतातील कर्मचारीवर्ग एआयबाबत अत्यंत आशावादी आहे. भारतातील ब्याण्णव टक्के हुशार कर्मचारी कामाच्या ठिकाणीएआयचा वापर करतात, तुलनेत हे प्रमाण जागतिक स्तरावर ७५ टक्केआहे, ज्यामधून वेळेची बचत करण्यासाठी, सर्जनशीलता व अवधानवाढवण्यासाठी एआयवरील कर्मचाऱ्यांचा विश्वास दिसून येतो. भारतातील एक्याण्णव टक्के प्रमुखांचा विश्वास आहे की, स्पर्धात्मकराहण्यासाठी त्यांच्या कंपन्यांनी एआयचा अवलंब करण्याची गरजआहे, पण ५४ टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीमध्येअंमलबजावणीसाठी प्लान व दृष्टीकोनाचा अभाव असल्याबाबतचिंता आहे.
प्रमुखांना वैयक्तिक उत्पादकता नफ्याला कंपनीच्या फायद्यासाठीकामी आणण्याचा दबाव वाटत असताना कर्मचारी लाभांचा फायदाघेण्यास अधिक वाट पाहू शकत नाहीत. ७२ टक्के भारतीय एआयवापरकर्ते कामाच्या ठिकाणी त्यांचे स्वत:चे एआय टूल्स आणतआहेत. या डेटामधून स्पष्टपणे निदर्शनास येते की, कर्मचारी कामाच्याठिकाणी अधिक उत्पादनक्षम व सर्जनशील असण्यासाठी एआयचावापर करत आहेत. प्रत्येक प्रमुखासाठी या गतीला आरओआयमध्येबदलण्याची संधी आहे.
लिंक्डइन जॉब पोस्ट्समध्ये एआयचा उल्लेख प्रतिसादामध्ये १७टक्क्यांची वाढ करणाऱ्या विश्वामध्ये दोन मार्ग उपलब्ध आहेत: कर्मचाऱ्यांना एआय टूल्स व प्रशिक्षणासह सक्षम करणाऱ्या कंपन्यांकडेसर्वोत्तम टॅलेंटचे लक्ष वेधले जाईल आणि एआयमध्ये कुशलअसलेल्या व्यावसायिकांना प्राधान्य दिले जाईल.
भारतातील प्रमुखांसाठी, हायरिंगसंदर्भात आता एआय स्किल्सनासर्वाधिक प्राधान्य दिले जाते, जेथे ७५ टक्के प्रमुख म्हणतात की तेएआय स्किल्स नसलेल्या कर्मचाऱ्याला नियुक्त करणार नाहीत. हेप्रमाण जागतिक सरासरी ६६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. रोचक बाबम्हणजे अनुभवापेक्षा एआय स्किल्सना अधिक प्राधान्य दिले जाते, जेथे भारतातील ८० टक्के प्रमुख अनुभवी उमेदवाराऐवजी एआयस्किल्स असलेल्या कमी अनुभवी उमेदवाराला नियुक्त करण्यासप्राधान्य देतात.
गेल्या वर्षाच्या अखेरीस आपल्या प्रोफाइल्समध्ये कोपायलट वचॅटजीपीटी असे एआय स्किल्स असलेल्या जागतिक स्तरावरीललिंक्डइन सदस्यांमध्ये १४२ पट वाढ झाली आहे आणि एआय योग्यतानिर्माण करण्यासाठी लिंक्डइन लर्निंग कोर्सेसचा वापर करणाऱ्यानॉन–टेक्निकल व्यावसायिकांमध्ये १६० टक्के वाढ झाली आहे.
संशोधनामधून चार प्रकारचे एआय वापरकर्ते निदर्शनास आले – एआयचा क्वचितच वापर करणारे शंका असलेले वापरकर्ते, एआयचामोठ्या प्रमाणात वापर करणारे पॉवर युजर्स, अनुनभवी व एक्स्लोरर्स. शंका असलेल्या वापरकर्त्यांच्या तुलनेत एआय पॉवर युजर्सनी त्यांच्याकामकाज पद्धतीमध्ये सुधारणा केली आहे, जेथे ९० टक्के भारतीयएआय पॉवर युजर्स एआयसह दिवसाची सुरूवात करतात आणि ९१टक्के दुसऱ्या दिवसासाठी सज्ज असण्याकरिता एआयवर अवलंबूनआहेत. ३७ टक्क्यांहून अधिक पॉवर युजर्स उपयुक्त प्रॉम्प्ट्ससंदर्भातसह–कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्याची शक्यता आहे अणि ४७टक्क्यांहून अधिक पॉवर युजर्स एआयसह प्रयोग करण्याची शक्यताआहे.
तसेच, जवळपास २० टक्के एआय पॉवर युजर्सना इतर कर्मचाऱ्यांच्यातुलनेत विशेषत: प्रॉम्प्ट्स आणि भूमिके–संबंधित एआय वापराबाबतप्रशिक्षण मिळण्याची शक्यता आहे. ६५ टक्के पॉवर युजर्सनाजनरेटिव्ह एआयबाबत सीईओकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यतादेखील आहे, ३४ टक्के पॉवर युजर्सना फंक्शन किंवा डेव्हलपमेंटप्रमुखांकडून आणि ४४ टक्के पॉवर युजर्सना त्यांच्या व्यवस्थापकांकडूनमार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे.
मायक्रोसॉफ्ट इंडिया व साऊथ एशियाच्या व्यवस्थापकीय संचालकइरिना घोष म्हणाल्या, ”वर्क ट्रेण्ड इंडेक्समधील डेटामधून निदर्शनास येतेकी एआाय आता कामाच्या ठिकाणी वास्तविकता बनले आहे, जेथेभारतातील हुशार कर्मचाऱ्यांमध्ये एआयचा अवलंब करण्याचे प्रमाण ९२टक्क्यांसह सर्वाधिक आहे. बीएफएसआय, आरोग्यसेवा, आयटीईएसआणि सार्वजनिक क्षेत्र अशा क्षेत्रांमध्ये दिसण्यात येणारा वाढता दरअत्यंत प्रेरणादायी आहे. या एआय आशावादामधून कंपन्यांना योग्य टूल्सव प्रशिक्षणामध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी मिळते, ज्यामुळे त्यांनाकर्मचाऱ्यांसाठी कार्यक्षमता अनलॉक करता येतील आणि दीर्घकाळापर्यंतव्यवसायावर अनुकूल परिणाम होईल.”
लिंक्डइन येथील टॅलेंट अँड लर्निंग सोल्यूशन्सच्या प्रमुख रूची आनंदम्हणाल्या, ”एआय काम करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणतआहे, टॅलेंट लँडस्केपला नवीन आकार देत आहे आणि व्यक्ती व कंपन्यांनापरिवर्तनाचा अवलंब करण्यास प्रेरित करत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेतएआय कौशल्यासाठी मागणीमध्ये १७ टक्क्यांची वाढ दिसण्यात आली, जे लिंक्डइन प्लॅटफॉर्म इनसाइट्स आणि वर्क ट्रेण्ड इंडेक्सच्यानिष्पत्तींमधून दिसून येते. आम्ही भारतातील व्यावसायिकांना नवीनकौशल्ये शिकण्यासोबत त्यांच्या व्यावसायिक स्तरासाठी एआयकौशल्यांचे ज्ञान मिळवताना पाहिले आहे. कर्मचारीवर्ग एआयचे फायदेघेत असताना प्रमुखांनी तंत्रज्ञान व टॅलेंटमध्ये विचारशील गुंतवणूक करतत्यांच्या कंपनीच्या एआय क्षमतांना गती देणे महत्त्वाचे आहे.”
गेल्या सहा महिन्यांमध्ये जागतिक स्तरावर कामाच्या ठिकाणी जनरेटिव्हएआयचा वापर जवळपास दुप्पट झाला आहे. लिंक्डइनला आपल्याप्रोफाइल्समध्ये एआय कौशल्यांची भर करणाऱ्या व्यावसायिकांच्याआकडेवारीत मोठी वाढ होताना दिसण्यात येत आहे. पण, भारतातीलप्रत्येक दुसऱ्या प्रमुखाला चिंता होती की त्यांच्या कंपनीमध्ये एआयदृष्टीकोनाचा अभाव आहे आणि कर्मचारी कामाच्या ठिकाणी त्यांचेस्वत:चे एआय टूल्स आणत आहेत, प्रमुखांनी प्रयोग करण्यापासूनव्यावसायिक परिणामापर्यंत तंत्रज्ञानामधील अडथळ्यांचा सामना केलाआहे.
या अहवालाच्या आधारावर मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना एआयसहसुरूवात करण्यास मदत करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ३६५ करिताकोपायलटमधील नवीन क्षमतांची घोषणा केली आणि लिंक्डइनने ५०हून अधिक लर्निंग कोर्सेसची घोषणा केली, जे एआय योग्यता प्रगतकरण्यासाठी सर्व स्तरांवरील व्यावसायिकांना सक्षम करण्याकरितामोफत देण्यात आले आहेत.
८ जुलैपासून मोफत उपलब्ध असणाऱ्या ५० नवीन एआय लर्निंगकोर्सेसव्यतिरिक्त लिंक्डइन पुढील सेवा देते:
अधिक माहितीसाठी Official Microsoft Blog व 2024 Work Trend Index Report ला भेट द्या आणि कंपनीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ करिनकिमब्रो यांचे मत जाणून घेण्यासाठी LinkedIn येथे भेट द्या.
समाप्त
About Microsoft
Microsoft (Nasdaq “MSFT” @microsoft) creates platforms and tools powered by AI to deliver innovative solutions that meet the evolving needs of our customers. The technology company is committed to making AI available broadly and doing so responsibly, with a mission to empower every person and every organization on the planet to achieve more.
About LinkedIn
LinkedIn connects the world’s professionals to make them more productive and successful and transforms the way companies hire, learn, market and sell. Our vision is to create economic opportunity for every member of the global workforce through the ongoing development of the world’s first Economic Graph. LinkedIn has more than 1 billion members and has offices around the globe.