मुंबई, भारत—14 डिसेंबर 2022—IMDb (www.imdb.com), ह्या जगातल्या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीज संदर्भातील सर्वांत प्रसिद्ध व सर्वांत विश्वसनीय माहितीच्या स्रोताने आज जगभरातील IMDb युजर्समध्ये सर्वांत प्रसिद्ध असलेल्या 10 भारतीय चित्रपट आणि वेब सिरीजची घोषणा केली. छोटे सँपल्स किंवा व्यावसायिक समीक्षकांच्या समीक्षेच्या आधारे आपले वार्षिक मानांकन निश्चित करण्याच्या ऐवजी IMDb आपल्या दर महिन्याला असलेल्या 20 कोटी दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे सर्वांत प्रसिद्ध चित्रपट आणि वेब सिरीजची घोषणा करत असते.
2022 मधील IMDb वरील 10 सर्वाधिक हिट भारतीय चित्रपट*
*1 जानेवारी ते 7 नोव्हेंबर 2022 मध्ये भारतात थिएटरमध्ये किंवा डिजिटल प्रकारे प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपैकी आणि दर महिन्याला IMDb वर असलेल्या 20 कोटी दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे सातत्याने IMDb युजर्समध्ये सातत्याने लोकप्रिय असलेले आणि किमान 25,000 मतांसह 7 पेक्षा अधिक सरासरी IMDb युजर रेटिंग असलेले चित्रपट. हा IMDb चित्रपट रँकिंगमधून घेतलेला विशेष आणि निश्चित डेटा आहे व हे रँकिंग वर्षामध्ये दर आठवड्याला अपडेट होत असते. IMDb ग्राहक त्यामध्ये भर घालू शकतात व हे आणि इतर टायटल्स त्यांच्या IMDb वॉचलिस्टवर जोडू शकतात.
2022 मधील IMDb च्या सर्वाधिक हिट भारतीय वेब सिरीज 2022*
**1 जानेवारी ते 7 नोव्हेंबर 2022 मध्ये भारतात थिएटरमध्ये किंवा डिजिटल प्रकारे प्रदर्शित झालेल्या सर्व वेब सिरीजपैकी आणि दर महिन्याला IMDb वर असलेल्या 20 कोटी दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे सातत्याने IMDb युजर्समध्ये सातत्याने लोकप्रिय असलेल्या आणि किमान 25,000 मतांसह 7 पेक्षा अधिक सरासरी IMDb युजर रेटिंग असलेल्य सिरीज. हा IMDb चित्रपट रँकिंगमधून घेतलेला विशेष आणि निश्चित डेटा आहे व हे रँकिंग वर्षामध्ये दर आठवड्याला अपडेट होत असते. IMDb ग्राहक त्यामध्ये भर घालू शकतात व हे आणि इतर टायटल्स त्यांच्या IMDb वॉचलिस्टवर जोडू शकतात.
ह्या वर्षातील सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीज आणि चित्रपटांबद्दल आणखी माहिती:
“काय बघावे हे शोधण्यासाठी आणि ते ठरवण्यासाठी जगभरातील मनोरंजनाचे चाहते IMDb वर अवलंबून असतात आणि ह्या वर्षी प्रेक्षकांना आवडलेली अशी वैविध्यपूर्ण भारतीय चित्रपटांची यादी बघणे विशेष आहे.” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडियांनी म्हंटले. “देशभरात विविध फिल्म इंडस्ट्रीजमधील टायटल्स अनेक भाषांमध्ये येत असतात व स्ट्रीमिंग सेवांद्वारे अधिक व्यापक जागतिक दर्शकांना उपलब्ध करून दिल्या जात असतात व त्यामुळे देशांतर्गत कंटेंटसाठी अधिक संख्येमध्ये चाहते उपलब्ध होत आहेत. वेब सिरीजच्या संदर्भात आमच्या सर्वांत प्रसिद्ध यादीमध्ये जवळजवळ सर्व आघाडीच्या सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म्सवरील टायटल्सच्या समावेशाची उल्लेखनीय बाब बघायला मिळत आहे. भारतातील विशिष्ट सामाजिक लोकसंख्येचे मिश्रण आणि जाहिराती असलेले मोफत कंटेंट लक्षात घेता ह्या वर्षीच्या यादीमध्ये आपल्याला मोफत उपलब्ध असलेले शोजसुद्धा आलेले दिसतात.”
RRR ही 2022 चा सर्वांत प्रसिद्ध IMDb चित्रपट बनण्यासंदर्भात बोलताना चित्रपट निर्माते एस. एस. राजामौलींनी म्हंटले, “RRR ही एक मैत्रीची कहाणी आहे व प्रत्येकाला ती जवळची वाटते. गोष्ट सांगण्याच्या प्राचीन भारतीय पद्धतीसह ती सांगितली गेली आहे व हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जवळ आहे. ह्या सन्मानासाठी मी IMDb बद्दल आभारी आहे आणि मला हे प्रेम व कौतुक दाखवल्याबद्दल जगभरातील दर्शकांना धन्यवाद द्यायचे आहेत. हे यश पूर्ण कलाकारांचे व क्र्यू सदस्यांचे आहे व पडद्यावर प्रेक्षकांना दिसणारी जादु उभी करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते”.
प्राईम व्हिडिओमधील कंटेंट लायसन्सिंग डायरेक्टर मनिष मेघनानी ह्यांनी म्हंटले, “दुस–या सीजनमध्येसुद्धा अमेझॉन ओरिजिनल सिरीज पंचायत दर्शकांना खिळवून ठेवत आहे हे बघताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. आजचे प्रेक्षक स्थानिक मुळे असलेल्या व नाते जोडता येईल अशी पात्रे असलेल्या कथांचे कौतुक करतात. अतिशय हलक्या फुलक्या विनोदाच्या माध्यमाद्वारे दर्शकांसोबत भावनिक नाते जोडून पंचायत ऑन स्क्रीन सादरीकरण्याच्याही पुढे गेली आहे. 2022 मधील IBDb च्या सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीजमध्ये पहिल्या स्थानी येताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. ह्या सिरीजमधील कहाणी आणि पात्रांमध्ये हरखून गेलेल्या आमच्या चाहत्यांना व IMDb युजर्सना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो. फुलेराचे रहिवासी पुढे काय करतील, हे बघण्यासाठी आम्ही आता अतिशय उत्सुक आहोत..”
IMDb सोबत विशेष प्रकारे बोलताना ओरिजिनल कंटेंट क्रिएटर द व्हायरल फीवरचे (टीव्हीएफ) संस्थापक अरुनाभ कुमार ह्यांनी म्हंटले, टीव्हीएफवरील अनेक शोज ह्या यादीमध्ये आल्याबद्दल मला अतिशय समाधान वाटते आणि त्याबरोबर निश्चिंतही वाटते आहे. आमच्यासाठी नावीन्यपूर्णता आणणे आणि आमच्या गोष्ट सांगण्यामध्ये प्रामाणिक राहाणे, हे नेहमीचे उद्दिष्ट होते. आणि वेळोवेळी आम्ही बघितले आहे की, त्यासाठी आम्हांला आमच्या श्रोत्यांचे प्रेम मिळाले आहे. त्याच उत्साहाने आम्ही पुढेही महान गोष्टी सांगत राहू. चित्रपट, टीव्ही शोज आणि वेब सिरीजबद्दल शोधणे व जाणून घेणे सोपे केल्याबद्दल आणि नेहमीच निर्मात्यांची मदत केल्याबद्दल मी IMDb ला धन्यवाद देतो“.
ह्या वर्षीच्या सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपटांबद्दल अधिक जाणून घेण्य़ासाठी हा व्हिडिओ पाहा: https://www.imdb.com/video/vi4093494553/ आणि पूर्ण यादी इथे वाचा: https://www.imdb.com/list/ls563920985
ह्या वर्षीच्या सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीजबद्दल अधिक जाणून घेण्य़ासाठी हा व्हिडिओ पाहा:: https://www.imdb.com/video/vi1979630873/ आणि पूर्ण यादी इथे वाचा: https://www.imdb.com/list/ls563922748
IMDb च्या 2022 च्या सर्वोत्तम विभागामध्ये वर्षाच्या शेवटी असलेल्या विविध प्रकारच्या सर्वोच्च याद्यासुद्धा आहेत तसेच मागील वर्षाच्या फोटो गॅलरीज, ट्रेलर्स, ओरिजिनल् व्हिडिओज (आगामी मेमोरियम व्हिडिओसह) आणि इतर कव्हरेजसुद्धा आहे– https://www.imdb.com/best-of.
IMDb विषयी
IMDb हा चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगामधील सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोत आहे. काय बघावे व कुठे बघावे ह्याचा निर्णय घेण्यासाठी चाहत्यांना मदत करणारी उत्पादने आणि सेवा ज्यामध्ये पुढील समाविष्ट आहेत: डेस्कटॉप आणि मोबाईल डिव्हाईसेससाठी IMDb वेबसाईट, आयओएस आणि अँड्रॉईडसाठी एप्लिकेशन्स आणि फायर टीव्ही डिव्हईसेसवर IMDb एक्स– रे. IMDb मोफत स्ट्रीमिंग होणारे चॅनल– IMDb TV सुद्धा चालवते आणि IMDb ओरिजिनल व्हिडिओ सिरीजची निर्मितीसुद्धा करते.मनोरंजन उद्योगातील व्याव्सायिकांसाठी IMDb IMDbPro आणि बॉक्स ऑफीस मोजो उपलब्ध करते. IMDb अमेझॉन कंपनी आहे. अधिक माहितीसाठी, इथे भेट द्या– https://www.imdb.com/press आणि फॉलो करा– @IMDb_in.