मुंबई, २ फेब्रुवारी २०२३: भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या कल्याण ज्वेलर्सने मुंबईतील बोरिवली येथे नवीन डिझाईन केलेले शोरूम सुरू केले. एक खास वैयक्तिकृत खरेदीचा अनुभव देण्यासाठी कल्याण ज्वेलर्सने नवीन शोरूम मध्ये ‘विशेष मुहूर्त लॉन्ज’ ही अनोखी संकल्पना सादर केली आहे. शोरूमला भेट देणाऱ्या लग्नासाठी दागिने खरेदीदारांसाठी खास ही सेवा तयार करण्यात आली आहे. हे पुन्हा डिझाईन केलेले हे शोरूम ऑरा कॉम्प्लेक्स, एस-४/एस-८, स्वामी विवेकानंद रोड बोरिवली येथे आहे.
संपूर्ण नवीन प्रकारच्या या शोरूम मध्ये कल्याण ज्वेलर्सच्या ज्वेलरी कलेक्शन मधील खास दागिन्यांच्या विस्तृत डिझाईन्सची श्रेणी प्रदर्शित केली आहे. कल्याण ज्वेलर्स पेट्रॉन्सना अत्याधुनिक सुविधा आणि जागतिक दर्जाचे वातावरण देण्याचे वचन देतो आणि एक अतुलनीय अनुभव सादर करतो. कल्याण ज्वेलर्सचे प्रशिक्षित आणि जाणकार कर्मचारी ग्राहकांना त्यांच्या शैली आणि बजेटला साजेसे दागिने शोधण्यात मदत करतील. कल्याण ज्वेलर्सचे शोरूम आज पूर्णपणे कार्यरत आहे आणि प्रत्येक ग्राहकाची आवड आणि प्राधान्यानुसार समकालीन आणि पारंपरिक डिझाईनची विस्तृत श्रेणी प्रदान करते.
श्री.रमेश कल्याणरमण, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले, “नवीन वर्ष सुरू होत असताना आम्ही बोरिवली येथे कल्याण ज्वेलर्सचे नूतनीकरण केलेले हे खास शोरूम चालू करून साल २०२३ मध्ये पदार्पण करीत आहोत. एक समग्र परिसंस्था निर्माण करणे, आमच्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणे आणि त्यांचा खरेदीचा अनुभव अजून समृद्ध करणे हा या मागचा उद्देश आहे. मुहूर्त लॉन्ज सुरू करताना आम्हाला विश्वास आहे की ही सेवा लग्नाच्या खरेदीदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होईल. कंपनीच्या विश्वास आणि पारदर्शकतेच्या नितीमूल्यांवर खरे राहून ग्राहकांना जागतिक दर्जाचे वातावरण प्रदान करून स्वतःला पुन्हा पुन्हा नव्याने शोधण्याची आमची महत्वाकांक्षा आहे.”
नवीन शो रूम सुरू करण्याचा आनंद अनोख्या शैलीत साजरा करून ब्रॅंड ने सर्व दागिन्यांच्या घडणावळीवर २५% पर्यंत सूट तसेच सोन्याच्या दरावर सूट जाहीर केली आहे. ग्राहक दागिन्यांच्या खरेदीवर कल्याणच्या चार स्तरीय हमी प्रमाणपत्रासह (४-लेवल अॅश्यूरन्स सर्टिफिकेशन) रोमांचक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.