मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३: एसएलसीएमने किसानधन या आपल्या वित्त विभागाच्या माध्यमातून, मोठे यश साध्य करत ७८,००० हून अधिक छोट्या व सीमांत शेतकऱ्यांच्या आयुष्यांवर मूलगामी स्वरूपाचा प्रभाव टाकला आहे. तसेच २३,००० हून अधिक महिला कर्जदारांनाही कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना आणि समभागधारकांना, एसएलसीएमच्या अत्याधुनिक गोदामांमध्ये साठवलेल्या त्यांच्या मालावर, ५ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून घेण्याची क्षमता किसानधन हे उत्पादन पुरवते. या महत्त्वपूर्ण यशातून एसएलसीएमचे कृषी समुदायाप्रती समर्पण तर दिसून येतेच शिवाय कंपनीसाठीही हा मोठा बदल घडवून आणणारा क्षण आहे.
किसानधनने आपल्या वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणींच्या माध्यमातून, २७७३ कोटी रुपयांचे एकत्रित कर्जवितरण सुलभ केले आहे आणि ४८,९३६ गोदाम पावत्याही जारी केल्या आहेत. या उत्पादन श्रेणींमध्ये कमोडिटी बेस्ड फायनान्स (सीबीएफ), फायनान्सिंग एफपीओ अँड बिझनेस करस्पॉण्डन्स (बीसी) आदींचा समावेश होतो. या लक्षणीय यशातून एसएलसीएमची कृषी समुदायाप्रती बांधिलकी अधोरेखित होते.
एसएलसीएमचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप सभरवाल म्हणाले, “किसानधन हा उपक्रम म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती अविचल बांधिलकीचे प्रतीक आहे. ६५,०००हून अधिक छोट्या व सीमांत शेतकऱ्यांच्या आणि २३,०००हून अधिक महिला कर्जदारांच्या आयुष्यांवर सकारात्मक प्रभाव करता आला, याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भविष्यकाळातही एसएलसीएम अधिक नवोन्मेष्कारी उत्पादने आणण्यासाठी समर्पितपणे काम करेल आणि कृषी समुदायाला सक्षम करून या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणेल.”
शेतकरी, एकत्रीकरण करणारे (अॅग्रीगेटर्स), व्यापारी आणि शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) यांच्या कर्ज प्राप्त करण्याच्या मार्गामध्ये किसानधन क्रांती घडवून आणत आहे. बियाणी, खते, कीटकनाशके यांसारख्या कच्च्या मालाची खरेदी तसेच सुगीचा हंगाम आदी महत्त्वाच्या कालखंडांमध्ये सदस्य असलेल्या व नसलेल्या शेतकऱ्यांना सहाय्य करण्यात एफपीओ महत्त्वाची भूमिका बजावतात, याची एसएलसीएमला कल्पना आहे. एफपीओंना वेळेत कर्जे मिळतील हे किसानधन निश्चित करते. त्यामुळे एफपीओ शेतकऱ्यांना सहाय्य करू शकतात. परिणामी, शेतकऱ्यांना सर्वाधिक आवश्यकता असते तेव्हा तत्काळ निधी उपलब्ध होतो. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेच्या साधनांमध्ये सुधारणा होते.