मुंबई, सप्टेंबर २०२४: राष्ट्रीय भविष्य निर्वाह निधी योजने (the National Pension System (NPS)) अंतर्गत येणाऱ्या एचडीएफसी पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेड (एचडीएफसी पेन्शन) ने १२ सप्टेंबर २०२४ पर्यंत आपल्या व्यवस्थापनाअंतर्गत येणाऱ्या निधी अर्थात असेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) मध्ये रु. १,००,००० कोटी रुपयांचा आकडा पार करत एक लक्षणीय टप्पा गाठला आहे. २०२३ मध्ये कंपनीद्वारे रु. ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक हाताळली जात होती, मात्र कंपनीच्या सबस्क्रायबर्समध्ये ३४.१ टक्क्यांच्या उल्लेखनीय वाढ होऊन ती २१ लाखांवर गेल्याने मिळालेल्या चालनेमुळे फंडाच्या एयूएममध्ये अवघ्या १६ महिन्यांतच दुप्पट वाढ झाली ही बाबही या यशाने अधोरेखित झाली आहे.
एचडीएफसी लाइफ इन्श्युरन्स कंपनी लि.च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून एचडीएफसी पेन्शनची झपाट्याने झालेली वाढ पेन्शन फंड क्षेत्रातील तिचे अग्रस्थान आणि लोकांना त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यामध्ये मदत करण्याप्रती त्यांची अविचल बांधिलकी ठळकपणे निर्देशित करते.
एचडीएफसी पेन्शनने अलीकडेच आपल्या यशस्वी कामकाजाची ११ वर्षे पूर्ण केली व सध्या कंपनीकडे असलेल्या एकूण एनपीएस एयूएम मधील ४३.६ टक्के निधीचे व्यवस्थापन रिटेल आणि कॉर्पोरेट क्षेत्रातून केले जात आहे, व सर्व सबस्क्रायबर्सपैकी ३६.८ टक्के सबस्क्रायबर्सनी एचडीएफसी पेन्शनची आपल्या पसंतीचा फंड मॅनेजर (पीएफएम) म्हणून निवड केली आहे, ज्यामुळे कंपनीची बाजारपेठेतील अग्रस्थानावील घट्ट पकड आणि गुंतवणूकदारांकडून मिळणारा विश्वास या गोष्टी ठळकपणे दिसून आल्या आहेत. कंपनीजवळ ५००० हून अधिक समर्पित पेन्शन एजंट्स आहेत व हे कॉर्पोरेट कंपन्यांमधील तीन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना सेवा पुरविणारे व २८०० हून अधिक कंपन्यांबरोबर काम करणारे सर्वात मोठे कॉर्पोरेट एनपीएस पॉइंट ऑफ प्रेझेन्स आहे.
एचडीएफसी पेन्शनचे चीफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर श्रीराम अय्यर या लक्षणीय यशाविषयी बोलताना म्हणाले, “इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी आणि संस्थांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासासमोर आम्ही खरोखरीच नतमस्तक आहोत. एचडीएफसी पेन्शनमध्ये आम्ही आमच्या सबस्क्रायबर्सना, पार्टनर्सना, पेन्शन एजंट्सना आणि डिस्ट्रिब्युटर्सना नेहमीच सर्वोत्तम सेवा देण्यावर कायमच आपले लक्ष केंद्रित केले आहे. १,००,००० कोटी रुपयांच्या एयूएमचा टप्पा गाठणे हे एक लक्षणीय यश आहे व आमचे सामुदायिक प्रयत्न व आमच्या लाभार्थींनी आमच्यावर ठेवलेला विश्वास यांचा हा परिणाम आहे. आमचे ग्राहक, नियामक संस्था पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (पीएफआरडीए), नॅशानल पेन्शन सिस्टीम ट्रस्ट आणि आमचे सीआरए पार्टनर्स – प्रोटीयन eGov टेक्नोलॉजीज केफिन टेक्नोलॉजीज लि. आणि सीएएमएस एनपीएस यांनी आम्हाला दिलेल्या पाठबळासाठी आम्ही या सर्वांचे मनापासून आभार मानतो.”
ते पुढे म्हणाले, “नॅशऩल पेन्शन स्कीम (एनपीएस) हे एक स्वतंत्र आर्थिक साधन आहे, जे लोकांना आपल्या निवृत्तीपश्चातच्या काळासाठी लवचिकतेने व कमी खर्चिक पद्धतीने नियोजन करण्याचे बळ देते. आमच्या सबस्क्रायबर्सच्या बरोबरीने आपलीही वाढ साधण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. एनपीएस लोकांना आपल्या भविष्यासाठी आत्मविश्वासाने सज्ज होण्याची ताकद देत राहील याची आम्हाला खात्री आहे.”
बाजारपेठेतील अग्रस्थान: सर्वोत्कृष्टतेशी बंधिलकी
तंत्रज्ञानातील प्रगती: एचडीएफसी पेन्शन आपल्या पॉइंट ऑफ प्रेझेन्स आणि आपल्या पार्टनर्ससाठी एनपीएस अनुभवात सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. अखंड डिजिटल वाटचालींमध्ये गुंतवणूक करत आणि व्हॉट्सअॅप बॉट (WhatsApp BOT) सहाय्यासारख्या सेवा सुरू करत कामाची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध बनविणे आणि अपवादात्मक ग्राहकसेवा पुरविणे हे कंपनीचे लक्ष्य आहे.
कामकाजातील सर्वोत्कृष्टता: एचडीएफसी पेन्शनच्या कामकाजाच्या चौकटीमध्ये अखंड, विनासायास पद्धतीने व तत्परतेने सेवा पुरवली जाण्याची काळजी घेण्यात आली आहे. कार्यान्वयनातील सर्वोत्कृष्टतेप्रती कंपनीच्या समर्पिततेचे कौतुक करण्यासाठी तिला इंडिया इन्श्युरन्स समिट २०२४ मध्ये ‘बेस्ट पेन्शन सर्व्हिस प्रोव्हायडर’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
याबरोबरच, एचडीएफसी पेन्शनला मनी टूडेकडून २०१९ ते २०२२ पर्यंत सलग तीन वर्षांसाठी ‘बेस्ट परफॉर्मिंग पीएफएम’चा पुरस्कार देण्यात आला आहे, ज्यामुळे फंड मॅनेजमेंट क्षेत्रामधील कंपनीचे आघाडीचे स्थान अधिकच भक्कम झाले आहे.