maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

वजीरएक्सने क्रिप्टो कर भरण्याची प्रक्रिया सोपी केली

मुंबई, १० सप्टेंबर २०२३: भारतातील आघाडीच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज व्यासपीठ असलेल्या वजीरएक्स ने टैक्सनोड्सच्या सहकार्याने भारतीय क्रिप्टो गुंतवणूकदारांसाठी कर भरण्याची प्रक्रिया सोपी केली आहे, ज्यामुळे त्यांना क्रिप्टो कर भरण्यातील गुंतागुंतीचे निराकरण करण्यासाठी एका सोप्या आणि प्रभावी पद्धतीचा मार्ग खुला झाला आहे.

वजीरएक्स आणि टैक्सनोड्स यांनी मिळून भारतीय क्रिप्टो गुंतवणूकदारांना त्यांची कर कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी एक अचूक आणि त्रासमुक्त प्रक्रिया प्रदान करून त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी एक मिशन सुरू केले आहे. या सहकार्याच्या यशावर प्रकाश टाकणाऱ्या यशाच्या महत्त्वाच्या प्रशस्तिपत्रांमध्ये सर्वसमावेशक सहभाग, भौगोलिक पोहोच, कार्यक्षम वेळ व्यवस्थापन, कार्यक्षम वेळ व्यवस्थापन, शैक्षणिक उपक्रम आदि गोष्टींचा समावेश आहे.

वजीरएक्सचे उपाध्यक्ष राजगोपाल मेनन यांनी यावर भर दिला की, “टैक्सनोड्स सोबतची आमची भागीदारी भारतीय क्रिप्टो समुदायाप्रती असलेली आमची दृढ वचनबद्धता दर्शवते. आम्ही गुंतवणूकदारांना कर नियमांच्या गुंतागुंतीतून मार्गदर्शन करत असताना, त्यांच्या यशस्वी आर्थिक प्रवासाची खात्री करणे हे आमच्या खऱ्या समर्पणाचे उदाहरण आहे.”

टैक्सनोड्सचे संस्थापक अविनाश शेखर म्हणाले, “आम्हाला अभिमान आहे की ही भागीदारी खूप यशस्वी झाली आहे. एकत्रितपणे, आम्ही भारतीय क्रिप्टो गुंतवणूकदारांना त्याच्या कराची अचूकपणे गणना करण्यात, मूल्यमापन करण्यात आणि भरण्यास मदत केली आहे. त्यांना तज्ञांचा सल्ला आणि वैयक्तिकृत सेवा देखील प्रदान केली आहे, जेणेकरून ते कर भरण्याच्या गुंतागुंतीची काळजी न करता मुक्तपणे क्रिप्टोचा व्यापार करू शकतात. या भागीदारीमुळे अनुपालन वाढले आहे आणि नियामक अनिश्चितता कमी झाली आहे, ज्यामुळे भारतीय क्रिप्टो बाजाराच्या वाढीला चालना मिळाली आहे.”

 

Related posts

मिनोषा इंडिया लिमिटेडने लेझर प्रिंटर्सची स्‍मार्ट श्रेणी लाँच केली

Shivani Shetty

इझमायट्रिपचा कव्‍हर जिनियससोबत सहयोग

Shivani Shetty

आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपची ऑफिशियल बेव्‍हरेज सहयोगी थम्‍स अप आणि शाहरूख खान यांनी टीम इंडियाच्‍या विजयाबाबत जागृत केला विश्‍वास

Shivani Shetty

Leave a Comment