maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचा श्रीराम फायनान्‍स लिमिटेडसोबत सहयोग

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२५: इलेक्ट्रिक गतीशीलतेच्‍या अवलंबतेला गती देण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या नाविन्‍यपूर्ण इलेक्ट्रिक वेईकल्‍सच्‍या उत्‍पादक कंपनीने आज श्रीराम फायनान्‍स लिमिटेडसोबत धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली. या सहयोगांतर्गत भारतभरातील ग्राहकांना विशेष फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यात येतील. या सहयोगाचा ‘श्रीराम ग्रीन फायनान्‍स’ उपक्रमांतर्गत गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सच्‍या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकींच्‍या संपूर्ण श्रेणीसह लो-स्‍पीड व हाय-स्‍पीड इलेक्ट्रिक वेईकल्‍स (ईव्‍ही – एल३ व एल५)साठी सर्वसमावेशक फायनान्सिंग पर्याय देण्‍याचा मनसुबा आहे.

 

या सहयोगाच्‍या माध्‍यमातून श्रीराम फायनान्‍स लिमिटेड गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्ससाठी पसंतीची फायनान्‍स सहयोगी म्‍हणून सेवा देईल, तसेच सर्वोत्तम फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देईल, जे ग्राहकांना अधिक किफायतशीरपणे व सुलभपणे इलेक्ट्रिक वेईकल्‍सचा अवलंब करण्‍यास साह्य करतील. फायनान्सिंग पर्याय संपूर्ण भारतात उपलब्‍ध असतील, जेथे देशभरातील ग्राहकांना आकर्षक कर्ज ऑफर्स आणि सुलभ मुदत व कमी प्रक्रिया शुल्‍कांमधून फायदा होऊ शकण्‍याची खात्री मिळेल.

 

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्‍हणाले, “आम्‍हाला ग्राहकांकरिता सोईस्‍कर व स्थिर फायनान्सिंग पर्याय सादर करण्‍यासाठी श्रीराम फायनान्‍स लिमिटेडसोबत या धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. शाश्‍वत ई-गतीशीलता सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍याप्रती आमच्‍या सुरू असलेल्‍या कटिबद्धतेचा भाग म्‍हणून हा सहयोग ग्राहकांना उच्‍च दर्जाच्‍या इलेक्ट्रिक वेईकल्‍सचे मालक बनणे सोपे करेल. आमची पंसतीची सहयोगी म्‍हणून श्रीराम फायनान्‍ससोबत आम्‍हाला विश्‍वास आहे की, भारतभरातील अधिकाधिक लोक पर्यावरणपूरक गतीशीलता सोल्‍यूशन्‍सचा अवलंब करतील.”

 

फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍समध्‍ये स्‍पर्धात्‍मक व्‍याजदर, दीर्घकालीन कर्ज मुदत आणि सोपी अर्ज प्रक्रिया यांचा समावेश असेल, तसेच श्रीराम फायनान्‍स लि. आकर्षक फायनान्‍स पर्याय देतील, ज्‍यामुळे ईव्‍हींच्‍या विक्रीला गती मिळेल. हे सोल्‍यूशन्‍स गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सच्‍या इलेक्ट्रिक दुचाकी, तीन-चाकी आणि एल३ व एल५ कॅटेगरी इलेक्ट्रिक वेईकल्‍स खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करतील.

Related posts

व्हिएतजेटने तिरूचिरापल्ली ते हो ची मिन्ह सिटी दरम्‍यान नवीन थेट उड्डाणमार्गाच्‍या माध्‍यमातून भारत व व्हिएतनामधील कनेक्‍टीव्‍हीटी वाढवली

Shivani Shetty

गुलाबी’ शहरात सुरु होणार नव्या मैत्रीचा प्रवास ‘गुलाबी’चा धमाल टिझर प्रदर्शित

Shivani Shetty

रुग्णांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटल्सने डोझीच्या सहयोगाने सुरू केला महाराष्ट्राचा पहिला ‘एआय-पॉवर्ड कमांड सेंटर’ उपक्रम

Shivani Shetty

Leave a Comment