maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

मातृदिनानिमित्त द बॉडी शॉपची नवी मोहिम

मुंबई, १२ मे २०२४: आई प्रती अविरत प्रेम, केअर व अभिजातपणा व्‍यक्‍त करण्‍यासाठी गुलाबासारखी  सुरेख व प्रतीकात्‍मक गोष्‍ट दुसरी कोणतीच नाही. यंदा मातृदिनानिमित्त द बॉडी शॉपने डायना पेण्‍टीसोबत हृदयस्‍पर्शी व्हिडि‍ओ मोहिम लाँच केली आहे, ज्‍यामध्ये त्‍यांची आयकॉनिक ब्रिटीश रोझ श्रेणी आहे, जी आपल्‍या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण महिला म्‍हणजेच आईला सन्‍मानित करण्‍यासोबत तिची काळजी घेण्‍यासाठी परिपूर्ण आहे.

या जाहिरातीलमधील संकल्‍पना मातृदिनामागील भावनेला सुरेखरित्‍या कॅप्‍चर करते. जाहिरातीच्‍या सुरूवातीला डायना पेण्‍टीला टेक्‍स्‍चर्ड कलाकृती तयार करण्‍यास प्रेरणा मिळते, ज्‍यामध्‍ये ती आपल्‍या आईच्‍या आठवणींना उजाळा देत स्‍वत:च्‍या कलाकृतीमधून गुलाब तयार करते. हाताने चिकणमातीसह कलाकृती तयार करत असताना तिला तिच्‍या आईचे प्रेम आणि केअरची आठवण येते. ती दावा करते की गुलाब मातांसाठी आहेत, ज्‍यामध्‍ये प्रेम, कोमलता व आशीर्वाद सामावलेले आहेत, जे फक्‍त आईशी संलग्‍न असू शकतात.

आपल्‍या निसर्ग-प्रेरित फुलांच्‍या सुगंधासाठी ओळखली जाणारी आयकॉनिक बाथ व बॉडीकेअर ब्रिटीश रोझ श्रेणी मातांना सन्‍मानित करण्‍यासाठी परिपूर्ण आहे. इंग्‍लंडमधील हाताने निवडण्‍यात आलेल्‍या गुलाबांचे  सार समाविष्‍ट असलेले ब्रिटीश रोझ बॉडी योगर्ट आणि हँड क्रीम ४८-तास हायड्रेशन देतात, ज्‍यामधून मुली व मातांना सर्वोत्तम पॅम्‍परिंग अनुभवाची खात्री मिळते. या जाहिरातीचा भाग म्‍हणून द बॉडी शॉप सर्वांना त्‍यांच्‍या मातांना लक्‍झरीअस ब्रिटीश रोझ श्रेणीसह अविरत प्रेम, केअर व पॅम्‍परिंग गिफ्ट करण्‍याचे आवाहन करते. 

द बॉडी शॉप साऊथ एशियाच्‍या प्रॉडक्‍ट, मार्केटिंग अँड डिजिटलच्‍या उपाध्‍यक्ष श्रीमती हरमीत सिंग म्‍हणाल्‍या, “आमची ब्रिटीश रोझ श्रेणी जगभरातील मातांची निरंतर मोहकता व सौंदर्याला मानवंदना आहे. यंदा मातृदिनानिमित्त आही सर्वांना द बॉडी शॉपची निसर्ग-प्रेरित, वेगन उत्‍पादने गिफ्ट करत आईप्रती त्‍यांचे प्रेम व प्रशंसा व्‍यक्‍त करण्‍याचे आवाहन करतो. चला तर मग, आपले पालनपोषण केलेल्‍या मातांना गुलाबांच्‍या सौम्‍य अनुभवासह उत्‍साहित करूया, ज्‍यामध्‍ये प्रेम, केअर व ताकदचे सार सामावलेले आहे.”

अभिनेत्री डायना पेण्‍टी म्‍हणाल्‍या, “माझी आई नेहमी माझी संरक्षक, स्‍वर्ग आहे. तिच्‍याजवळ असताना मी माझ्या सर्व चिंता विसरून जाते आणि तिच्‍या सहवासात प्रेम व सांत्‍वन मिळते. मला दररोज तिचे आभार मानण्‍यासोबत कौतुक करायला मिळत नाही, पण द बॉडी शॉपची मोहिम तिच्‍यासाठी आणि इतर सर्व मातांसाठी प्रेमपत्र आहे. ब्रिटीश रोझ कलेक्‍शन निश्चितच तिच्‍यासाठी सर्वोत्तम गिफ्ट आहे, ज्‍यामुळे मी जवळ नसताना देखील ती स्‍वत:ला पॅम्‍पर करू शकते.”

Related posts

मोबाइल एआय युगामध्‍ये आपले स्‍वागत आहे

Shivani Shetty

वर्क इंटिग्रेटेड लर्निंग’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Shivani Shetty

ईरिक्रूटकडून उल्‍लेखनीय वाढीची नोंद

Shivani Shetty

Leave a Comment