डीआरएचपी लिंक:
आझाद इंजिनियरिंग लिमिटेडने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे दाखल केला आहे.
कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये ₹2400 दशलक्ष रुपयांपर्यंतचे फ्रेश इश्यू आणि ₹5000 दशलक्ष रुपयांपर्यंत प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे.
विक्रीच्या ऑफरमध्ये राकेश चोपदार यांचे ₹1700 दशलक्ष रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स, पिरामल स्ट्रक्चर्ड क्रेडिट अपॉर्च्युनिटीज फंडचे ₹2,800 दशलक्ष रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि डीएमआय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे ₹500 दशलक्ष रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स यांचा समावेश आहे.
कंपनीने ऑफरमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा कंपनीच्या भांडवली खर्चासाठी, कंपनीने घेतलेल्या काही कर्जाची पूर्ण किंवा काही प्रमाणात परतफेड/प्री पेमेंट आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापर करण्याचा प्रस्ताव आहे.
अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि आनंद राठी अॅडव्हायजर्सलिमिटेड इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
एरोस्पेस आणि संरक्षण, ऊर्जा आणि तेल आणि वायू उद्योग, उच्च अभियांत्रिकी, जटिल आणि जीवनावश्यक घटकांची निर्मिती करणार्या जागतिक मूळ उपकरण निर्मात्यांना (“OEMs”) त्यांच्या पात्र उत्पादनांचा पुरवठा करणार्या प्रमुख उत्पादकांपैकी एक आझाद अभियांत्रिकी आहे. कंपनी जटिल आणि उच्च अभियांत्रिकी अचूक बनावटीचे आणि मशीन केलेले घटक तयार करते. ते जीवनावश्यक उत्पादनात असतात आणि म्हणूनच, त्यांच्या काही उत्पादनांमध्ये “शून्य दोष” असणे गरजेचे असते.
आझाद इंजिनियरिंग चीन, युरोप, अमेरिका आणि जपानमधील उत्पादकांशी स्पर्धा करते. त्यांच्या ग्राहकांमध्ये जनरल इलेक्ट्रिक, हनीवेल इंटरनॅशनल इंक., मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज, लि., सीमेन्स एनर्जी, ईटन एरोस्पेस आणि MAN एनर्जी सोल्यूशन्स SE सारख्या एरोस्पेस आणि संरक्षण, ऊर्जा आणि तेल आणि वायू उद्योगातील जागतिक OEMs यांचा समावेश आहे.
आझाद इंजिनियरिंगचे घटक त्यांच्या स्थापनेपासून यूएसए, चीन, युरोप, मध्य पूर्व आणि जपान या देशांना पुरवले गेले आहेत. त्यानुसार, ते OEM साठी जागतिक पुरवठा साखळीतील प्रमुख दुवा आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३१.६१% च्या समायोजित EBITDA मार्जिनसह आर्थिक वर्ष २०२० मधील ₹1,240.00 दशलक्ष रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ₹2,516.75 दशलक्ष रुपयांपर्यंत (आर्थिक वर्ष २०२० आणि २०२३ मधील २७% च्या CAGR) महसूल वाढविला आहे. कंपनीद्वारे सेवा दिलेल्या प्रमुख उद्योगांसाठी मशीन केलेल्या घटकांकरता प्रमुख कंपन्यांपैकी सर्वोच्च EBITDA मार्जिन देणारी कंपनी यासह (आर्थिक वर्ष २०२०- २०२३ या कालावधीतील महसूल वाढीच्या दृष्टीने)सर्वात वेगाने वाढणाऱ्या उत्पादकांपैकी एक आझाद इंजिनियरिंग आहे.