मुंबई, २४ ऑगस्ट २०२३: विंग्जने भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स रिटेल क्षेत्रामधील झपाट्याने विकसित होणारा डायरेक्ट-टू-कंझ्युमर ब्रॅण्ड म्हणून स्वत:चे स्थान दृढ केले आहे. डिवाईसनेक्स्ट समिट येथे ‘मोस्ट पॉप्युलर टीडब्ल्यूएस ब्रॅण्ड’ म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या विंग्जने गेम-चेंजिंग प्राइम स्मार्टवॉच व फ्लोबड्स ३०० इअरबड्स लॉन्च केले आहेत.
विंग्जने नवीन स्मार्टवॉच श्रेणी प्राइम स्मार्टवॉच लाँच केले आहे, ज्याची स्पेशल लॉन्च किंमत १४९९ रूपये (सामान्यत: १७९९ रूपये) आहे. १.९६ इंच एचडी स्क्रिन, प्रगत सिंगल चिप ब्ल्यूटूथ कॉलिंग आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी ही सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. बॅटरी कॉलिंगशिवाय ७ दिवसांपर्यंत, तर कॉलिंगसह ३ दिवसांपर्यंत कार्यरत राहते. याव्यतिरिक्त १२० हून अधिक स्पोर्ट्स मोड्स, रिअल टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग, एसपीओ२ ट्रॅकिंग ही आरोग्य व फिटनेस ट्रॅकिंग संदर्भात भर करण्यात आलेली सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. या वॉचमध्ये अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे २०० हून अधिक वॉच फेसेस्, २ इनबिल्ट गेम्स, ई-कार्ड सपोर्ट, पासवर्ड लॉक, कॅमेरा कंट्रोल आणि इतर अनेक. प्राइम-ग्रेड नाविन्यतेचा अवलंब करण्याची हीच योग्य वेळ आहे.
विंग्ज फ्लोबड्स ३०० इअरबड्स असण्यासोबत साऊंड व स्टाइलचे कलात्मक अभिव्यक्ती देखील आहे. फक्त ९९९ रूपये (सामान्यत: १२९९ रूपये) किंमत असलेले इअरबड्स तुमच्यासाठी फॅशन स्टेटमेंट देखील आहेत. लक्झरीअस लेदर फिनिशसह फ्लोबड्स ३०० तुमच्या संगीत ऐकण्याच्या अनुभवाला पुनर्परिभाषित करण्यासाठी आले आहेत. या इअरबड्समध्ये स्मार्ट ईएनसी, १३ मिमी ड्रायव्हर्स आणि ५० तासांपर्यंत प्लेटाइम आहे.
सह-संस्थापक विजय वेंकटश्वरन म्हणाले, “विंग्ज प्राइमसह आम्हाला वेअरेबल्स क्षेत्रात व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश करण्याचा आनंद होत आहे. प्राइम स्मार्टवॉचच्या पॉवर-पॅक वैशिष्ट्यांसह आम्ही तरूणांना पसंत असलेले आधुनिक डिझाइन ट्रेण्ड्स लक्षात घेत उत्पादने सतत शिपिंग करत आहोत. हीच बाब फ्लोबड्स ३०० साठी देखील आहे, ज्यामध्ये अद्वितीय लेदर फिनिश आहे, जे इतर कोणत्याही टीडब्ल्यूएस इअरबडच्या तुलनेत अद्वितीय आहे.”
दोन्ही उत्पादने आज पासून उपलब्ध असतील, जेथे प्राइम फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल आणि फ्लोबड्स ३०० खरेदीसाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन व विंग्ज वेबसाइटवर उपलब्ध असेल. या गॅझेट्समध्ये विंग्जचे तत्त्व सामावलेले आहे, ते म्हणजे तंत्रज्ञान व ट्रेण्ड, फॉर्म व फंक्शन आणि फॅशन व फंक्शन यांचे परिपूर्ण संयोजन. या लॉन्चसह विंग्ज तंत्रज्ञानाच्या नवीन आविष्काराला अनलॉक करत आहे, जे निश्चितच अद्वितीय आहे.