मुंबई, १२ डिसेंबर २०२३: स्टडी ग्रुप या आंतरराष्ट्रीय शिक्षणामधील अग्रणी संस्थेला युनायटेड स्टेट्समधील तीन प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीज: ओमाहा येथील युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का, मेरीलँड येथील टॉसन युनिव्हर्सिटी आणि सॅन मार्कोस येथील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी यांच्यासोबत नवीन सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे.
स्टडी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी इयान क्रिचन यांच्या मते हा सहयोग संस्थेच्या जागतिक धोरणामधील महत्त्वाचा टप्पा आहे. ते म्हणाले, “आमच्या जागतिक व्यवसायामध्ये पुन्हा संतुलन राखण्याप्रती आमची कटिबद्धता या नवीन सहयोगांमधून दिसून येते, तसेच युनायटेड स्टेट्समधील आमची वाढती गुंतवणूक देखील दिसून येते. आमच्या भौगोलिक उपस्थितीमध्ये वाढ करत, आमच्या पोर्टफालिओमध्ये विविधता आणत आणि दर्जेदार संस्थांसह पोर्टफोलिओ अधिक दृढ करत आमचा जगभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अमेरिकन शिक्षण उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे.”
क्रिचन पुढे म्हणाले, “युनायटेड स्टेट्स आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी दीर्घकाळापासून अव्वल शिक्षण गंतव्य म्हणून ओळखले जाते आणि अमेरिकेमध्ये जागतिक शिक्षण व अनुभवाचा शोध घेण्यासह तेथील करिअर संधींचा फायदा घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना अधिक संधी देणे हा आमचा विशेषाधिकार आहे.”
स्टडी ग्रुपच्या २०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय नोंदणी वाढवण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून नवीन जागतिक शैक्षणिक सहयोगांची घोषणा करण्यात आली. क्रिचन यांनी आगामी वर्षातील पुढील घोषणांचे संकेत दिले, ज्यामुळे जागतिक शिक्षणाप्रती संस्थेची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. ते म्हणाले, “जगभरातील प्रतिभावान विद्यार्थ्यांचा सहभाग व यश वाढवण्यासह यूकेमधील आणि जगभरातील आमच्या सहयोगींना पाठिंबा देण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. आम्ही परिवर्तनात्मक शैक्षणिक उपक्रम विकसित करण्यासह नवीन प्रोग्राम्स सादर करत राहू, ज्यामुळे आमच्या विविध विद्यार्थी संघटनांना फायदा होईल.”
हे सहयोग स्टडी ग्रुपने नुकतेच संपादित केलेल्या उपलब्धींसह यूके व आयर्लंड पाथवे प्रोग्राम्समधील विद्यार्थ्यांच्या अपवादात्मक निकालांमुळे करण्यात आले आहेत. तसेच, संस्थेने स्टडी ग्रुप प्रोव्होस्ट व चीफ अकॅडेमिक ऑफिसर म्हणून प्रोफेसर इलीना रॉड्रिग्ज-फॅल्कन यांचे स्वागत केले उच्च शिक्षणामधील त्यांच्या व्यापक अनुभवासह संस्थेची नेतृत्व टीम अधिक प्रबळ होईल.
स्टडी ग्रुप आपल्या जागतिक व्यवसायामध्ये पुन्हा संतुलन राखत पुढे वाटचाल करत असताना या सहयोगांमधून दर्जेदार शिक्षणाप्रती त्यांची कटिबद्धता आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यशाचे अग्रणी फॅसिलिटेटर म्हणून त्यांची भूमिका दिसून येते.