मुंबई, १९ नोव्हेंबर २०२४: फेडरल एक्सप्रेस कार्पोरेशन या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने धोरणात्मक विस्तार करत दक्षिण भारताची एशिया-पॅसिफिक प्रांतातील महत्त्वाच्या इंपोर्ट्सपर्यंतची पोहोच वाढवली आहे आणि युरोप आणि US मधील निर्यातीस प्रोत्साहन दिले आहे. या नवीन उड्डाण सेवा लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळ्या इष्टतम करतील, जागतिक व्यापारात दक्षिण भारताची भूमिका सशक्त करतील, ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्याची फेडएक्सची वचनबद्धता बळकट करतील आणि जागतिक पुरवठा साखळीतील भारताच्या क्षमता खुल्या करतील.
चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, इंटरनॅशनल आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, एअरलाइन फेडएक्स श्री. रिचर्ड डब्ल्यू. स्मिथ म्हणाले, “आज भारत ही जगातील एक अत्यंत रोमांचक आर्थिक विकास गाथा आहे आणि त्यामुळे फेडएक्ससाठी एक महत्त्वपूर्ण विकास बाजाराचे प्रतिनिधित्व करत आहे. या गतिशील आणि झपाट्याने बदलत असलेल्या प्रांतातील संधींच्या बाबतीत मी उत्साही आहे आणि येथील स्थानिक व्यवसायांना जगाशी जोडून भारताविषयीची आमची बांधिलकी मजबूत करताना मला अभिमान वाटत आहे.”
फेडएक्स, मिडल ईस्ट, इंडिया सबकॉन्टिनेन्ट आणि आफ्रिकाचे अध्यक्ष कामी विश्वनाथन म्हणाले, “भारताच्या विकास गाथेत दक्षिण भारताची महत्त्वाची भूमिका आहे. ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स आणि EV उत्पादनात देशाच्या काही आघाडीच्या कंपन्या दक्षिण भारतात आहेत. ही नवीन उड्डाण सेवा म्हणजे या प्रांताची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी फेडएक्सने उचललेले धोरणात्मक पाऊल आहे. ही नवी सेवा समय-निबद्ध मागण्या पूर्ण करण्यास आणि जागतिक बाजारपेठांशी सहजपणे कनेक्ट होण्यास सक्षम करेल आणि जागतिक उत्पादनाचे आणि निर्यातीचे केंद्र म्हणून भारताचे स्थान आणखी पुढे घेऊन जाईल.”
ही नवीन उड्डाण सेवा गुआंगझोउला थेट बंगळूरशी जोडते आणि हा मधल्या अनेक प्रवासांचा अवधी एक कारभारी दिवासाने कमी करते. या उड्डाणामुळे बंगळूरातील फेडएक्स संचालन आणखी मजबूत झाले आहे. यामध्ये आता या शहरातून जाणारी आणि शहरात येणारी 22 साप्ताहिक उड्डाणे आहेत. हे उड्डाण लिथियम-आयन बॅटरी आणि कॉम्पोनंटसारख्या महत्त्वाच्या इंपोर्ट्सपर्यंत जलद पोहोच सुनिश्चित करते. ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रॉनिक्ससारख्या क्षेत्रांसाठी हे इंपोर्ट्स महत्त्वाचे आहेत. शिवाय, हे उड्डाण युरोप आणि US पर्यंतची निर्यात क्षमता वाढवते आणि त्यायोगे हेल्थकेअर, इंजिनियरिंग, ऑटोमोटिव्ह आणि ई-कॉमर्समधील व्यवसाय सशक्त करते आणि विश्वसनीय आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्ससह जागतिक मागण्या पूर्ण करते.
कनेक्टिव्हिटी वाढवण्याबरोबरच फेडएक्स भारताच्या वाढत्या व्यापार गरजांना समर्थन देण्यासाठी आपली डिजिटल ईकोसिस्टम निरंतर सुधारत आहे. फेडएक्स इम्पोर्ट टूल सारखी टूल्स गुंतगुंतीच्या आयात प्रक्रिया सोप्या करतात, तर फेडएक्स डिलिव्हरी मॅनेजर हे अधिक चांगल्या ग्राहक अनुभवासाठी डिलिव्हरी पर्यायांची यथायोग्य आखणी करण्यासाठी व्यापारांना सक्षम बनवते. फेडएक्स दिल्ली गेटवे हबच्या विस्तारामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग क्षमतेला प्रोत्साहन मिळाले आहे आणि भारतीय व्यापारांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक मजबूत पाया तयार झाला आहे. टेक्नॉलॉजी आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये निरंतर गुंतवणूक करून फेडएक्स जागतिक उत्पादन आणि व्यापार पॉवरहाऊस बनण्याच्या भारताच्या आकांक्षेला समर्थन देण्यास वचनबद्ध आहे.