मुंबई, १४ नोव्हेंबर २०२४: ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू७ साठी बुकिंगला सुरूवात केली आहे. नवीन ऑडी क्यू७ ऑडी इंडिया वेबसाइट किंवा ‘मायऑडी कनेक्ट’ अॅप्लीकेशनच्या माध्यमातून २,००,००० रूपयांच्या सुरूवातीच्या बुकिंग रकमेमध्ये बुक करता येऊ शकते.
औरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल प्लांट येथे स्थानिक पातळीवर असेम्बल करण्यात आलेली नवीन ऑडी क्यू७ भारतात २८ नोव्हेंबर २०२४ रोजी लाँच करण्यात येईल. ३४० एचपी शक्ती आणि ५०० एनएम टॉर्क निर्माण करणारे शक्तिशाली ३.० लिटर व्ही६ टीएफएसआय इंजिन असलेली नवीन ऑडी क्यू७ फक्त ५.६ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करू शकते आणि अव्वल गती २५० किमी/तास आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “ऑडी क्यू७ आमचे सर्वात आयकॉनिक उत्पादन असण्यासोबत सेलिब्रिटींसह सर्व लक्ष्य समूहांमध्ये लोकप्रिय आहे. नवीन ऑडी क्यू७ सह आम्ही सुधारित वैशिष्ट्ये, नवीन एक्स्टीरिअर डिझाइन आणि नवीन लक्षवेधक लाइट्स देत आहोत. आम्ही औरंगाबादमधील आमच्या ग्रुप प्लांटमध्ये नवीन ऑडी क्यू७ च्या स्थानिक असेम्ब्लीला सुरूवात केली आहे आणि २८ नोव्हेंबर २०२४ रोजी ही वेईकल लाँच करण्यास सज्ज आहोत.”
नवीन ऑडी क्यू७ साखीर गोल्ड, वेटोमो ब्ल्यू, मिथोस ब्लॅक, समुराई ग्रे आणि ग्लेशियर व्हाइट या पाच एक्स्टीरिअर रंगांमध्ये तसेच इंटीरिअर सिडार ब्राऊन आणि सायगा बीज या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
ग्राहक ऑडी इंडिया वेबसाइट (ऑडीडॉटइन) आणि ‘मायऑडी कनेक्ट’ अॅपच्या माध्यमातून ऑडी क्यू७ ऑनलाइन बुक करू शकतात