maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalअंबरनाथठळक बातम्यामहाराष्ट्रसंपादकीय

अंबरनाथ: व्यवसायवाढ आणि उत्तम नागरी जीवनाचा परिपूर्ण मिलाफ*

एक औद्योगिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण, निवासासाठी आदर्श स्थान आणि गिर्यारोहकांसाठीचा स्वर्ग मानले जाणारे अंबरनाथ हिरव्यागार निसर्गातील प्रगाढ शांतता आणि शहरी औद्योगिक जगण्यातील गजबज यांचा अनोखा मिलाफ साधते. मुंबईच्या या उपनगरामध्ये झालेली औद्योगिक आणि निवासी विकासकामे म्हणजे घरापासून चालतच कामावर पोहोचता यावे अशा ‘वॉक-टू-वर्क’ संकल्पनेचे मूर्त रूप असल्याने व्यापारी संस्थांना इथे दुकाने थाटणे सोपे झाले आहे. मुंबई आणि सुरत यांसारख्या व्यापारी केंद्रांशी असलेल्या कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हे ठिकाण आदर्श आहेच, पण त्याचबरोबर एम्पायर सेंट्रमद्वारे पुरविल्या जाणाऱ्या जागांसारख्या रेडी-टू-मूव्ह-इन औद्योगिक गाळ्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीनेही हे ठिकाण आदर्श आहे. या केंद्राकडून अनेक प्रकारच्या खास सोयीसुविधा पुरविल्या जात असल्याने उद्योजकांसाठी हा एक आकर्षक पर्याय ठरत आहे. ३५ एकरांच्या विस्तृत भूखंडावर उभ्या राहिलेल्या एम्पायर इंडस्ट्रियल सेंट्रम या निवासी आणि औद्योगिक टाऊनशिप प्रकल्पातील २८ एकरांची जागा ही फक्त GALAs म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औद्योगिक जागांसाठी संपूर्णपणे राखून ठेवण्यात आली आहे. एम्पायर इंडस्ट्रीयल सेंट्रम केवळ स्मार्ट रचना असलेल्या औद्योगिक जागाच पुरवित नाही, तर त्याहीपलिकडे जात “वॉक टू वर्क” संकल्पनेच्या माध्यमातून नागरी जीवन आणि व्यापार यांच्यासाठी एक सर्वसमावेशक परीसंस्था निर्माण करणे हे या प्रकल्पाचे लक्ष्य आहे.

*स्थान आणि कनेक्टिव्हिटी*
भौगोलिक स्थानाचा फायदा व कंपन्यांच्या दळणवळणाविषयीच्या चिंतांची काळजी घेणारी, हेवा वाटावा अशा कनेक्टिव्हिटीची मिळालेली जोड या गोष्टी अंबरनाथ अभिमानाने मिरविते. लवकरच होऊ घातलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकाच्या शेजारीच, किंवा त्या स्थानकाला जवळ-जवळ जोडूनच असलेल्या एम्पायर सेंट्रममधील औद्योगिक गाळ्यांसारख्या औद्योगिक आणि निवास टाऊनशिप प्रकल्पांच्या उदयामुळे अंबरनाथमध्ये रहायला येणे हे अत्यंत फायद्याचे ठरू शकते. वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवे आणि सहापदरी विरार-जेएनपीटी एक्स्प्रेसवे यांच्यामुळे केवळ महाराष्ट्रातील इतर भागांशीच नव्हे तर गुजरातमधील महत्त्वाच्या जिल्ह्यांशीही (वलसाड, सुरत) आणि तिथूनही पुढे दिल्लीशी अंबरनाथ उत्तम प्रकारे आणि सहज जोडले गेले आहे. अंबरनाथच्या आगळ्यावेगळ्या स्थानामुळे अनेक नव्या संभाव्य बाजारपेठांसाठी हे अगदी सुयोग्य असे प्रवेशद्वार आहे. इथले सुलभ रस्ते, रेल्वे आणि हवाईमार्गाद्वारे (मुंबई विमानतळमार्गे) तयार झालेल्या कनेक्टिव्हिटीला याचे श्रेय जाते. अंबरनाथमधून जाणाऱ्या एक्स्प्रेस अर्थात द्रुतगती मार्गांमुळे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे JNPT बंदर व्यापारी संस्थांना सहज पोहोचता येईल अशा अंतरावर आले आहे, ज्याचा वापर करून या संस्थांना समुद्रीमार्गे निर्यातीच्या संधी मिळविणे आर्थिकदृष्ट्या शक्य व्हावे.

*पायाभूत सोयीसुविधा आणि व्यापारातील वाढ*
कोणत्याही व्यवसायाच्या वाढीसाठी परवडण्याजोग्या पायाभूत सोयीसुविधा आणि मनुष्यबळ या दोन बाबी अपरिहार्य असतात. परवडणाऱ्या दरांत पायाभूत सोयीसुविधा देणारे एक उदयोन्मुख उपनगर म्हणून अंबरनाथ या दोन्ही गोष्टी देऊ करते, ज्यामुळे व्यापारी संस्थांना जागेच्या मर्यादा किंवा आर्थिक व्यवहार्यतेची चिंता न करता आपल्या कंपनीचा विस्तार करणे शक्य होते. इतकेच नव्हे तर अंबरनाथ एमआयडीसीने लोकांसाठी आणि व्यापारी संस्थांसाठीही वाढीच्या कितीतरी संधी खुल्या केल्या आहेत. हे ठिकाण वॉक टू वर्क संकल्पनेचाही पुरस्कार करते. एम्पायर सेंट्रममधील लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणारे ४०० औद्योगिक गाळे व्यावसायिक संस्थांना ‘बिल्ट-टू-सूट’ उपाययोजना देऊ करतात. विविध आकारात उपलब्ध असलेले आणि ग्राहकांच्या विशिष्ट गरजांनुसार तयार करण्यात आलेले हे गाळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची गरज (MSMEs) नेमकेपणाने भागविणारे आहेत, कारण इथे त्यांच्या खास गरजांचा विचार केला गेला आहे.
अंबरनाथ हा एक उदयोन्मुख निवासी भागही आहे, जिथे अनेक विख्यात विकासकांचे प्रकल्प आहेत. अंबरनाथची निवड करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे हे ठिकाण या गोदामांचे प्रमुख केंद्र असलेल्या भिवंडीपासून अवघ्या २५ ते ३० किमी अंतरावर (गाडीने सुमारे १.५ तास) आहे.

*एक हिरवेगार शहरी जीवन*
औद्योगिक केंद्राचा विषय निघाला की बरेचदा एका प्रदूषित आणि मर्यादित सोयीसुविधा असलेल्या, दाटीवाटीने वसलेल्या जागेची प्रतिमा डोळ्यांसमोर येते. पण इथेच अंबरनाथचे वेगळेपण आहे. हे ठिकाण विस्तीर्ण हरित भूभाग, परवडण्याजोगी घरे आणि चांगले जीवन जगण्यासाठी अनिवार्य असलेल्या भरपूर नागरी सोयीसुविधा देऊ करते. खरेतर, अंबरनाथ हे ठिकाण परवडणाऱ्या आणि आलिशान घरांसाठीचा पर्याय म्हणून वेगाने उदयास येत आहे. हे औद्योगिक केंद्र असल्याने कामाच्या ठिकाणाच्या जवळच राहू इच्छिणाऱ्या व लांबच लांब प्रवासाची दगदग टाळू पाहणाऱ्या स्थानिक तसेच स्थलांतरित लोकांसाठी इथे रोजगाराच्या आणि राहत्या घरांच्या कितीतरी संधी उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर इथे युनेस्कोद्वारे जागतिक वारशाचे ठिकाण म्हणून जाहीर करण्यात आलेल्या अंबरनाथ शिव मंदिरासारख्या अनोख्या जागा, डोंगरदऱ्यांतील भटकंतीसाठीची अनेक निसर्गरम्य ठिकाणे आणि एक उत्साहपूर्ण सामाजिक जीवन जगण्याच्या संधी आहेत.
अंबरनाथ हे त्या काही दुर्मिळ औद्योगिक केंद्रांपैकी एक आहे, ज्याच्याकडे प्रत्येकासाठी देण्यासारखे काही ना काही आहे. स्टार्टअप्सपासून ते छोट्या व मध्यम उद्योगांपर्यंत ते उद्योगसमूहांपर्यंत आपला व्यवसाय विस्तारू पाहणाऱ्या सर्वांसाठी अंबरनाथ हे एक आदर्श ठिकाण आहे.

Related posts

यामाहा आणत आहे २०२३ मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटो जीपी एडिशन लाइन-अप.

Shivani Shetty

शार्क टँक: फ्लेक्‍झीफायमीने १ कोटी रूपयांची गुंतवणूक संपादित केली

Shivani Shetty

डिजिटल पर्यवेक्षण आणि बीएफएसआयमधील सायबर सुरक्षितता

Shivani Shetty

Leave a Comment