maharashtraprimenews
ठळक बातम्या
क्रीडासार्वजनिक स्वारस्य

भारतीय रेसिंग लीगसाठी नवा राजमार्ग तयार करण्यासाठी एक्झॉनमोबिलची रेसिंग प्रमोशन्सबरोबर भागीदारी

१४ नोव्हेंबर २०२२, चेन्नई – देशातील मोटरस्पोर्ट्सच्या क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणण्यासाठी वुल्फ रेसिंगचे पाठबळ लाभलेल्या इंडियन रेसिंग लीगची ऑफिशियल ल्‍युब्रिकण्‍ट पार्टनर म्हणून एक्झॉनमोबिल लुब्रिकन्ट्स प्रा. लि. (Exxonmobil Lubricants Pvt. Ltd.) रेसिंग प्रमोशन्स प्रा. लि. (RPPL) सोबत भागीदारी करत आहे. इंडियन रेसिंग लीग (IRL) पॉवर्ड बाय वोल्‍फ रेसिंगचे १९ नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे सुरू होत असलेले पहिले पर्व ही सहा शहरांतील फ्रँचाइझी टीम्सचा सहभाग असलेली व माजी फॉर्म्युला वनपटू आणि ले मॅन्स ड्रायव्हर रेसिंगपटूंसह सर्व स्त्री-पुरुष ड्रायव्‍हर्सना सामावून घेणारा मंच ठरणारी एकमेव फोर व्हील रेसिंग लीग असणार आहे. राऊंड २ व राऊंड ३ नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या शेवटी व डिसेंबरमध्‍ये वीकेण्‍ड्सना मद्रास मोटर इंटरनॅशनल सर्किट (एमएमआरटी) येथे आयोजित करण्‍यात येतील, तर ग्रॅण्‍ड फिनाले पुन्‍हा हैदराबादमध्‍ये १० ते ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्‍यात येईल.
एका नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी आणि भारतात मोटरस्पोर्ट्स इकोसिस्टिम तयार करण्यासाठी IRL चे उद्दिष्ट जागतिक रेसिंग प्लॅटफॉर्मवर स्‍पोर्टसाठी दृश्यमानता निर्माण करण्याचे आहे. एक्झॉनमोबिलसोबतच्या भागीदारीमुळे भारतातील या क्षेत्राला आणखी महत्त्व प्राप्त होईल, जे आधीच F1 साठी ग्राहकांच्या पसंतीच्या पहिल्या पाच मार्केटमध्ये आहे आणि अलीकडच्या काही वर्षांत मोटरस्पोर्ट्सच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.
IRL च्‍या पहिल्‍याच पर्वामध्‍ये २४ ड्रायव्हर्स थरारक साहसी उर्मीने भारलेल्या चार फेऱ्यांच्या माध्यमातून १२ शर्यतींमध्ये भाग घेतील आणि विख्यात Aprillia 1100 cc 220 HP इंजिन्सच्या मदतीने स्पर्धेतील सर्वोच्च स्थानावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील. या स्पर्धेसाठी हैदराबाद येथे उभारण्यात आलेले भारताचे पहिले FIA ग्रेडप्राप्त स्ट्रीट सर्किटही वापरले जाणार आहे. पहिल्‍यांदाच भारतात स्ट्रीट रेसिंगचे आयोजन करण्‍यात येणार आहे, ज्‍यासाठी व्‍यापक सुरक्षा व सुरक्षितता व्‍यवस्‍था केल्‍या जात आहेत. सिटी सेंटरच्या जवळ असलेला हा ट्रॅक लीगसाठी मोठी गर्दी खेचणारे ठिकाण म्हणून नावारुपाला येईल.
एक्झॉनमोबिल ल्युब्रिकन्ट्स प्रा. लि. चे सीईओ विपिन राणा म्हणाले, “इंडियन रेसिंग लीग- वुल्फ रेसिंगला पाठबळ देण्यासाठी आम्ही RRPL शी भागीदारी करण्यामागे भारतामध्ये मोटरस्पोर्ट्सला पाठिंबा देण्याचे उद्दीष्ट आहे. भारत हे एक असे ठिकाण आहे, जिथे रेसिंगच्या चाहत्यांचा एक समुदाय एक नवे शक्तीशाली सर्किट उभारत आहे. देशातील या उदयोन्मुख खेळाला पाठिंबा देणे आणि त्यासाठी जागतिक दर्जाची प्रतिष्ठा व पोहोच असलेला एक उल्लेखनीय मंच तयार करणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्हाला ठामपणे वाटते. मोटरस्पोर्ट्स हा खेळ देशभरात वेगाने लोकप्रिय होत असल्याचे आम्हाला दिसत आहे. या पार्श्वभूमीवर या खेळात सहभागी संघांना एक विश्वसनीय साथीदार म्हणून आपला मदतीचा हात देण्याची आणि मोटरस्पोर्ट्सच्या क्षेत्रासाठी भारताकडून जगाला एका खऱ्याखुऱ्या नव्या मंचाची भेट देण्याच्या कामी आपले योगदान देण्याची आमची इच्छा आहे.”
MEIL चे डिरेक्टर आणि RPPLचे चेअरमन अखिलेख रेड्डी म्हणाले, “इंडियन रेसिंग लीग (IRL)ची दिमाखदार सुरुवात करण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि भारतामध्ये खेळविल्या जाणाऱ्या या आगळ्यावेगळ्या लीगमध्ये एक्झॉनमोबिल आमची सहयोगी असणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे. IRL च्या माध्यमातून आम्हाला मोटरस्पोर्ट्सच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणायची आहे आणि भारताला पुन्हा एकदा मोटरस्पोर्ट्सच्या नकाशावर आणायचे आहे, जेणेकरून उदयोन्मुख भारतीय रेसिंग ड्रायव्हर्सना संधी मिळावी. येत्या ५-७ वर्षांमध्ये संपूर्णपणे भारतीय स्पर्धकांचा समावेश असलेला संघ FI स्पर्धेत उतरविण्याचे आणि येत्या १०-१२ वर्षांमध्ये संपूर्णपणे भारतीय महिला स्पर्धकांचा संघ F2 स्पर्धेत उतरविण्याचे आमचे ध्येय आहे. या प्रयत्नांत आमचा सहकारी बनल्याबद्दल व भारतातील मोटरस्पोर्ट्सच्या क्षेत्रासाठीची पुढील नवी भव्यदिव्य गोष्ट उभारण्याच्या प्रयत्नांचा भाग बनल्याबद्दल आम्ही एक्झॉनमोबिलचे आभारी आहोत.”
मोटरस्पोर्ट क्षेत्रामधील १९७८ पासूनचा इतिहास लाभलेल्या एक्‍झॉनमोबिलचा फॉर्म्युला वन चॅम्पियनशिपसह जागतिक स्तरावर मोटरस्पोर्ट्सना पाठिंबा देण्याचा संपन्‍न वारसा आहे. एक्‍झॉनमोबिल सध्या वर्ल्ड चॅम्पियन – ओरॅकल रेड बुल रेसिंग टीमला Mobil 1™️ इंजिन ऑइलचा पुरवठा करते आणि संपूर्ण शर्यतीच्या हंगामात जागतिक दर्जाचे अभियांत्रिकी समर्थन देते.
इंडियन रेसिंग लीगच्या माध्यमातून शुभारंभ करणारे RPPL फॉर्म्युला रीजनल इंडियन चॅम्पियनशीप आणि फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशीपचे यजमानपदही सांभाळणार आहे. फॉर्म्युला रिजनल इंडियन चॅम्पियनशीप आणि F4 इंडियन चॅम्पियनशिप्स निपुण प्रशासकीय संस्‍था FIA द्वारे प्रमाणित आहे व चॅम्पियनशीप जिंकणाऱ्यांना बक्षिसादाखल FIA सुपर लायसन्स पॉइंट्स दिले जाणार आहेत.

Related posts

‘इंडेक्सटॅप प्रीमियर लीग चार्ट’ मध्ये रेमंड रियल्टीने मिळवले पहिले स्थान

Shivani Shetty

जिओ स्टुडिओजच्या “द स्टोरीटेलर” चित्रपटाचा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI)भव्य प्रीमियर

Shivani Shetty

जीआयएम-अपग्रॅड’ चा हेल्थ केयर मॅनेजमेंट ऑनलाईन अभ्यासक्रम

Shivani Shetty

Leave a Comment