maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

वझीरएक्स आणि टॅक्सनोड्सच्या भागीदारीचा विस्तार

मुंबई, ९ जून २०२४: भारतातील अग्रगण्य क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज प्लॅटफॉर्म असलेल्या वझीरएक्स ने, एक वर्षाच्या यशस्वी सहकार्यानंतर क्रिप्टो टॅक्स फायलिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टॅक्सनोड्स सह भागीदारीचे नूतनीकरण केले आहे. कर दायित्वे पूर्ण करण्याचे अचूक आणि त्रास-मुक्त मार्ग उपलब्ध करण्यात टॅक्सनोड्स निपुण आहेत व या भागीदारीमुळे त्यांच्या वापरकर्त्यांचे कर भरणा अनुभव सोपे करण्याच्या वझीरएक्सच्या वचनबध्दतेस बळकटी मिळाली आहे. गेल्या वर्षात त्यांच्या भागीदारीच्या या संपूर्ण कालवधीत अनेक लक्षणीय़ उद्दिष्टे साध्य झाली आहेत जी या सहकार्याच्या सखोल प्रभावाची द्योतक आहेत.

हे सहकार्य १००० पेक्षा अधिक भारतीय शहरांना समाविष्ट करण्यापर्यंत विस्तारले आहे ज्यामुळे कराशी संबंधित जबाबदार्‍या सांभाळण्यासाठी समान सुविधांची सुनिश्चिती होते. या संयुक्त सेवा उपक्रमाचा सर्वात अधिक वापर करणार्‍याची संख्या असणारी शहरे मुंबई, पटना, लखनौ, इंदूर, जयपूर, हैद्राबाद आणि अहमदाबाद आहेत.

ग्राहकांसाठी निर्माण केलेल्या सुलभ इंटरफेसच्या माध्यमातून क्रिप्टो कर गणना आणि प्राप्तीकर परतावा फाइल करण्याच्या कामात सरासरी ७-८ तासांची लक्षणीय बचत झाली असे याचा वापर करणारे सांगतात. वापरकर्ते त्यांचे व्यवहार तपशील विनायास अपलोड आणि त्यांचे शेड्युल्ड व्हीडीएकराचे रिपोर्ट्स ३० मिनिटांपेक्षा कमी वेळात प्राप्त करू शकले.

वझीरएक्स व टॅक्सनोड्स यांनी माहितीपर सत्रांची मालिका चालवली आणि संदर्भ मिळवणे सुलभ करण्यासाठी अनुबोधपर ब्लॉग्स प्रकाशित करणे चालू ठेवले. यामुळे सहभागींना क्रिप्टो कर निर्धारणातील बारकावे जाणून घेण्यात मदत झाली.

वझीरएक्सचे उपाध्यक्ष राजगोपाल मेनन यांनी सांगितले की, “टॅक्सनोड्स बरोबरील आमची भागीदारी म्हणजे भारतीय वापरकर्त्यासाठी क्रिप्टो निर्विघ्न बनवण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे. कर परतावा फाईल करताना: वझीरएक्सचे वापरकर्त्यांना सर्वात उत्तम साधने देणे ही या मागील कल्पना आहे.”

टॅक्सनोड्सचे संस्थापक अविनाश शेखर यांनी सांगितले, “लागोपाठ दुसर्‍या वर्षात वझीरएक्स बरोबर आमची यशस्वी भागीदारी विस्तारित करण्यात आम्हाला आनंद होत आहे. भारतीय क्रिप्टो वापरकर्त्यांसाठी गेल्या वर्षातील सहयोग महत्त्वाचा ठरला आणि यामुळे कर फाईल करण्याचा अनुभव खूप सोपा झाला. या वर्षी, वर्तमान कर निर्धारण वर्षासाठी त्यांच्या क्रिप्टो करांच्या संदर्भात वझीरएक्स च्या वापरकर्त्यांना आणखी समावेशक मदत देण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या हेतूने, त्या यशास आणखी उन्नत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे कार्यक्षम आणि कायद्याला अनुसरून असणारे कर फायलिंग करण्यासाठी आवश्यक साधने आणि नैपुण्य यांच्या आधारे भारतीय क्रिप्टो समुदायास सबल करण्यासाठी टॅक्सनोड्स निरंतर कटीबध्द आहे.”

Related posts

टाटा मोटर्सकडून चंदिगडमध्‍ये अत्‍याधुनिक रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन

Shivani Shetty

एल्‍गीचा मियामी, फ्लोरिडामधील एअरलॅब फिटनेसच्‍या सिम्‍युलेटेड हाय-अॅल्टिट्यूड फिटनेस प्रशिक्षण सुविधेला पाठिंबा

Shivani Shetty

इंडियास्किल स्पर्धा नोंदणीची तारीख १५ जानेवारीपर्यंतवाढवली

Shivani Shetty

Leave a Comment