maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

गिरनार एलिव्हेट समिट २०२४चे आयोजन

मुंबई, १० जून २०२४: गिरनार एलिव्हेट समिट २०२३च्या दणदणीत यशानंतर कारदेखो समूहाने या परिषदेचे दुसरे पर्व गिरनार एलिव्हेट समिट २०२४ आयोजित केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात कंपनीचे मुख्यालय असलेल्या जयपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसांच्या परिषदेचे उद्दिष्ट अमित जैन यांनी शार्क टँक इंडिया व अन्य माध्यमांतून गुंतवणूक केलेल्या ३०हून अधिक कंपन्यांचे सक्षमीकरण हे होते. या परिषदेत विविध क्षेत्रांतील सत्रे घेण्यात आली. भारत २.० उभारण्याच्या दृष्टीने कंपनी संस्थापकांशी व्यक्तीश: जोडून घेण्याबद्दल तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याबद्दल जैन यांची सखोल बांधिलकी यातून अधोरेखित होते.

गुंतवणूक केल्यानंतर कंपन्यांना वाढ व यश साध्य करण्यासाठी आवश्यक तो आराखडा आखण्यामध्ये मार्गदर्शन व मेंटॉरशिप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. गिरनार एलिव्हेट समिट या कंपन्यांना त्यांचे ज्ञान अधिक सखोल करण्यासाठी तसेच यशस्वी व्यवसाय उभे करण्याची धोरण सफाईदार करण्यासाठी उत्तम व्यासपीठ पुरवते.

कारदेखो समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक अमित जैन म्हणाले, “माझे उद्दिष्ट पैशाच्या स्वरूपातील गुंतवणूकीच्या पलीकडे आहे. भारताच्या वाढत्या उद्योजक प्रतिभेची जोपासना करण्याच्या तसेच तिला मार्गदर्शन करण्याच्या बांधिलकीने मी प्रेरित आहे. त्याचप्रमाणे गाभ्याच्या स्थानी तंत्रज्ञान असलेल्या ‘नवभारताला’ संप्रेरणा देण्याप्रती वचनबद्ध आहे. संस्थापकांशी व्यक्तिगत संबंध जोडल्यामुळे त्यांची दृष्टी व आव्हाने समजून घेण्यात मदत होते असे मला वाटते. गिरनार एलिव्हेट समिटसारखे उपक्रम उद्योजकांना जाणवणारे अडथळे ओळखण्यास व त्यावर मात करण्यात संप्रेरकाची भूमिका पार पाडतात, त्यांना तज्ज्ञांकडून तसेच सहयोगींकडून शिकण्याची क्षमता देतात. त्याचप्रमाणे बाजारपेठेशी अनुकूल उत्पादने, निधीउभारणीची सुयोग्य धोरणे आणि बचावात्मक स्पर्धात्मक भंडार यांसारखी महत्त्वाची अंगे विकसित करण्यासाठी आवश्यक उपाय अधिक सफाईने करण्यातही उद्योजकांना मदत करतात.”

ब्रॅण्ड्सना सक्षम करून भारताच्या उद्योजकता परिसंस्थेत स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या कंपन्यांमध्ये त्यांचे रूपांतर करण्यात मदत करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. परिषदेच्या पहिल्या दिवशी उद्योजकांना व्यवसाय उभे करण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी आवश्यक ते बारकावे समजून घेण्याची संधी देणारी वैविध्यपूर्ण सत्रे घेण्यात आली. कारदेखो समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक अमित जैन यांच्या व्यवसायांचा आवाका वाढवण्याविषयीच्या माहितीपूर्ण सत्राने परिषदेची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी कायदा, वित्तपुरवठा, नियमांचे पालन व एचआर (मनुष्यबळ विकास) या विषयांवरील सत्रे घेण्यात आली.

Related posts

तृप्ति डिमरी इस सप्ताह IMDb की लोकप्रिय भारतीय हस्तियों की सूची में लगातार चौथी बार शीर्ष पर हैं

Shivani Shetty

द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल

Shivani Shetty

लेवरेज एड्युद्वारे १५०,००० डॉलर्सची स्‍कॉलरशिप्‍स

Shivani Shetty

Leave a Comment