maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा एचएनआयसाठी सबस्क्रिप्‍शन प्रोग्राम

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३: पर्यटन क्षेत्रात अग्रस्‍थानी राहत इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात विश्‍वसनीय व प्रतिष्ठित ट्रॅव्‍हल व्‍यासपीठाने विशेष सबस्क्रिप्‍शन प्रोग्राम लाँच केला आहे, जो प्रवासामधील लक्‍झरी व सोयीसुविधेला नव्‍या उंचीवर नेतो. इझमायट्रिप प्‍लॅटिनम, गोल्‍ड व सिल्‍व्‍हर कार्डसच्‍या सादरीकरणासह इझमायट्रिप सबस्क्रिप्‍शन प्रोग्राम हाय नेट वर्थ इंडिव्हिज्‍युअल्‍स (एचएनआय) आणि सीईओंना पर्यटनाच्‍या नवीन विश्‍वाला एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍यास आमंत्रित करतो, ज्‍यामध्‍ये विशेष सेवा, फायदे व विशेषाधिकार आहेत.

इझमायट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक श्री. निशांत पिट्टी म्‍हणाले, “आम्‍हाला माहित आहे की, आमच्‍या ब्रॅडचे समर्पित फॉलोअर्स आहेत आणि लोकांचे पाठबळ असलेली कंपनी म्‍हणून आम्‍ही निष्‍ठावान ग्राहकांना प्रवास करताना सर्वोत्तम सोयीसुविधा देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. प्‍लॅटिनम, गोल्‍ड व सिल्‍व्‍हर कार्डसचा समावेश असलेल्‍या आमच्‍या सबस्क्रिप्‍शन प्रोग्रामच्‍या लाँचसह आम्‍हाला त्‍यांचा प्रवास अनुभव वाढवण्‍यासाठी डिझाइन केलेले अनेक फायदे व प्‍लान्‍स प्रदान करण्‍याचा आनंद होत आहे. त्‍यांना मोठ्या प्रमाणात बचत, विशेषाधिकार व समर्पित सपोर्ट मिळेल, ज्‍यामुळे त्‍यांचा प्रवास उत्‍साहित होईल. आम्‍ही सेवा सादर करत आहोत, ज्‍या ग्राहकांना इच्छित सर्वोत्तम अनुभव देतील.”

सर्वोत्तम सुविधांची मागणी करणाऱ्यांसाठी इझमायट्रिप प्‍लॅटिनम कार्ड लक्‍झरी व सर्वोत्तम प्रवासाचा अनुभव देते. ४० लाख रूपयांच्‍या किमान डिपॉझिट आवश्‍यकतेसह हे प्रतिष्ठित कार्ड अद्वितीय फायदे देते, ज्‍यामुळे प्रत्‍येक प्रवास सर्वोत्तम बनतो. प्‍लॅटिनम कार्डची खासियत म्‍हणजे प्‍लॅटिनम कोड, जो प्रत्‍येक बुकिंगसाठी इझमायट्रिपकडून जारी केला जातो. हा कोड अनेक फायदे अनलॉक करण्‍यासाठी महत्त्वाचा आहे, ज्‍यामध्‍ये प्रवास खर्चामध्‍ये मोठ्या प्रमाणात बचत करण्‍यासाठी प्रत्‍येक बुकिंगसह एकसंधी कॅशबॅक रिवॉर्डसचा समावेश आहे.

इझमायट्रिप गोल्‍ड कार्ड जीवनातील बारीक-सारीक क्षणांना महत्त्व देणाऱ्या पर्यटकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे कार्ड २० लाख रूपयांच्‍या किमान डिपॉझिट आवश्‍यकतेसह प्रवासाच्‍या नवीन विश्‍वासाठी गेटवे म्‍हणून सेवा देते. प्रत्‍येक बुकिंगसाठी जारी करण्‍यात येणाऱ्या विशेष गोल्‍ड कोडसह प्रवास अनुभव सुलभ व सुधारित होतो. तुम्‍ही प्रत्‍येक बुकिंगसह उत्‍साहवर्धक कॅशबॅक रिवॉर्डसचा लाभ घेऊ शकता, तसेच प्रवासाचा अधिकाधिक आनंद घेऊ शकता.

इझमायट्रिप सिल्‍व्‍हर कार्ड प्रिमिअम प्रवास अनुभव देतो. १० लाख रूपयांच्‍या किमान डिपॉझिट आवश्‍यकतेसह हे कार्ड अनेक प्रवास फायदे व विशेषाधिकार देते. प्रत्‍येक सिल्‍व्‍हर कार्डधारकाला प्रत्‍येक बुकिंगसाठी विशेष सिल्‍व्‍हर कोड मिळतो, जो प्रवास अनुभव सोईस्‍कर करतो. इन्‍स्‍टंट कॅशबॅक रिवॉर्डससह बचत करा, ज्‍यामुळे प्रत्‍येक ट्रिप किफायतशीर बनते.

Related posts

टाटा मोटर्स आणि महेश कार्गो मूव्‍हर्स प्रत्‍येक मैलामध्‍ये देत आहेत सर्वोत्तम सेवा

Shivani Shetty

व्हिएटजेटने २०२३ मध्ये गाठले लक्षणीय टप्पे: विक्रमी वाढ, आर्थिक यश आणि जागतिक स्तरावर मान्यता

Shivani Shetty

जलसकारात्मकतेच्या (Water Positivity) बळावर नाशिकच्या एबीबी (ABB) फॅक्टरीने गाठली शाश्वत उत्पादनाची नवीन पातळी

Shivani Shetty

Leave a Comment