maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतीय पर्यटक आता व्हिएतजेटच्‍या एक्‍सक्‍लुसिव्‍ह प्रमोशन ऑफर्ससह व्हिएतनाममधील अद्भुत पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात

(मुंबई, ६ डिसेंबर २०२३) व्हिएतजेट या व्हिएतनाममधील आघाडीच्‍या आधुनिक विमानवाहतूक कंपनीला आगामी प्रमोशनल सेलची घोषणा करताना आनंद होत आहे. या सेलअंतर्गत भारतापासून व्हिएतनामपर्यंत अद्वितीय डील्‍सचा समावेश आहे. या मर्यादित कालावधीच्‍या ऑफरसह पर्यटक फक्‍त ५,५५५* रूपयांमध्‍ये एकमार्गी तिकिट खरेदी करू शकतात. 

हे प्रमन ६ डिसेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत असणार आहे, या सवलतीच्‍या तिकिटांसाठी प्रवास कालावधी ५ जानेवारीवरून ३१ ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत वाढवण्‍यात येईल. तसेच, आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्सची बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना वेबसाइट https://www.vietjetair.com/en ला किंवा मोबाइल अॅपला भेट देत १७१४ रूपये किंमतीचे (जवळपास ५००,००० व्‍हीएनडी) ई-वाऊचर देखील मिळेल. 

एअरलाइन एकूण ३५ साप्‍ताहिक राऊंड-ट्रिप फ्लाइट्स ऑपरेट करते, ज्‍यामधून प्रमुख भारतीय शहरे – नवी दिल्‍ली, मुंबई, अहमदाबाद, कोची व तिरूचीरापल्‍ली येथून व्हिएतनामधील शहरे – हनोई व हो ची मिन्‍ह सिटी यांना जोडणाऱ्या फ्लाइट्सच्‍या सर्वात मोठ्या नेटवर्कची सुविधा दिली जाते.  

व्हिएतनाम दशकापासून कार्यरत असण्‍यासह व्हिएतनामपासून आशिया व ऑस्‍ट्रेलियासह इतर देशांना जोडणाऱ्या १२५ मार्गांवर दररोज जवळपास ४५० फ्लाइट्सची सुविधा देते. एअरलाइनच्‍या आंतरराष्‍ट्रीय नेटवर्कमध्‍ये भारत, ऑस्‍ट्रेलिया, ईशान्‍य आशिया (जपान, दक्षिण कोरिया, तैवान, हॉंगकॉंग व मेनलॅण्‍ड चीन), आग्नेय आशिया आणि कझाकस्तान येथील गंतव्‍यांचा समावेश आहे. 

(*) अटी व नियम लागू.        

 

Related posts

तरूण सुशिक्षित असण्यासह रोजगारक्षम असणे महत्त्वाचे: डॉ. रघुनाथ माशेलकर

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून १०० स्‍टारबस ईव्‍हींसह बेंगळुरूमधील शहरी प्रवासाचे इलेक्ट्रिफिकेशन

Shivani Shetty

क्विक हीलने यूएस एआयएसआयसीचे सदस्यत्व मिळवले

Shivani Shetty

Leave a Comment