maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

मधुमेह असताना आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना

मधुमेह आणि कार्डिओव्हॅस्क्युलर आजार यांचा खूप जवळचा संबंध आहे हे तुम्हाला माहीत आहे का?आरोग्यामध्‍ये हृदय आणि मधुमेह यांच्यामधील नाते अत्यंत महत्त्‍वाचे आहे. एकमेकींवर प्रभाव टाकणाऱ्या यादोन्ही स्थिती अत्यंत गुंतागूंतीच्या बंधांनी एकमेकांशी जोडलेल्या आहेत व त्याचा परिणाम लक्षावधी लोकांवरहोत आहे.

मधुमेहाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी ग्लुकोजच्या पातळीवर नियमितपणे देखरेख ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचेअसते. कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) उपकरणांसारख्या साधनांचा वापर करून हे साध्य होऊशकते. यात ग्लुकोजची पातळी जाणून घेण्यासाठी बोटाला सुई टोचण्याची गरज नसते. अशा उपकरणांमध्येटाइम इन रेंज (TIR) सारखी उपयुक्त आकडेवारी नोंदवली जाते, ज्यात दिवसभरामध्ये एखाद्या व्यक्तीचीग्लुकोज पातळी किती काळासाठी विशिष्ट पट्टयामध्ये राहते हे सूचित केले जाते. जेव्हा एखादी व्यक्तीअधिकाधिक वेळ या टाइम इन रेंजमध्ये राहते तेव्हा कार्डिओव्हॅस्क्युलर आजाराची लक्षणे विकसित होण्याचीशक्यता कमी होते. खरेतर TIR मध्ये १० टक्‍के वाढ झाली तरीही त्या व्यक्तीच्या कॅरोटिड आर्टरीजच्याअनैसर्गिक पद्धतीने जाड होण्याचा धोका ६.४ टक्क्यांनी कमी होतो. आणि म्हणूनच, कार्डिओव्हॅस्क्युलरआजारांना दूर ठेवायचे तर अधिक चांगली TIR मिळविण्याचे लक्ष्य समोर ठेवायला हवे.

मुंबईच्या ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमधील कन्सल्टन्ट कार्डिअॅक सर्जन डॉ. पार्थ सारथी म्हणाले, “भारतामध्येमधुमेहासह जगणारे, अनेक लोक हृदयाशी संबंधित गुंतागूंतींची तक्रार नोंदवित आहेत. या गुंतागूंतीचे वाढतेप्रमाण तुलनेने तरुण लोकसंख्यागटामध्येही आढळून येत आहे ही तर अत्यंत चिंताजनक बाब आहे.मधुमेहाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे उच्च रक्तदाब, बॅड कोलेस्ट्रोल आणि ट्रायग्लिसराइड्सची वाढलेलीपातळी यांसारख्या कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका वाढविणाऱ्या घटकांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.म्हणूनच लोकांनी ग्लुकोजच्या पातळीतील मोठे चढउतार टाळण्यासाठी अतिरिक्त काळजी घेणे आणित्यासाठी सखोल उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हृदयासाठी उपकारक आहारपद्धतीचा स्वीकार,व्यायामातील सातत्य आणि ग्लुकोजवर देखरेख ठेवणाऱ्या CGM सारख्या उपकरणांचा नियमित वापर असेकाही मोजके उपाय यासाठी करता येतील.”

मधुमेहासह जगणाऱ्या व्यक्तींना आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी पुढील पाच सोपे उपाय करतायेतील:

  1. रक्तातील साखरेच्या पातळीवर नियमितपणे देखरेख: FreeStyle Libre सारख्या CGM साधनांच्यामाध्यमातून रक्तातील साखरेच्या पातळीचा हरक्षणी माग ठेवल्यास तुम्ही या पातळीत होणाऱ्याकोणत्याही चढउतारांवर लक्ष ठेवू शकता. दिवसातून किमान १७ तासांसाठी ग्लुकोजची इष्टतम पातळी(७० – १८० mg/dl)  जपली जावी यासाठी धडपड करणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने तुम्ही तुमचामधुमेह आणि हृदयविकाराचा धोका प्रभावीपणे नियंत्रणात ठेवू शकता.

  1. हृदयासाठी उपकारक आहार: कोलेस्ट्रोलची पातळी वाढविणारे सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स टाळा.उदाहरणार्थ, बटर, रेड मीट आणि संपूर्ण स्निग्धांश असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्ससर्रास आढळून येतात तर ट्रान्स फॅट्स हे साधारणपणे तळलेल्या किंवा प्रकियायुक्त पदार्थांमध्येवापरल्या जाणाऱ्या अंशत: हायड्रोजनीकरण केलेल्या तेलांमध्ये असतात. स्वत:ला साजेशी अशी एकआरोग्यपूर्ण आहारयोजना तयार केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. निव्वळ प्रथिनं, अखंडधान्ये, रंगीत भाज्या आणि नट्स आणि बियांतून मिळणारे हेल्थी फॅट्स यांचा समावेश असलेलेआहारनियोजन तुम्ही करू शकता.

  1. नियमित व्यायाम: हृदयरोगाचा धोका कमी करायचा तर व्यायामाच्या माध्यमातून लठ्ठपणा, उच्चरक्तदाब आणि कोलेस्ट्रोलची उच्च पातळी यांसारख्या बाबींवर उपाय करणे योग्य ठरेल. नियमितशारीरिक हालचालींमुळे मधुमेहाचेही अधिक चांगले व्यवस्थापन होते. निरोगी जीवनशैलीसाठी बैठ्यागोष्टींसाठीचा वेळ कमी करा आणि दर आठवड्याला ब्रिस्क वॉकिंग किंवा सायकलिंग यांसारख्या मध्यमस्वरूपाच्या शारीरिक व्यायामांसाठी किमान १५० मिनिटे काढा.

 

 

  1. धूम्रपान आणि मद्यपानास नकार: धूम्रपानामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचे अस्तर खराब होऊ शकते वयाच्या परिणामी मधुमेहामुळे धमन्या अरुंद होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होऊ शकते. यामुळेहृदयविकाराचा धोका वाढतो. तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्ही धूम्रपानही करत असाल तर तुमच्याहृदयाच्या आरोग्याला असलेला धोका आणखी वाढतो. त्यामुळे धूम्रपानाचे व्यसन सोडून देणे अधिकचमहत्त्वाचे ठरते. तुम्ही अल्कोहोलचे प्रमाणही कमी केले पाहिजे कारण त्यामुळे तुमच्या मधुमेहाच्याऔषधांच्या कामगिरीमध्ये अडथळा येऊ शकतो आणि तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर याचापरिणाम होऊ शकतो. अतिरेकी मद्यपानामुळे रक्तदाबही वाढू शकतो, हृदयाचे स्नायू कमकुवत होऊशकतात आणि काही विशिष्ट हृदयविकारांचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. तुम्ही आपल्याडॉक्टरांशी सल्लामसलत करून अल्कोहोल घेण्याची मर्यादा ठरवू शकता.

 

  1. ताणतणावांचे व्यवस्थापन: तुम्ही तणावग्रस्त असता तेव्हा तुमचे शरीर स्ट्रेस हार्मोन्स निर्माण करते, जेरक्तातील साखरेच्या पातळीत वाढ करते आणि त्यातून इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होऊ शकतो.कालांतराने यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो आणि तुम्हाला हृदयविकार जडण्याच्या शक्यताहीवाढतात. मनावरील ताण हलका करण्यासाठी गाणी ऐकणे, योगा किंवा नृत्यासारख्या काही मौजेच्याकामांमध्ये स्वत:ला गुंतविण्याचा प्रयत्न करा. तसेच आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालविल्याने किंवाआपल्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या अडचणी येत आहेत याबद्दल त्यांच्याशी चर्चा केल्यानेताणतणावाची पातळी खाली येऊ शकते.

या सूचनांबरोबर मधुमेही व्यक्तींनी हायपरग्लायसेमिया किंवा हायपोग्लायसेपियाकडे काही चिंताजनक कलदिसत आहे का याविषयीही दक्ष राहिले पाहिजे. आपल्या मधुमेहाच्या व्यवस्थापनात सुधारणा घडवूनआणण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी करता येणाऱ्या इतर उपाययोजनांविषयीही तुम्हीआपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत केली पाहिजे. निरोगी जीवनशैलीसाठी पूरक असे पर्याय निवडून तुम्हीचांगल्या आरोग्याचा लाभ घऊ शकता आणि एक अधिक उच्च दर्जाचे आयुष्य जगू शकता.

Related posts

प्रख्यात गायक अमेय डबली यांनी भारताच्या संरक्षण दलांबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण करण्यासाठी “वर्दी के वीर’ पहिला बॉलीवूड म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट जाहीर

Shivani Shetty

किटकॅटकडून तीन संपन्‍न व स्‍वादिष्‍ट व्‍हेरिएण्‍ट्ससह नवीन प्रिमिअम श्रेणी लाँच

Shivani Shetty

एल्‍गी (ELGi) कडून भारतात कम्‍प्रेस्‍ड एअर सिस्‍टम्‍ससाठी स्‍मार्ट मॉनिटरिंग व अलर्ट सिस्‍टम ‘Air~Alert’ सादर

Shivani Shetty

Leave a Comment