मुंबई, १ ऑक्टोबर २०२३: फ्लेक्सिफायमी या गंभीर वेदनेचे व्यवस्थापन करण्याप्रती समर्पित असलेल्या अग्रणी हेल्थ-टेक व्यासपीठाने आपल्या सीड फंडिंग राऊंडमध्ये १ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे, ज्यामध्ये फ्लिपकार्टची उद्यम गुंतवणूक शाखा फ्लिपकार्ट व्हेंचर्सचा गुंतवणूकीचा मोठा वाटा आहे. या फंडिंग राऊंडचा कंपनीला झपाट्याने विकास करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.
फ्लेक्सिफायमीने गेल्या १२ महिन्यांमध्ये जवळपास पाच पट विकास केला आहे. गुंतवणूकीमध्ये फ्लिपकार्ट व्हेंचर्स अग्रस्थानी असण्यासोबत इतर प्रख्यात सहभागींनी देखील गुंतवणूक केली जसे जीएसएफ, आयहब अनुभूती, चंदिगड एंजल्स (सीएएन), व्हेंचर कॅटोलिस्ट, वन कॅपिटल व इतर प्रमुख एंजल्स. या राऊंडमधून उभारण्यात आलेल्या निधींचा एआय मोशन कोचमध्ये अधिक सुधारण्यासाठी वापर करण्यात येईल, जे स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि एमईएनए व उत्तर अमेरिका प्रदेशांमधील व्यासपीठाच्या पोहोचमध्ये वाढ होईल. सीड फंड गुंतवणूकांव्यतिरिक्त फ्लेक्सिफायमीचे विद्यमान समर्थक आहेत ब्राइटचॅम्प्सचे संस्थापक रवी भूषण आणि ब्लिन्कइन्व्हेस्टचे संस्थापक अमित रतनपाल, तसेच इतर विविध समर्थक आहेत.
फ्लेक्सिफायमीचे सह-संस्थापक मनजीत सिंग म्हणाले, “आम्हाला या फंडिंग राऊंडमध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा आनंद होत आहे, ज्यामुळे व्यक्तींना वेदनामुक्त जीवन जगण्यास मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याप्रती आमचा विश्वास वाढला आहे. २०१६ मध्ये लंबर स्पॉन्डिलायटीससह निदान झाल्यानंतर मी स्वत: वेदनांचा त्रास सहन केला आहे. विविध फिजियोथेरपीस्ट्सकडून अप्रमाणित उपचार घेतल्यामुळे माझी स्थिती अधिक खालावली आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मी ३६० फ्लेक्स उपचारपद्धतीचा वापर करत स्वत:हून नैसर्गिकरित्या बरा झालो आणि आम्ही आता गंभीर वेदनेचे व्यवस्थापन परिणामाभिमुख आणि अधिक वैज्ञानिक बनवण्याच्या मोहिमेवर आहोत. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत गंभीर वेदनेपासून पीडित लाखो व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याप्रती कटिबद्ध आहोत आणि हा निधी आम्हाला हे ध्येय संपादित करण्याच्या अधिक जवळ घेऊन जातो.”
उद्योजक मनजीत सिंग व अमित भयानी यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये स्थापना केलेली फ्लेक्सिफायमी आपल्या नाविन्यपूर्ण एआय मोशन-ट्रॅकिंग तंत्रज्ञानासह पारंपारिक फिजियोथेरपी उपचारपद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या मिशनवर आहे. फ्लेक्सिफायमी तंत्रज्ञान व प्राचीन ज्ञानाचा उपयोग करून जगभरातील व्यक्तींना मस्क्यूकोस्केलेटल डिसऑर्डर (एमएसके) जसे पाठदुखी, स्पॉन्डिलायटिस, संधिवात, गुडघेदुखी यांचा त्रास दूर करण्यास मदत करते.