(मुंबई, एप्रिल ३, २०२४) – व्हिएतजेट एव्हिशन जॉइण्ट स्टॉक कंपनीने (HOSE: VJC) २०२३ साठी त्यांची लेखापरीक्षित केलेले आर्थिक विवरणपत्रे जारी केली आहेत, ज्यामधून वर्षभरात केलेली प्रबळ वाढ दिसून येते.
लेखापरीक्षित स्वतंत्र विमान वाहतूक महसूल आणि एकत्रित महसूल अनुक्रमे ५३.७ ट्रिलियन व्हीएनडी (जवळपास २.१६ बिलियन अमेरिकन डॉलर्स) आणि ५८.३ ट्रिलियन व्हीएनडी (जवळपास २.३५ बिलियन अमेरिकन डॉलर्स) होता, ज्यामध्ये दिलेल्या ऑर्डरनुसार अनुक्रमे वार्षिक ६२ टक्के व ४५ टक्क्यांची वाढ झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे कंपनीने कर-पूर्व विमान वाहतूक नफास आणि एकत्रित नफा अनुक्रमे ४७१ बिलियन व्हीएनडी (जवळपस १८.९८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आणि ६०६ बिलियन व्हीएनडी (जवळपास २४.४२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) इतका नोंदवला.
पूरक आणि मालवाहतूक महसूल जवळपास २१ ट्रिलियन व्हीएनडी (जवळपास ८४६.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) होते, जे संकलित आर्थिक विवरणपत्रांच्या तुलनेत उच्च होते आणि त्यामध्ये वार्षिक ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. एकूण विमान वाहतूक महसूलामध्ये या महसूलाचा वाटा ३९ टक्के होता. ३१ डिसेंबर, २०२३ रोजीच्या आकडेवारीनुसारव्हिएटजेटची एकूण मालमत्ता जवळपास ८६.९ ट्रिलियन व्हीएनडी (जवळपास ३.५ बिलियन अमेरिकन डॉलर्स) होती. कंपनीचे डेट–टू–इक्विटी गुणोत्तर २ होते, जे ३ ते ५ या सामान्य जागतिक श्रेणीहून कमी आहे. व्हिएटजेटचे रोखता गुणोत्तर १.३ होते. विमानवाहतूक उद्योगाच्या दृष्टीने ते चांगल्या स्थितीत होते. ३१ डिसेंबर २०२३ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, रोख व तत्सम स्वरूपातील जमा रक्कम जवळपास ५.०५१ ट्रिलियन व्हीएनडी (जवळपास २०३.६२ दशलक्ष अमेरिकन डॉलस्र) होती, ज्यामुळे एअरलाइनची आर्थिक क्षमता भक्कम असल्याची खात्री मिळते.
अर्थ मंत्रालयाच्या निकषांनुसार एअरलाइनला सर्वोत्तम क्रेडिट रेटिंग्ज मिळाले आहेत. एअरलाइनला व्हिएतनामी कॉर्पोरेशन्समध्ये सर्वोच्च क्रेडिट रेटिंग (VnBBB-) मिळाले आहे. २०२३ मध्ये व्हिएतजेटने जवळपास ५.२ ट्रिलियन व्हीएनडी (जवळपस २०९.६३ दलशक्ष अमेरिकन डॉलर्स) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर आणि शुल्क भरले.
आंतरराष्ट्रीय विस्तारीकरणामध्ये अग्रस्थानी
देशांतर्गत नेटवर्क कायम राखण्यासह विकसित करण्याचा प्रयत्न करत, तसेच आंतरराष्ट्रीय मार्गांमध्ये विस्तार करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करत व्हिएतजेटने २०२३ मध्ये १३३,००० विमानसेवा चालवल्या आणि २५.३ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली, ज्यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत वार्षिक १८३ टक्क्यांची वाढ झाली. यापैकी ७.६ दशलक्षांहून अधिक प्रवाशांनीआंतरराष्ट्रीय विमानसेवेमधून प्रवास केला. व्हिएटजेटने ३३ नवीन आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत मार्गांवर विमानसेवा सुरू केली आणि आपल्या एकूण मार्गांची संख्या १२५ वर नेली. यामध्ये ८० आंतरराष्ट्रीय तर ४५ देशांतर्गत मार्गांचा समावेश आहे. यापैकी काही मार्ग आहेत हो चि मिन्ह सिटी– शांघाय, हो चि मिन्ह सिटी– व्हिएटिआने, हनोई–सिएम रीप, हनोई– हाँगकाँग, फु कोक– ताईपेई, फु कोक– आणि हो चि मिन्ह सिटी/हनोई – जाकार्ता इत्यादी.
व्हिएतजेट आता व्हिएतनामला भारत व ऑस्ट्रेलियाशी कनेक्ट करणाऱ्या विमानसेवांची सर्वात मोठी ऑपरेटर आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार व पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होत आहे. २०२४ च्या सुरूवातीपासून एअरलाइनने हनोई व सिडनीमधील प्रत्यक्ष विमानमार्ग सुरू केला आहे,ज्यामुळे व्हिएतनाम ते ऑस्ट्रेलिया या मार्गावर एकूण सात फ्लाइट्स कार्यरत आहेत. कंपनीने भारतासाठी देखील आपल्या नेटवर्कमध्ये वाढ केली आहे, जेथे सध्या दर आठवड्याला मुंबई, नवी दिल्ली, अहमदाबाद आणि कोची या ४ प्रमुख शहरांमधून २८ राऊंड-ट्रिप फ्लाइट्स कार्यरत आहेत. तसेच एअरलाइनने हनोई ते हिरोशिमा (जपान) आणि हो चि मिन्ह सिटी ते शेंगदू (चीन) पर्यंत विमानसेवा सुरू केली आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील पर्यटन व व्यापार संबंध दृढ झाले आहेत. देशांतर्गत व्हिएतजेटने नवीन मार्ग हनोई ते डियन बियन सुरू केला आहे, ज्यामुळे प्रवाशांना डियन बियन फू च्या ऐतिहासिक स्थळाचा आनंद घेता येत आहे.
एअरलाइनचा सरासरी लोड फॅक्टर रेट ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आणि टेक्निकल रिलियॅबिलिटी रेट ९९.७२ टक्क्यांपर्यंत पोहोचला.
सुरक्षित, आधुनिक, पर्यावरणास अनुकूल ताफ्याचा विकास
एअरलाइनचे दीर्घकालीन धोरणात्मक ध्येय म्हणून कायम राहणारे सस्टेनेबल डेव्हलपमेंट (ईएसजी) एअरलाइनच्या यशासाठी महत्त्वाचे आहे, जेथे हे ध्येय एअरक्राफ्टच्या नवीन व आधुनिक ताफ्यासह संसाधने सानुकूल करण्यास, इंधन बचत करण्यास आणि कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. कार्यरत मागण्यांची पूर्तता करण्यासाठी व्हिएतजेटने आधुनिक, सुरक्षित व पर्यावरणास अनुकूल ताफ्यामध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवले आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत व्हिएतजेटच्या ताफ्यामध्ये ए३३०एस सह १०८ एअरक्राफ्ट्सचा समावेश होता. १० वर्षांपूर्वी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रवास सुरूत केलेला व्हिएतजेटचा ताफा २०२३ पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढला आहे, जो संसाधने सानुकूल करत, इंधनाची जवळपास १५ ते २० टक्के बचत आणि विशेषत: पर्यावरणीय संरक्षण, शाश्वत विकास व हरित तंत्रज्ञानांवरील संशोधन यावर लक्ष केंद्रित करत कंपनीच्या यशाप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे.
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कंपनीने गेल्या वर्षभरात सुरक्षितता व सुरक्षेवर आधारित अनेक परिषदा, प्रशिक्षण कोर्सेस, सिम्युलेशन्स यांचे आयोजन केले. यामध्ये क्वालिटी अँड सेफ्टी कॉन्फरन्स, इसागो (इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड फॉर ग्राउंड ऑपरेशन्स), सुरक्षिता प्रशिक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद सिम्युलेशन यांचा समावेश होता. विमानसेवा कामकाजात संपूर्ण सुरक्षितता व संरक्षण राखण्यासाठी सक्रिय राहण्याचे उद्दिष्ट या सर्व उपक्रमांमागे होते. व्हिएटजेटला एअरलाइन रेटिंग्जने सर्वांत सुरक्षित कमी खर्चाच्या विमान कंपन्यांपैकी एक म्हणून सन्मानित केले आहे.