मुंबई, १० डिसेंबर २०२३: डॉ. बत्राज पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्स मुंबईतील एक खास आणि आगळावेगळा उपक्रम आहे. त्यातून मोठे आजार आणि अपंगत्वावर मात करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो, कारण त्यांनी समाजात योगदान देत असताना चिकाटी आणि आशावाद सोडलेला नाही. या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या १५व्या आवृत्तीचे आयोजन जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए मुंबई येथे करण्यात आले. त्यात पाच अशा व्यक्तींचा सन्मान करण्यात आला ज्यांनी फक्त दुर्घटनांवर मातच केली नाही तर त्यांनी समाजात मोठे योगदानदेखील दिले. त्यांचा त्यांच्या अटळ आणि दुर्दम्य इच्छाशक्तीसाठी गौरव केला गेला. या कार्यक्रमाला ख्यातनाम भारतीय अभिनेत्री फातिमा सना शेख प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
राजीव बजाज, व्यवस्थापकीय संचालक, बजाज ऑटो, पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि डॉ. बत्राज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा, श्रीमती मनेका संजय गांधी, विवेक ओबेरॉय आणि आर. बल्की या प्रतिष्ठित परीक्षक मंडळासमोर देशभरातून आलेल्या शेकडो अर्जांमधून विजेत्यांची निवड करण्याचे मोठे आव्हान होते.
विविध क्षेत्रांमधील १००० पेक्षा जास्त उद्योग आघाडीवरील व्यक्तिमत्त्वांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. प्रेक्षकांना अंध व्यक्तींनी तयार केलेल्या ऑर्केस्ट्रा ‘स्वरांगी’द्वारे आणि आमाद डान्स सेंटरच्या व्हीलचेअरवरील सुंदर नृत्य परफॉर्मन्समुळे एक अद्वितीय अनुभव घेता आला आणि कार्यक्रमाची शोभा वाढली. या कार्यक्रमात फक्त एक पायाने नृत्य करणाऱ्या नरेंद्र कश्यप यांचे नृत्य पाहून सर्वच उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.
पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि डॉ. बत्राज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा म्हणाले की, “माझ्या मते रूग्णांना खऱ्या अर्थाने प्रेरणा दुसऱ्या अशा रूग्णांकडून मिळते जे त्या परिस्थितीवर मात करून पुढे आलेले असतात. एक हिलिंग ब्रँड म्हणून आम्हाला त्यांच्या खऱ्या प्रेरणांचे प्रतीक असलेल्या अद्वितीय यशोगाथांचा अभिमान वाटतो. आम्ही श्री. राजीव बजाज आणि आमच्या इतर प्रायोजकांचे त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी आभारी आहोत.”
बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज म्हणाले की, “माझा होमिओपॅथीच्या विज्ञानावर प्रचंड विश्वास आहे आणि मी त्याचा पुरस्कार करतो कारण मी त्याची बरे करण्याची शक्ती पाहिली आहे. डॉ. बत्रा यांनी त्याचे आधुनिकीकरण करून त्याला जगापुढे आणले आहे. आम्हाला मागील अनेक वर्षांपासून डॉ. बत्राज पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्ससोबत भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. या अद्वितीय व्यासपीठाच्या माध्यमातून आमच्या दिव्यांग भारतीयांना पाठिंबा देत असताना खूप अभिमान वाटतो.”
याप्रसंगी आपले मत व्यक्त करत अभिनेत्री फातिमा सना शेखम्हणाल्या, “आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सकारात्मक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मला डॉ. बत्रा’ज पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्सच्या १५व्या पर्वामध्ये उपस्थित असण्याचा खूप आनंद होत आहे. माझा होमिओपॅथीच्या क्षमतेमध्ये विश्वास आहे. होमिओपॅथी नैसर्गिक उपचार देते, ज्यामधून कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. मला येथे अनेक प्रेरणादायी कथा व परफॉर्मन्स पाहायला मिळाले. मला येथे आमंत्रित करण्यासाठी मी डॉ. मुकेश बत्रा यांचे आभार मानते. सर्वांसाठी प्रेरणास्रोत असलेले डॉ. मुकेश बत्रा समाजाचे ऋण फेडत आहेत. हे अत्यंत दुर्मिळ व प्रेरणादायी आहे. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी यशस्वी व्यक्ती असण्याची गरज नाही. फक्त तुमची त्याबाबत मानसिकता असली पाहिजे. मी प्रत्येक वेळी डॉ. मुकेश बत्रा यांची भेट घेते तेव्हा मला काहीतरी नवीन शिकायला मिळते.”
डॉ. इन्शाह बशीर यांना २७००० पेक्षा जास्त मतांनी पीपल्स चॉइस विजेता म्हणून घोषित करण्यात आले. बालाथला मल्लवरपू यांना २१००० मते मिळाली आणि विद्या वाय यांना ११००० मते मिळाली. पीपल्स चॉइस नामनिर्देशने २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या दरम्यान फेसबुक आणि इन्स्टाग्रामसह डॉ. बत्राज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आयोजित करण्यात आली.