maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा १६वा अॅनिव्‍हर्सरी सेल सुरु

मुंबई, ५ जून २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने आपला १६वा अॅनिव्‍हर्सरी सेल सुरु केला आहे, ज्‍यामध्‍ये प्रवास सेवांच्‍या सर्वसमावेशक श्रेणीवर मोठ्या सूटचा समावेश आहे. ११ जून २०२४ पर्यंत चालणाऱ्या या स्‍पेशल सेलचा प्रवाशांना विमाने, हॉटेल्‍स, बस तिकिटे, कॅब रेण्‍टल्‍स आणि हॉलिडे पॅकेजेसवर आकर्षक डिल्‍स प्रदान करत अधिक उत्‍साह देण्‍याचा मनसुबा आहे.

१६व्‍या अॅनिव्‍हर्सरी सेलदरम्‍यान ग्राहक विमानांवर जवळपास ७५०० रूपये सूट, हॉटेल्‍सवर जवळपास १०,००० रूपये सूट, बसेसवर जवळपास १५ टक्‍के सूट, कॅब्‍सवर जवळपास १२ टक्‍के सूट, ट्रेन्‍सवर जवळपास १० टक्‍के त्‍वरित कॅशबॅक, हॉलिडेजवर ६०,९९० रूपयांतर्गत आंतरराष्‍ट्रीय प्रवास आदी सूटचा आनंद घेऊ शकतात.

या अद्भुत सूटचा आनंद घेण्‍यासाठी ग्राहक इझमायट्रिप अॅप किंवा वेबसाइटच्‍या माध्‍यमातून बुकिंग करताना कूपन कोड इएमटी१६ चा वापर करू शकतात. तसेच, आयसीआयसीआय बँक, बॉबकार्ड, अमेरिकन एक्‍स्‍प्रेस, आरबीएल बँक व एचएसबीसी बँक अशा निवडक बँक सहयोगींसह बुकिंग करत वापरकर्ते अधिक सूटचा लाभ घेऊ शकतात, ज्‍यामुळे त्‍यांचा प्रवास अनुभव अधिक उत्‍साहित होईल. सेलला अधिक उत्‍साहवर्धक करण्‍यासाठी सेल कालावधीदरम्यान करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक व्‍यवहारावर तुम्‍हाला वाइल्‍डक्राफ्ट, पीव्‍हीआर, द मॅन कंपनी, सॅम अँड मार्शल आणि ग्रोफिटर अशा निवडक ब्रँड सहयोगींकडून स्‍पेशल गिफ्ट्स जिंकण्‍याची संधी आहे.

तसेच, सेल कालावधीदरम्‍यान सर्वाधिक खरेदी करणाऱ्या व्‍यक्‍तीला इझमायट्रिपचा स्‍पेण्‍डवेस्टिंग पार्टनर मल्‍टीपलकडून आयफोन १५ मिळेल, जेथे तुम्‍ही भावी प्रवास संबंधित खर्चांसाठी गुंतवणूक करू शकता आणि म्‍युच्‍युअल फंड्स रिटर्न्‍स + फ्लॅट १२ टक्‍के अतिरिक्‍त सूट मिळवू शकता. यानंतरच्‍या सर्वाधिक खरेदी करणाऱ्या व्‍यक्‍तींना वनप्‍लस १२, वनप्‍लस नॉर्ड, बोस साऊंडलिंक आणि वनप्‍लस इअरफोन्‍स अशी बक्षीसे जिंकण्‍याची संधी असेल. काही भाग्‍यवान विजेत्‍यांना ट्रॉली सेट्स, ग्रोफिटर हॅम्‍पर्स, सॅम अँड मार्शलचे ग्रिसिओ विगर सनग्‍लासेस् असे गिव्‍हअवेज आणि सहभागी ब्रँड सहयोगींकडून पीव्‍हीआर चित्रपट तिकिटांवर सूट मिळवण्‍याची संधी असेल.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक श्री. रिकांत पिट्टी म्‍हणाले, ”इझमायट्रिप १६वे वर्ष साजरे करत असताना मला बहुमूल्‍य ग्राहकांसाठी त्‍यांचा सतत विश्‍वास व पाठिंब्‍याकरिता आमच्‍या विशेष क्‍यूरेटेड अॅनिव्‍हर्सरी सेलची घोषणा करताना आनंद होत आहे. आम्‍ही प्रवासाला अधिक अविश्‍वसनीय व उपलब्‍ध होण्‍याजोगे करण्‍याप्रती गेस्‍चर म्‍हणून या यशाला साजरे करण्‍यासाठी विमाने, हॉटेल्‍स, बसेस्, कॅब्‍स आणि हॉलिडे पॅकेजेसवर खास सूट देत आहोत.”

Related posts

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून पहिले प्‍युअर ईव्‍ही आर्किटेक्‍चर – ‘acti.ev’ लाँच

Shivani Shetty

डिजिकोअर स्टुडिओजद्वारे एंजल इन्व्हेस्टमेन्ट शो ‘इंडियन एंजल्स’ची घोषणा

Shivani Shetty

एचसीसीबी महाराष्‍ट्रातील ५,५०० व्‍यक्‍तींना अपस्किल करण्‍यासह १४ गावांमध्‍ये सामुदायिक प्रकल्‍प राबवणार

Shivani Shetty

Leave a Comment