मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३: डिजिकोअर स्टुडिओज ने जगातील पहिला एंजल इन्व्हेस्टमेन्ट शो ‘इंडियन एंजल्स’ सुरू करत असल्याची घोषणा केली असून जिओ सिनेमा या भारताच्या आघाडीच्या ओटीटी मंचावर हा कार्यक्रम स्ट्रीम होणार आहे. इंडियन एंजल्स एंजल गुंतवणूकदारांना उदयोन्मुख स्टार्टअप्सना मदत करण्याची संधी देईलच पण त्याचबरोबर प्रेक्षकांनाही स्वत: गुंतवणूकदार बनण्याचे खास निमंत्रण दिले जाणार आहे.
शोमध्ये एंजल गुंतवणूकदारांचे अपवादात्मक पॅनेल आहे, ज्यापैकी प्रत्येकाने विनम्र सुरूवात करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. कार्यक्रमाच्या मान्यवर पाहुण्यामध्ये इन्श्युरन्सदेखोचे संस्थापक आणि सीईओ अंकित अग्रवाल, टी.ए.सी. – द आयुर्वेदिक कं.च्या सहसंस्थापक श्रीधा सिंग, व्हॅल्यू ३६० चे संस्थापक आणि संचालक कुणाल किशोर, कायनेटिक इंजिनीअरिंग लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर अजिंक्य फिरोदिया, इझमायट्रिपचे सीओओ रिकांत पिट्टी आणि शोबितमच्या सहसंस्थापक आणि प्रमुख प्रोडक्ट ऑफिसर अपर्णा त्यागराजन यांचा समावेश असणार आहे.
डिजिकोअर स्टुजिओचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मोरे म्हणाले, “डिजिकोअर स्टुडिओजला या प्रवर्तनशील उपक्रमाचा भाग झाल्याचा अत्यंत अभिमान आहे.’इंडियन एंजल्स’मध्ये ओटीटी मंचांच्या नवसंकल्पना मांडण्याच्या क्षमतांचे सार सामावले आहे व या मंचांच्या असीम शक्यतांचे ते मूर्त रूप आहे. हा कार्यक्रम केवळ मनोरंजनाच्या पलिकडे जातो; गुंतवणूकीबद्दलच्या आपल्या समजुतींना नव्याने घडविण्याचे वचन देणारी एक चळवळ त्यातून सूचित होते. तेव्हा भारतीय गुंतवणूकीच्या पटलावर आणि भारतीय व्यवसायांच्या वाटचालीवर ठोस परिणाम करणा-या एका परिवर्तनशील प्रवासासाठी सज्ज व्हा.”
जिओसिनेमाचे प्रवक्ता म्हणाले, “पारंपरिक मनोरंजनाच्या सीमारेषांना ओलांडून जाणारा “इंडियन एंजल्स’ हा परिवर्तनशील कार्यक्रम जगासमोर आणण्याचा अनुभव आमच्यासाठी थरारक आहे. हा नाविन्यपूर्ण प्रयत्न गुंतवणूकीच्या संधींना तुमच्या स्क्रीन्ससमोर आणून ठेवतो व सर्वांसाठी एंजल इन्व्हेस्टमेंटचे लोकशाहीकरण करतो. तेव्हा प्रेरित होण्यासाठी, शिक्षित होण्यासाठी आणि बिझनेस इन्व्हेस्टमेंटच्या नव्या युगाची पहाट होत असताना या घटनेचे साक्षीदार बनत स्वत: सक्षम बनण्यासाठी सज्ज व्हा.”
‘इंडियन एंजल्स’चा शुभारंभाचा भाग ऑक्टोबरच्या उत्तरार्धात प्रदर्शित होणार आहे व त्यानंतर दर आठवड्याला या मालिकेचे दोन भाग जिओसिनेमाच्या मंचावर प्रदर्शित केले जातील. सर्वसामान्य लोकांना स्टार्ट अप कंपन्यांमधील गुंतवणूक कधी नव्हे इतकी सहजप्राप्त करण्यास ‘इंडियन एंजल्स’ तयार आहे.