maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कोका-कोलाने इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) सोबतचा सहयोग आठ वर्षांपर्यंत वाढवला


नवी दिल्‍ली
, 7 डिसेंबर २०२३: इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) आणि कोका-कोलाला आठ वर्षांपर्यंत जागतिक सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे, ज्‍यामध्‍ये २०३१ च्‍या अखेरपर्यंत क्रिकेटच्‍या तिन्‍ही फॉर्मेट्समधील आयसीसी वर्ल्‍ड इव्‍हेण्‍ट्सचा समावेश आहे.

आयसीसीच्‍या मुख्‍यालयामध्‍ये अधिकृत स्‍वाक्षरी समारोह पार पाडला, जो सहयोगासाठी ऐतिहासिक टप्‍पा ठरला आणि यामधून कोका-कोलाची खेळाप्रती कटिबद्धता दिसून आली. आयसीसीची ग्‍लोबल पार्टनर म्‍हणून या आठ वर्षांच्‍या सहयोगाने आयसीसीने एकाच ब्रॅण्‍डसोबत केलेल्‍या दीर्घकालीन सहयोगाची पुष्‍टी मिळाली, जो एकूण १३ वर्षांपर्यंत (२०१९ ते २०३१) असेल. 

या सहयोगांतर्गत कोका-कोला कंपनीचे ब्रॅण्‍ड्स विशेष नॉन-अल्‍कोहोलिक बेव्‍हरेजेस् सहयोगी बनतील. या करारामध्‍ये २०३१ च्‍या अखेरपर्यंत क्रीडामधील सर्व मेन्‍स व विमेन्‍स इव्‍हेण्‍ट्सचा समावेश आहे, जसे आयसीसीक्रिकेट वर्ल्‍ड कप्‍स, आयसीसी टी२० वर्ल्‍ड कप्‍स आणि आयसीसी चॅम्पियन्‍स ट्रॉफीज. या सहयोगामध्‍ये दरवर्षातील प्रमुख आंतरराष्‍ट्रीय मेन्‍स व विमेन्‍स इव्‍हेण्‍टसह दर दोन वर्षांनी खेळवल्‍या जाणाऱ्या वर्ल्‍ड टेस्‍ट चॅम्पियनशीप फायनलचा देखील समावेश असेल.

आयसीसी चीफ कमर्शियल ऑफिसर अनुराग दहिया म्‍हणाले, ”मला आयसीसी ग्‍लोबल पार्टनर म्‍हणून पुन्‍हा एकदा कोका-कोला कंपनीचे स्‍वागत करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही आठ वर्षांचा उल्‍लेखनीय सहयोग केला आहे, जो जगातील आघाडीचा ब्रॅण्‍ड आणि जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या खेळाला एकत्र आणतो. हा दीर्घकालीन सहयोग नवीन व्‍यावसायिक युगाची सुरूवात करतो, जो खेळासाठी उत्‍साहवर्धक बाबींनी भरलेला आहे. यूएसए व वेस्‍ट इंडिजमध्‍ये मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कप आणि बांग्‍लादेशमध्‍ये विमेन्‍स एडिशन लवकरच सुरू होणार असताना आम्‍ही अनपेक्षित जागतिक वाढ व सहभागासाठी उत्‍सुक आहोत. हा सहयोग आमच्‍या क्रीडा विस्‍तारीकरणाला साजरा करण्‍यासह जगभरातील चाहत्‍यांच्‍या अनुभवामध्‍ये वाढ करण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण संधींची देखील खात्री देतो.

कोका-कोला कंपनी येथील ग्‍लोबल स्‍पोर्टस् आणि एंटरटेन्‍मेंट मार्केटिंग अॅण्‍ड पार्टनरशीप्‍सचे उपाध्‍यक्ष ब्रॅडफोर्ड रॉस म्‍हणाले, ”जागतिक क्रीडा सहयोगींच्‍या आमच्‍या संपन्‍न वारसाशी संलग्‍न राहत आयसीसीसोबतचा सहयोग क्रीडा चाहत्‍यांना उत्‍साहित करण्‍यासह त्‍यांच्‍या मनोरंजन अनुभवामध्‍ये वाढ करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो. खेळामध्‍ये सर्व व्‍यक्‍तींना एकत्र आणण्‍याची व्‍यापक क्षमता आहे आणि हा सहयोग आम्‍हाला जगातील क्रिकेट खेळाच्‍या उत्‍साहासह आमच्‍या ब्रॅण्‍ड संबंधाला संयोजित करण्‍याची अद्वितीय संधी देतो. आम्‍ही आमच्‍या वैविध्‍यपूर्ण पोर्टफोलिओसह ग्राहकांना आनंदित करत राहण्‍याचा, तसेच चाहत्‍यांसाठी अद्वितीय अनुभव निर्माण करत राहण्‍याचा प्रयत्‍न करतो.”  

नुकतेच आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप इंडिया २०२३ दरम्‍यान थम्‍स अप आणि लिम्‍का स्‍पोर्ट विशेष बेव्‍हरेज व स्‍पोर्टस् ड्रिंक पार्टनर्स होते, ज्‍याला चाहत्‍यांनी ऑनलाइन व ऑफलाइन उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. तसेच, स्‍प्राइटने लक्षवेधक थंड रखमोहिमेसह अग्रस्‍थान कायम रा‍खले. सर्वात मोठ्या वर्ल्‍ड कप उत्‍साहादरम्‍यान क्रिकेट चाहत्‍यांचा उत्‍साह वाढवण्‍यासह टिकवून ठेवण्‍याचा या मोहिमेचा मनसुबा होता.

कोका-कोला जगभरातील स्‍थानिक क्रीडा इव्‍हेण्‍ट्स व संस्‍थांना पाठिंबा देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. कोका-कोला कंपनीचा ऑलिम्पिक्‍ससोबत आठ दशकांचा सहयोग आहे. तसेच चार दशकांपासून कंपनी फिफा, टी२० वर्ल्‍ड कपशी संलग्‍न आहे आणि लोकांना एकत्र अणत त्‍यांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यसाठी क्रीडा क्षमतेचा वापर करत आहे. भारतातील ऑलिम्पिक्‍स व पॅरालिम्पिक्‍ससोबत थम्‍सअपच्‍या नुकत्‍याच सहयोगामधून कंपनीचा क्रीडावरील विश्‍वास आणि उत्‍साहवर्धक परिवर्तन घडवून आणण्‍याप्रती दीर्घकालीन प्रवास दिसून येतो. 

कोका-कोला कंपनी बाबत

भारतात कोका-कोला देशातील अग्रगण्‍य पेय कंपनी आहे, जी ग्राहकांना उच्‍च दर्जाच्‍या व रिफ्रेशिंग पेय पर्यायांची श्रेणी देते. कंपनीबेव्‍हरेजेस् फॉर लाइफया आपल्‍या दृष्टिकोनाशी बांधील राहत उत्‍पादनांचा व्‍यापक पोर्टफोलिओ देते, ज्‍यामध्‍ये हायड्रेशन, स्‍पोर्टस्, स्‍पार्कलिंग, कॉफी, चहा, पोषण, ज्‍यूस व डेअरी आधारित उत्‍पादनांचा समावेश आहे. भारतातील कंपनीच्‍या पेय श्रेणीमध्‍ये कोका-कोला, कोला-कोला झीरो शुगर, डायट कोक, थम्‍स अप, चार्ज्‍ड बाय थम्‍स अप, फॅन्‍टा, लिम्‍का, स्‍प्राइट, माझा आणि ज्‍यूसेसची मिनट मेड रेंज यांचा समोवश आहे. कंपनी हायड्रेशन पेय देखील देते जसे लिम्‍का स्‍पोर्टस्, स्‍मार्टवॉटर, किन्‍ले, दसानी आणि बोनाक्‍वा पॅकेज ड्रिंकिंग वॉटर व किन्‍ले क्‍लब सोडा. प्रिमिअम उत्‍पादनांमध्‍ये श्‍वेप्‍स व स्‍मार्टवॉटर यांचा समावेश आहे. याव्‍यतिरिक्‍त कंपनी चहा व कॉफीची कोस्‍टा कॉफी श्रेणी देते. कंपनी आपल्‍या पेयांमध्‍ये साखरेचे प्रमाण कमी करण्‍यापासून बाजारपेठेत नाविन्‍यपूर्ण नवीन उत्‍पादने सादर करण्‍यापर्यंत आपल्‍या पोर्टफोलिओमध्‍ये सातत्‍याने परिवर्तन करत आहे.

आपल्‍या स्‍वत:च्‍या मालकीच बॉटलिंग कार्यसंचालने व फ्रँचायझी बॉटलिंग सहयोगींसह कंपनीचे जवळपास ४ दशलक्ष रिटेल आऊटलेट्सचे प्रबळ नेटवर्क आहे. या नेटवर्कच्‍या माध्‍यमातून कंपनी देशभरातील लाखोग्राहकांना रिफ्रेश करते. कंपनी वॉटर रिप्‍लेनिशमेंट, पॅकेजिंग रिसायकलिंग, शाश्‍वत कृषी उपक्रम आणि आपल्‍या मूल्‍य साखळीमध्‍ये कार्बन उत्‍सर्जन कमी करण्‍याच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍तींचे जीवन, समुदाय व पर्यावरणावर सकारात्‍मक परिणाम घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न करते.

जागतिक स्‍तरावर आपल्‍या बॉटलिंग सहयोगींसोबत सहयोगाने कोका-कोला कंपनीचे ७००,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहे, ज्‍यामधून जगभरातील स्‍थानिक समुदायांना आर्थिक संधी मिळण्‍यास मदत केली जात आहे. अधिक माहितीसाठी www.cocacolacompany.com येथे भेट द्या आणि आम्‍हाला ट्विटर, इन्‍स्‍टाग्राम, फेसबुक व लिंक्‍डइनवर फॉलो करा.

Related posts

झेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिस्जकोव्हा बनली मिस वर्ल्ड

Shivani Shetty

वर्क इंटिग्रेटेड लर्निंग’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Shivani Shetty

जेएसडब्‍ल्‍यू एमजी मोटर इंडियाची इकोफायसोबत हा‍तमिळवणी

Shivani Shetty

Leave a Comment