maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

लिव्‍हप्‍युअरने मेन्‍टेनन्‍स फ्री वॉटर प्‍युरिफायर्सची श्रेणी लाँच केली

*मुंबई, १३ मे २०२५:* भारतातील ग्राहकांच्‍या स्‍वास्‍थ्‍याप्रती समर्पित आघाडीचा व सर्वात विश्‍वसनीय ग्राहक-केंद्रित ब्रँड लिव्‍हप्‍युअरने नवीन मापदंड स्‍थापित करताना मेन्‍टेनन्‍स फ्री (देखभाल-मुक्त) वॉटर प्‍युरिफायर्सची सर्वात मोठी श्रेणी लाँच केली आहे. ग्राहकांची मुख्‍य समस्‍या म्‍हणजेच वॉटर प्‍युरिफायर्सच्‍या उच्‍च वार्षिक मेन्‍टेनन्‍स खर्चाचे निराकरण करण्‍याचा कंपनीचा मनसुबा आहे, जो सरासरी प्रतिवर्ष ५,००० रूपये आहे. यासोबतच कंपनीने त्यांची लोकप्रिय टीव्हीसी मोहीम ‘हाथी मत पालो’ पुन्हा सुरू केली आहे. ही मोहिम आयपीएलदरम्‍यान आणि इतर प्रमुख राष्‍ट्रीय व प्रादेशिक टेलिव्हिजन चॅनेल्‍सवर प्रसारित करण्‍यात येईल.

या उपक्रमाचा भाग म्‍हणून लिव्‍हप्‍युअर प्रीमियम वॉटर प्‍युरिफायर्सवर जवळपास ३० महिन्‍यांची इंटीग्रेटेड मेन्‍टेनन्‍स सर्विसेस् देत आहे, ज्‍यामध्‍ये अलुरा, अलुरा प्रीमिया, सेरेनो, एटर्ना आणि एटर्ना प्रीमिया या वॉटर प्‍युरिफायर्सचा समावेश आहे. या उपक्रमाचा ग्राहक अभूतपूर्वरित्‍या विनासायास मालकीहक्‍क अनुभव घेतील याची खात्री करण्‍याचा मनसुबा आहे. लिव्‍हप्‍युअर भारतीयांसाठी वॉटर प्‍युरिफायर्स अधिक सहजसाध्‍य व उपलब्‍ध होण्‍याजोगे करण्‍याचा प्रयत्‍न करते, ज्‍यामुळे बाजारपेठ विकसित होण्‍यास मदत होईल आणि शुद्ध पिण्‍याचे पाणी अधिक प्रमाणात उपलब्‍ध होईल.

वार्षिक मेन्‍टेनस करार किंवा अनपेक्षित सर्विसिंग खर्चांची गरज दूर करत हा उपक्रम ग्राहक अनुभवाला अधिक उत्‍साहित करतो आणि अपवादात्‍मक दीर्घकालीन मूल्‍य देतो. लिव्‍हप्‍युअर एम्‍बेडेड सर्विस सादर करणारा भारतातील पहिला ब्रँड आहे, जो कॅटेगरी इनोव्‍हेटर म्‍हणून स्थित आहे आणि नवीन उद्योग मापदंड स्‍थापित करत आहे. या श्रेणीमध्‍ये ६० टक्‍के मार्केट शेअर संपादित करण्‍याच्‍या धाडसी दृष्टिकोनासह लिव्‍हप्‍युअर अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व अद्वितीय युजर अनुभवाचे संयोजन असलेले सोल्‍यूशन्‍स देत ग्राहकांच्‍या स्‍वास्‍थ्‍याला प्राधान्‍य देत आहे. या दूरगामी दृष्टिकोनामधून वॉटर प्‍युरिफायर मालकीहक्‍काला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याप्रती, तसेच ग्राहक समाधानामधील सर्वोत्तमतेसाठी आपली प्रतिष्‍ठा अधिक दृढ करण्‍याप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते.

*लिव्‍हप्‍युअरचे व्‍यवस्‍थापकीय संचालक राकेश कौल* म्‍हणाले, ”लिव्‍हप्‍युअरमध्‍ये आम्‍ही ग्राहक अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. लाँच करण्‍यात आलेली एम्‍बेडेड मेन्‍टेनन्‍स सर्विस परिवर्तनात्‍मक टप्‍पा आहे, जी आमच्‍या वापरकर्त्‍यांना सोयीसुविधा आणि परिपूर्ण मन:शांती देते. हा उपक्रम वैशिष्‍ट्यापेक्षा अधिक विश्‍वास, विश्‍वासार्हता आणि दीर्घकालीन मूल्‍याचे वचन आहे. वॉटर प्‍युरिफायर मेन्‍टेनन्‍सच्‍या सामान्‍य त्रासांना दूर करत आमचा वॉटर प्‍युरिफिकेशनमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करण्‍याचा आणि ग्राहकांसाठी मालकीहक्‍क अत्‍यंत विनासायास करण्‍यासाठी आमची समर्पितता दृढ करण्‍याचा मनसुबा आहे. हे वॉटर प्‍युरिफायर उद्योग मापदंडांना नवीन आकार देण्‍याच्‍या आणि भारतातील वॉटर प्‍युरिफिकेशनचा अनुभव घेण्‍याच्‍या पद्धतीला अधिक उत्साहित करण्‍याच्‍या दिशेने पाऊल आहे.”

ग्राहक त्‍यांच्‍या दैनंदिन गरजांसाठी विनासायास सोल्‍यूशन्‍सना मोठ्या प्रमाणात प्राधान्‍य देत असताना ही घोषणा करण्‍यात आली आहे. वॉटर प्‍युरिफायर्समध्‍ये मेन्‍टेनन्‍सला विनासायासपणे एकीकृत करत लिव्‍हप्‍युअर प्रत्‍यक्ष या मागणीची पूर्तता करत आहे, सोयीसुविधेसाठी नवीन मापदंड स्‍थापित करत आहे आणि उद्योग मापदंडाला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे.

Related posts

नागपूरस्थित राइट वॉटर सोल् युशन्सने भारतभरात सुरक्षित क्षपण्याचे पाणी पुरवण्यासाठी उभारला क्षनधी

Shivani Shetty

सुगी ग्रुप तर्फे भव्य ‘दिवाळी पहाट’ सोहळा – २० ऑक्टोबर २०२५ रोजी!

Shivani Shetty

सॅमसंग बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेसवर अभूतपूर्व डिल्‍स, कॅशबॅक आणि रिवॉर्ड्ससह घेऊन येत आहे ‘बिग बीस्‍पोक एआय फेस्टिवल’

Shivani Shetty

Leave a Comment