maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

*क्‍लीअरट्रिप पुन्‍हा घेऊन आले आहे सर्वात मोठा समर ट्रॅव्‍हल सेल #NationOnVacation*

राष्‍ट्रीय, 11 मार्च २०२४: उन्‍हाळा जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप (Cleartrip) या फ्लिपकार्ट कंपनीने त्‍यांचा बहुप्रतिक्षित मार्की ट्रॅव्‍हल सेल #NationOnVacation च्‍या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली आहे. ९-दिवसीय ट्रॅव्‍हल सेलला १४ मार्च २०२४ पासून सुरूवात होत आहे आणि हॉटेल्‍स, फ्लाइट्स, बसेस् व पॅकेजेसवर आकर्षक डिल्‍स सादर करत प्रवास अनुभवामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे. उच्‍च मागणीदरम्‍यान उन्‍हाळा सीझनसाठी विमानभाडे वाढण्‍याची शक्‍यता आहे. #NationOnVacation सह क्‍लीअरट्रिप आणि फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल ग्राहकांना त्‍यांच्‍या प्लॅटफॉर्म्सवर सर्वोत्तम ऑफर्सचा फायदा घेण्‍याची आणि त्‍यांच्‍या स्‍वप्‍नवत हॉलिडेजना बुक करण्‍याची संधी देत आहेत. आपल्‍या ग्राहक-केंद्रित मूल्‍यांशी बांधील राहत क्‍लीअरट्रिप ‘क्‍लीअरचॉईस’च्‍या आश्रयांतर्गत वापरकर्त्‍यांना उत्तम स्थिरता प्रदान करत आहे. क्‍लीअरचॉईस प्‍लस आणि क्‍लीअरचॉईस मॅक्‍ससह प्रवासी त्‍यांच्‍या बुकिंग्‍ज रद्द करू शकतात किंवा त्‍यामध्‍ये बदल करू शकतात आणि प्रमाणित विमानसेवा परताव्‍यांच्‍या तुलनेत संपूर्ण रिफंड मिळवू शकतात, ज्‍यांची रेंज २५०० रूपयांपासून आहे. मिंत्रा व फ्लिपकार्ट लॉयल्‍टी ग्राहक क्‍लीअरट्रिप आणि फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल व्‍यासपीठांवर स्‍पेशल ऑफर्स व सूटचा लाभ घेऊ शकतात.

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अय्यप्‍पन राजगोपाल म्‍हणाले, ”प्रवाशांच्‍या मनात अगोदरपासूनच प्रवासासंदर्भात नियोजन करण्‍याची भावना बिंबवण्‍याच्‍या संकल्‍पनेसह #NationOnVacation डिझाइन करण्‍यात आले. आम्‍हाला गेल्‍या वर्षी नेशनऑनव्‍हेकेशनला मिळालेल्‍या प्रतिसादाचा आनंद होत आहे, तसेच सर्वोत्तम ऑफरिंग्‍जसह आम्ही ते पुन्‍हा सादर करण्‍यास उत्‍सुक आहोत, ज्‍यामुळे सर्वांसाठी उन्‍हाळा संस्‍मरणीय हॉलिडेचा अनुभव ठरेल. विमानभाडे आगाऊ नियोजन करण्‍याच्‍या तुलनेत एप्रिल व मे मध्‍ये करण्‍यात येणाऱ्या बुकिंग्‍जसाठी, तसेच आजच्‍या बुकिंगसाठी २० ते २५ टक्‍क्‍यांनी वाढण्‍याची अपेक्षा आहे. क्‍यूरेटेड व ग्राहक-केंद्रित डिल्‍ससह आमचा भारतीयांसाठी समर ट्रॅव्‍हल अधिक किफायतशीर करत त्‍याप्रती असलेल्‍या प्रेमाला साजरे करण्‍याचा मनसुबा आहे. क्‍लीअरचॉईसच्‍या माध्‍यमातून प्रवाशांच्‍या लास्‍ट-मिनिट नियोजनासंदर्भातील चिंता दूर होऊ शकतात आणि पैशांच्‍या उत्तम मूल्‍याची खात्री मिळू शकते. सर्वोत्तम डिल्‍स लॉक करण्‍यासाठी आजच बुकिंग करा, विमानभाड्यांमधील संभाव्‍य वाढीची पर्वा न करता उच्‍च दर्जाच्‍या प्रवास अनुभवाचा आनंद घ्‍या.”
प्रमुख ऑफर्स पुढीलप्रमाणे:
देशांतर्गत फ्लाइट्सचे भाडे ९९९ रूपयांपासून
आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्सचे भाडे ४९९९ रूपयांपासून
५-स्‍टार हॉटेल्‍स भाडे २४९९ रूपयांपासून
बस बुकिंग्‍जवर जवळपास ५०० रूपयांची सूट
देशांतर्गत फ्लाइट्सवर ५९९ रूपयांमध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स
हॉटेल बुकिंग्‍जवर ३० ते ८० टक्‍क्‍यांची सूट
४९ रूपयांमध्‍ये क्‍लीअरचॉईस प्‍लस + हॉटेल्‍सवर जवळपास १० टक्‍के अतिरिक्‍त सूट
१ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स + हॉटेल्‍सवर जवळपास १५ टक्‍के अतिरिक्‍त सूट
वरील ऑफर्स फक्‍त मर्यादित कालावधीसाठी उपलब्‍ध आहेत.
गेल्‍या वर्षी #NationOnVacation ला अविश्‍वसनीय यश मिळाले, जेथे २०२२ मधील याच कालावधीच्‍या तुलनेत श्रेणींमधील बुकिंग्‍जमध्‍ये ६० टक्‍क्‍यांची वाढ झाली. क्‍लीअरट्रिप अधिकाधिक प्रवाशांसाठी प्रवास सुलभ करण्‍याकरिता वर्षभर इंडस्‍ट्री-फर्स्‍ट व ग्राहक-केंद्रित तत्त्वांमध्‍ये गुंतवणूक करण्‍याप्रती समर्पित आहे.
अटी व नियम: कृपया आमच्‍या व्‍यासपीठावर वरील ऑफर्सचा लाभ व बुकिंग करण्‍यापूर्वी सर्व अटी व नियम काळजीपूर्वक वाचा.

Related posts

व्हिएतजेटकडून आपल्‍या आधुनिक ताफ्यामध्‍ये १०२व्‍या विमानाची भर

Shivani Shetty

ईडीकडून पेटीएमची कोणत्‍याही प्रकारची चौकशी नाही, महसूल सचिवांकडून पुष्‍टी

Shivani Shetty

टाटा मोटर्सने प्रगत गतीशीलता सोल्‍यूशन्‍स दाखवण्‍यासाठी लाँच केला अद्वितीय ग्राहक सहभाग उपक्रम – ‘ट्रक उत्‍सव’

Shivani Shetty

Leave a Comment