maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

वोडाफोन आयडियाकडून सॅमसंगच्‍या वैविध्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून बेंगळुरूमध्‍ये ५जी कमर्शियल सर्विस लाँच

सॅमसंगने आपल्‍या उद्योग-अग्रणी सोल्‍यूशन्‍ससह बेंगळुरू, चंदिगड व पटणामधील वीच्‍या (Vi) २जी, ४जी आणि ५जी कमर्शियल नेटवर्क्‍सना प्रबळ केले, ज्‍यासह भारतात प्रगत कनेक्‍टीव्‍हीटी आणली

आघाडीची टेलिकॉम ऑपेरटर वोडाफोन आयडिया (Vi)ने आज सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिकस कं. लि. (सॅमसंग) सोबत सहयोगाने बेंगळुरूमध्‍ये ५जी सर्विसेसच्‍या कमर्शियल लाँचची घोषणा केली. बेंगळुरू भारतातील प्रमुख टेलिकॉम बाजारपेठ आहे आणि ‘सिलिकॉन व्‍हॅली ऑफ इंडिया’ म्‍हणून प्रसिद्ध असलेले जागतिक आयटी हब आहे. २०२४ पासून कंपन्‍या सहयोगाने काम करत न्‍यू जनरेशन, ५जी नेटवर्क देत आहे, तसेच भारतातील बिहार, कर्नाटक व पंजाब या प्रमुख टेलिकॉम शहरांमध्‍ये सॅमसंगच्‍या उद्योग-अग्रणी सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून Vi च्‍या वारसायुक्‍त २जी व ४जी नेटवर्क्‍सचे आधुनिकीकरण करत आहे.

या सहयोगाचा भाग म्‍हणून Vi ने आधीच एप्रिल २०२५ मध्‍ये चंदिगड व पटणा येथे ५जी कमर्शियल सर्विसेस् लाँच केल्‍या. Vi ने तिन्‍ही शहरांमध्‍ये विनासायास ५जी अनुभव सक्षम करण्‍यासाठी सॅमसंगचे लहान फॉर्म-फॅक्‍टर, ऊर्जा-कार्यक्षम आणि उच्‍च ट्रान्‍समिट पॉवर रेडिओज यशस्‍वीरित्‍या सादर केले आहेत. हे सोल्‍यूशन्‍स अधिक सेल क्षमता व ऊर्जा बचत वैशिष्‍ट्ये देतात, ज्‍यामधून ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव मिळण्‍यासोबत Vi च्‍या ग्राहकांना पर्यावरणपूरक व अधिक शाश्‍वत दृष्टिकोन मिळतो.

या वितरणासाठी सॅमसंगने विविध स्‍पेक्‍ट्रम बँड्सला सपोर्ट करणाऱ्या रेडिओंची व्‍यापक श्रेणी दिली, जसे ३२टी३२आर मॅसिव्‍ह एमआयएमओ रेडिओ, तसेच रेडिओ अॅक्‍सेस नेटवर्क (आरएएन) सोल्‍यूशन्‍स, ज्‍यामध्‍ये बेसबँड व सॉफ्टवेअर फंक्‍शन्‍सचा समावेश आहे, जे व्‍हर्च्‍युअलाइज्‍ड सेंट्रल युनिट (व्‍हीसीयू) म्‍हणून ओळखले जातात.

कंपन्‍यांनी २जी सर्विसेससाठी प्रमुख नेटवर्क घटक देशातील पहिल्‍या व्‍हर्च्‍युअलाइज्‍ड बेस स्‍टेशन कंट्रोलर (व्‍हीबीएससी)ची देखील अंमलबजावणी केली आहे, ज्‍याद्वारे अत्‍याधुनिक सॉफ्टवेअर सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या नेटवर्कचे आधुनिकीकरण करत आहे आणि वारसायुक्‍त तंत्रज्ञान व सर्विसेसना पाठिंबा मिळण्‍याची खात्री घेत आहे.

नेटवर्क फंक्‍शनालिटीजचे व्‍हर्च्‍युअलायझेशन Vi ला नेटवर्क अंमलबजावणी सु‍व्‍यवस्थित करण्‍यास आणि व्‍यवस्‍थापन सोपे करण्‍यास सक्षम करते, ज्‍यामधून अधिक कार्यक्षमता, कमी कार्यचालन खर्च, सर्वोत्तम संसाधन वाटप नियंत्रण आणि अधिक ग्राहक समाधानाची खात्री मिळते. या व्‍हर्च्‍युअलायझेशन अवलंबनासह ऑपरेटर्स अधिक सहजपणे सॉफ्टवेअर-आधारित व स्थिर नेटवर्क्‍स निर्माण करू शकतात, पुढे देखील नेटवर्क्‍स सादर करण्‍यातील स्‍पर्धेमध्‍ये अग्रस्‍थानी राहू शकतात.

व्‍होडाफोन आयडियाचे चीफ टेक्‍नॉलॉजी ऑफिसर जगबीर सिंग म्‍हणाले, ”बेंगळुरूमध्‍ये, तसेच चंदिगड व पटणामध्‍ये Vi च्‍या ५जी सर्विसेसचे लाँच आमच्‍या इकोसिस्‍टममध्‍ये सॅमसंगला नवीन सहयोगी म्‍हणून सादर करण्‍यामधील आणि ग्राहकांना विनासायास, अत्‍यंत विश्‍वसनीय नेक्‍स्‍ट-जनरेशन सर्विसेस् देण्‍यामधील प्रमुख पाऊल आहे. सॅमसंगसोबत सहयोग करत आमचा ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्‍याचा, तसेच आजच्‍या डिजिटली कनेक्‍टेड विश्‍वामध्‍ये आवश्‍यक असलेल्‍या सुधारित मोबाइल ब्रॉडबँड सेवा व उच्‍च क्षमता देण्‍याचा मनसुबा आहे.”

सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या नेटवर्क्‍स बिझनेसचे अध्‍यक्ष व प्रमुख वूजुन किम म्‍हणाले, ”भारत, विशेषत: बेंगळुरू जागतिक डिजिटल परिवर्तनामध्‍ये अग्रस्‍थानी आहे आणि आम्‍हाला जगातील सर्वात डायनॅमिक व प्रगत आयटी बाजारपेठेतील ग्राहकांना नेक्‍स्‍ट-जनरेशन कनेक्‍टीव्‍हीटी देण्‍यासाठी Vi च्‍या नाविन्‍यपूर्ण प्रवासामध्‍ये सामील होण्‍याचा अभिमान वाटतो. सॅमसंग नेहमी एक पाऊल पुढचा विचार करते, मोबाइल ऑपरेटर्सच्‍या भावी गरजांचा अंदाज घेते. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून सॅमसंग नाविन्‍यपूर्ण पैलूंच्‍या माध्‍यमातून मोबाइल युजर्सच्‍या मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी आणि उद्योग विकासाला चालना देण्‍यासाठी Vi ला पाठिंबा देण्‍याप्रती कटिबद्ध आहे.”

Related posts

लिव्‍हप्‍युअरने नवीन ‘सेरेनो’ वॉटर प्‍युरिफायर लाँच केला

Shivani Shetty

स्वदेशी बनावटीच्या ‘सीएआर टी-सेल थेरपी’ ने ललिथा कुमारी कर्करोग मुक्त

Shivani Shetty

नवी मुंबईत ‘एबीसी चिल्ड्रेन्स कॉन्क्लेव्ह २०२५’ चे आयोजन

Shivani Shetty

Leave a Comment