maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

बीएलएस इंटरनॅशनलने सिटीझनशिप इन्व्हेस्टमधील १००% भागीदारीचे संपादन केले

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२४: सरकार आणि नागरिकांसाठीची एक प्रमुख ग्लोबल टेकनिक-सक्षम सेवा प्रदाता, बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेडने आज सिटिझनशिप इन्व्हेस्टमध्ये १००% भागीदारीचे संपादन यशस्वी रित्या पूर्ण केल्याचे जाहीर केले. सिटिझनशिप इन्व्हेस्ट एक दुबई स्थित कंपनी आहे जी १५ पेक्षा जास्त देशांमध्ये निवास आणि नागरिकत्व यासाठीच्या फास्ट ट्रॅक गुंतवणूक कार्यक्रमांत तज्ज्ञ आहे.

 

बीएलएसने आपले पूर्ण स्वामित्व असलेली साहाय्यक कंपनी बीएलएस इंटरनॅशनल एफझेडई, युएईमार्फत एकंदर ३१ मिलियन युएसडी (~२६० कोटी रु.) रकमेत सिटिझनशिप इन्व्हेस्टचे संपादन केले, जे पूर्णपणे आंतरिक स्रोतांद्वारे वित्त-पोषित आहे. आवश्यक त्या सर्व सरकारी आणि नियामक मंजूरी आधीच प्राप्त करण्यात आल्या आहेत.

 

२००९ मध्ये स्थापित झालेली सिटिझनशिप इन्व्हेस्ट ही २० पेक्षा जास्त कार्यक्रम सादर करून, नागरिकत्व आणि रेसिडेन्सी उद्योगातील एक प्रमुख कंपनी बनली आहे. या कंपनीने ८५ पेक्षा जास्त देशांमधील १८००+ ग्राहकांना यशस्वीरित्या सेवा दिली आहे आणि ती अर्ज मंजुरीत ९९% यशाचा दर असल्याचा दावा करते.

 

या संपादनामुळे व्हिसा आणि कॉन्स्युलर सेवांमध्ये बीएलएस च्या पोर्टफोलिओला मजबुती मिळाली आहे, ज्यामुळे त्यांच्या नागरिकत्व आणि रेसिडेन्सी सेवांसारख्या दीर्घकालीन व्हिसा सोल्यूशन्समध्ये आणखी सुधारणा होईल. आपल्या १५ वर्षांच्या इतिहासात सिटिझनशिप इन्व्हेस्टने या सेक्टरमध्ये हाय-नेटवर्थ असलेल्या व्यक्तींमध्ये एक विश्वसनीय प्रदाता म्हणून आपला चांगला लौकिक निर्माण केला आहे.

 

बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे जॉइंट मॅनिजिंग डायरेक्टर श्री. शिखर अग्रवाल म्हणाले, “नागरिकत्व आणि रेसिडेन्सी सेक्टरमध्ये काम करत असलेल्या सिटिझनशिप इन्व्हेस्ट या प्रसिद्ध कंपनीचे बीएलएस परिवारात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. हे संपादन व्हिसा आणि कॉन्स्युलर सेवा सेक्टरमधल्या आमच्या क्षमतांचा विस्तार करण्याबाबतच्या आमच्या वचनबद्धतेचे निदर्शक आहे. ते आमच्या व्यवसायात समन्वय निर्माण करण्यासाठी आणि आमच्या सर्व हितधारकांना अधिक मूल्य देण्याबाबतच्या आमच्या धोरणात्मक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.

 

६६ पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या बीएलएस च्या ग्लोबल नेटवर्कचा उपयोग करत आम्ही हाय-नेटवर्थची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असलेल्या भागांवर फोकस करून सिटिझनशिप इन्व्हेस्टच्या प्रगतीला वेग देण्याची आमची योजना आहे. हे धोरण आम्हाला नव्या बाजारपेठांमध्ये शिरकाव करण्यासाठी, सिटिझनशिप इन्व्हेस्टची जागतिक उपस्थिती वाढवण्यासाठी आणि बीएलएस ला व्हिसा, कॉन्स्युलर, नागरिकत्व आणि रेसिडेन्सी सेवांसाठी एक व्यापक सोल्यूशन प्रदाता म्हणून स्थापित करण्यास सक्षम बनवेल.”

Related posts

नोज पिन और नोज रिंग पर एक नजर…

Shivani Shetty

आयएमडीबीच्या ‘बर्निंग क्वेशन्स’ वर होमी अदजानिया म्हणतात की ‘विजय वर्मा आता अंडरडॉग नाही तर एक टॉप आहे’

Shivani Shetty

टाटा मोटर्स साजरा करत आहे आयएलएमसीव्‍ही श्रेणीमधील १५ लाख ट्रक्‍सच्‍या ऐतिहासिक विक्रीचा टप्‍पा

Shivani Shetty

Leave a Comment